bmc clerk recruitment 2024 PDF download | Apply online at mcgm.gov.in

bmc clerk recruitment 2024 : मा. आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आदेशानुसार गट ‘क’ मधील “कार्यकारी सहाय्यक” (लिपिक) पदाच्या 1846 जागेकरीता online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती काळजी पूर्वक वाचा.

bmc clerk recruitment 2024 PDF download | Apply online at mcgm.gov.in

bmc clerk recruitment 2024 मधील एकूण संवर्ग निहाय रिक्त पदे

तपशीलएकूण भरावयाची पदे
अजा 142
अज 150
विजा (अ )49
भज (ब )54
भज (क)39
भज (ड )38
विमाप्र 46
इमाव 452
आ. दु. घटक185
सा. शै. मा. व. 185
खुला 506
एकूण पदे 1846

समांतर आरक्षण चा लाभ खालील प्रमाणे असणार आहे.

  • सर्वसाधारण
  • महिला -30%
  • माजी सैनिक-15%
  • प्रकल्पग्रस्त-5%
  • भूकंपग्रस्त-2%
  • खेळाडू-5%
  • अंशकालीन पदवीधर (सुशिक्षित बेरोजगार) -10%
  • दिव्यांग -4%
  1. भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.
  2. रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याबाबत तसेच सामाजिक व समांतर आरक्षण बदलण्याचे अधिकार किंवा भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर अंशतः किंवा पूर्णतः रद्द करण्याचे अधिकार आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना राहतील.याबाबत कोणालाही कोणताही वाद उपस्थित करता येणार नाही.
  3. सामाजिक व अन्य समांतर आरक्षणाची पदे भरण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
  4. दिव्यांग उमेदवारांनी सदर पदाची कर्तव्ये, जबाबदारी, अपेक्षित शारिरीक क्षमता/पात्रता याबाबतची अपेक्षा दर्शविणारी माहिती संदर्भित करुन त्याप्रमाणे अर्ज करणे आवश्यक आहे. 40 % पेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या उमेदवाराने दिव्यांग आरक्षणांतर्गत नियुक्तीसाठी अर्ज केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
  5. दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे खुला प्रवर्गातील उपलब्ध पदांमधून रिक्त ठेवण्यात येतील.
  6. दिव्यांग पदसुनिश्चितीनुसार विहीत पात्रता धारण करणारे दिव्यांग उमेदवार त्या-त्या जात प्रवर्गात तसेच सर्वसाधारण गटातून अर्ज करु शकतात व ते गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गटातून निवडीस पात्र ठरु शकतात व त्यावेळेस त्यांना सर्वसाधारण उमेदवारांप्रमाणे सेवा शर्ती लागू राहतील.
  7. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मागास वर्ग कक्षाचे परिपत्रक क्र. एमबीसी/2867 दि.11.11.2021 सोबतचा महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. दिव्यांग 2019/प्र.क्र.200/दि.क.2 दि.05.10.2021 अन्वये प्राप्त निर्देशानुसार व विशेष सूचनांनुसार, लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या लक्षणीय (Benchmark) दिव्यांग व्यक्तीना त्यांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर सर्व तत्सम स्पर्धा परीक्षेप्रमाणे लेखनिक व इतर सोयी-सवलती लागू राहतील.
  8. अराखीव (खुला) उमेदवारांकरिता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषांसदर्भातील अटीची पुर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरिता विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित / उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
  9. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांकरिता वित्तीय वर्ष 2022-2023 /2023-2024 करिता महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. राआधो-4019/प्र.क्र.31/16 अ दि. 12.02.2019 व दि.31.05.2021 अन्वये विहीत करण्यात आलेली कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
  10. एका उमेदवारास एकच अर्ज सादर करता येईल. कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त वेळेस अर्जाची नोंदणी केली असल्यास, त्यामधील अर्जाची फी भरल्याची विवरणे समान असल्यास फक्त शेवटची नोंदणी ग्राह्य धरण्यात येईल व इतर नोंद झालेल्या अर्जाची फी जप्त करण्यात येईल.
  11. मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये भरतीकरिता अर्ज करण्याची मुभा राहील. परंतु, एकाच उमेदवाराचे एकापेक्षा जास्त अर्ज विचारात घेता येणार नाहीत.

जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास, उमेदवार खाली नमूद केलेल्या विहित वयोमार्यादेतील असावा

अ) अराखीव ( खुला ) प्रवर्गातील उमेदवारांसाठी – किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्ष

ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – किमान 18 वर्ष व कमाल 43 वर्ष

bmc clerk recruitment 2024 निवडीचे निकष.

  1. “कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहीत केलेली अर्हता व अटी-शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा, संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहीत सामाजिक / समांतर आरक्षणानुसार निवडयादी तयार करण्यात येईल.
  2. “कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेच्या प्रश्नप्रत्रिकेचा दर्जा, पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु, त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इ. 12 वी) दर्जाच्या समान राहील. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :-
अनुक्रमांक परीक्षेचा विषय एकुण प्रश्न एकूण गुणपरीक्षेचे माध्यमकालावधी
1मराठी भाषा व व्याकरण2550मराठी100 मी.
2 इंग्रजी भाषा व व्याकरण2550इंग्रजी100 मी.
3सामान्य ज्ञान2550मराठी100 मी.
4 बौद्धिक चाचणी2550मराठी100 मी.

bmc clerk recruitment 2024 साठी अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज फक्त ऑनलाइन पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
  • ऑनलाइन पध्दतीने करावयाचा अर्ज https://portal.mogm.gov.in/for prospects/Careers-All/Recruitment/Chief Personnel Officer या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
  • उमेदवाराने वर नमूद केलेल्या संकेतस्थळास भेट देऊन जाहिरातीमध्ये नमूद मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन अर्ज सादर करावा.
  • उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ पुढीलप्रमाणे कॉलसेंटर भ्रमणध्वनी क्रमांक: 9513167668 सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत (दुपारी 01.30 ते 02.30 जेवणाची वेळ), सोमवार ते शनिवार उपलब्ध असेल.
  • उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी. तसेच परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरल्यानंतर, ई-पावतीची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी.

On website BMC recruitment Exams 2024 in click ‘Register‘ button under New User Registration header to creat your profile. The Registration Form window will open your browser.

Index page Link : Welcome | Index ( digialm.com )

Registration Link : BMC GAD 2024 ( digialm.com)

Login Link : Application Login ( digialm.com )

Scroll to Top