navopkram in marathi 2024 | नवोपक्रम अहवाल लेखन,व्याप्ती आणि कार्यपद्धती

Navopkram in marathi : नवोपक्रम म्हणजेच नवा उपक्रम किंवा उत्कृष्टतेचा ध्यास घेतेलेल्या व्यक्तीने पारंपारिक अथवा प्रस्थापित पद्धतीपेक्षा वेगळा मार्ग अनुसरून राबविलेला नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजेच नवोपक्रम होय. विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियानासाठी या नवोपक्रमाची उपयुक्तता महत्वाची आहे.

navopkram in marathi | नवोपक्रम अहवाल लेखन,व्याप्ती आणि कार्यपद्धती

navopkram in marathi /नवोपक्रम निकष

  1. नाविन्यता : – उपक्रमा मध्ये नावीन्य असले पाहिजे.
    • कालसापेक्ष :- उपक्रम हा कोणत्याही काळात उपयुक्त असावा.
    • व्यक्तीसापेक्ष :- आपल्या विद्यार्थ्यासोबतच तो इतर सर्वच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरावा.
    • स्थलसापेक्ष :- उपक्रम हा ग्रामीण तसेच शहरी भागातील व इतर कोणत्याही भागातील विद्यार्थ्याना उपयोगी होईल असा असावा.
    • यशस्वीता :- आपल्या उपक्रमाची यशस्वीता कशावर अवलंबून आहे याची माहिती असणे तितकेच महत्वाचे आहे.
    • ऊपयुक्तता :- आपला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कसा व कितपत उपयुक्त ठरेल याची माहिती असणे आवश्यक आहे.

नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे

  1. नवोपक्रमाचे शीर्षक :-
    • 👉नवोपक्रमाचे नेमके नाव लिहावे
  2. नवोपक्रमाची गरज व महत्व :-
    • 👉उपक्रम निवडण्याचे कारण, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. चा तपशील.
  3. नवोपक्रमाची उद्दिष्टे :-
  4. 👉या नवोपक्रमातून काय साध्य होणार आहे.
  5. 👉यामुळे कोणामध्ये बदल होणार आहे.
  6. 👉याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.
  7. नवोपक्रमाचे नियोजन :
    • 👉उपक्रम पूर्व स्थितीचे नियोजन
      👉नवोपक्रम संबंधित तज्ज्ञ व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा
      👉आवश्यक साधनांचा विचार
      👉करावयाच्या कृतीचा क्रम
      👉उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण
      👉कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)
      👉उपक्रमासाठी इतरांची मदत –
      👉उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे
  8. नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती ( उद्दिष्टानुसार ) :-
  9. 👉या उपक्रमामुळे के साध्य झाले.
  10. 👉कोणत्या घटकाला या उपकराचा लाभ झाला.
  11. 👉उद्दिष्टानुसार फलश्रुती लिहावी.
  12. 👉आवश्यकता वाटल्यास त्याकरीता शेकडेवारी व आलेखचा वापर करता येईल.
  13. 👉अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी.
  14. 👉त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतीची फलश्रुती मांडावी.

नवोपक्रमाचा समारोप

→ आपली अस्वस्थता उपक्रमानंतर कशी दूर झाली

→ उपक्रमासाठी काही अडचणी आली का?, असल्यास, त्या कोणती? मात कशी केलीत.

→ उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीकरीता कसा झाला.

→ या उपक्रमाची उपयुक्तता कुठे कुठे व कोणाकोणाला होऊ शकेल.

संदर्भसूची व परिशिष्टे

→ ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची

→ परिशिष्टे –

→ वर्गातील सहभागी विद्यार्थी नावे, यशस्विता तपासण्यासाठी तयार केलेली साधने, उपक्रमाची माहिती इ.

नवोपक्रमाची कार्यपध्दती

  • पूर्व स्थितीची निरीक्षणे आणि त्यांच्या नोंदी
  • कार्यावाहीदाराम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन
  • उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्याच्या नोंदी
  • कार्यवाही करताना आलेल्या अडचणी माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते.

स्पर्धेचे गट

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वीला अध्यापन करणारे शिक्षक किंवा मुख्याध्यापक असावेत.
  • राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती/ सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.
  • डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, जेष्ठ अधिव्याख्याता) या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.

राज्यस्तरीय Navopkram स्पर्धेचे नियम

१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येते.

२. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा.

३. नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा. नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवाला समवेत पुढे दिलेल्या नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.

४. सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये.

५. नवोपक्रम लेखन मराठी, इंग्रजी यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.

६. नवोपक्रम टाईप केलेला असावा. टाईपिंग साठी Unicode या Font चाच वापर करावा. फॉन्ट

साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू दीड इंच व उर्वरित तीन बाजूस प्रत्येकी 1 इंच समास असावा.

७. हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

८ . नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईल मध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त 5 फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करू शकता.

९ राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये १०० शब्द मर्यादेत नवोपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे.

१० स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा.

११ . नवोपक्रम फाईल PDF स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 MB पेक्षा जास्त नसावी.

१२ . नवोपक्रमाशी संबंधित व्हिडिओ असल्यास त्याची अथवा youtube वर असलेल्या व्हिडिओची लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंक वर विहित ठिकाणी नोंदवावी.

१3. जिल्हास्तर, विभाग स्तर व राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे सादरीकरण करणे बंधनकारक असेल.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी प्रतिज्ञापत्र नमूना

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी प्रतिज्ञापत्र नमूना

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी प्रमाणपत्र नमूना

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी प्रमाणपत्र नमूना
Scroll to Top