NEET/JEE BOOKS FREE DISTRIBUTION SCHEME 2024.नीट/जेइई परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक संच वाटप योजना

NEET/JEE BOOKS FREE DISTRIBUTION SCHEME 2024: महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातीलविद्यार्थ्यांना सन 2024-25 मध्ये JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत पुस्तक संच वाटप करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

NEET/JEE BOOKS FREE DISTRIBUTION SCHEME 2024

NEET/JEE BOOKS FREE DISTRIBUTION SCHEME 2024 योजनेच्या लाभासाठी पात्रता

  1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
  2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातीलअसावा असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी.
  3. सन-2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजनेच्या लाभाकरीता पात्र राहतील.
  4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृष्य पद्धतीनेजोडणे आवश्यक आहे.
  5. विद्यार्थ्यांची निवड ही इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतरआक्षणानुसार करण्यात येईल.
  6. इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त तसेच ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
  7. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किया कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुदपत्त्यावरुन ठरविल्या जाईल.

अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :-

  1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहित)
  2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
  5. 10 वी ची गुणपत्रिका6. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)
  6. दीव्यांग असल्यास दाखला.
  7. अनाथ असल्यास दाखला.

आरक्षण:

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे

समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे

1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

2) दिव्यांगाकरीता 5% जागा आरक्षित आहे.

3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

अर्ज कसा करावा :-

1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “JEE/NEET परीक्षांकरीता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा,

2. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कैन करुन जोडावे.>

  • अटी व शर्ती:-
  • 1. अर्ज करण्याची अंतिम दि. 15/09/2024 आहे.
  • 2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. कोणत्याहो माध्यमातून व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांस सदर योजनेच्या लाभापासून वंचित करण्यात येईल.

5. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संपर्क क्र 0712-2870120/21E-mail Id: mahajyotingp@gmail.com(स्वा.)

माहिती पत्रक Download करण्यासाठी खाली क्लिक करा.

Scroll to Top