शब्दसमुहाबद्दल एक शब्द मराठी : शब्दसमूहाबद्दल एक शब्द या प्रकाराच्या प्रश्नांचा सराव खेळाच्या किंवा स्पर्धेच्या स्वरुपात करता येईल. शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी या प्रकाराचा खूप उपयोग होतो. मुलांनी मोजके व अचूक बोलणे यातून साध्य होते.
Table of Contents
शब्दसमुहाबद्दल एक शब्द मराठी काही उदाहरणे
- समाजाची सेवा करणारा – समाजसेवक
- लोकांचे नेतृत्व करणारा – पुढारी, नेता
- दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
- दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ
- माकडाचा खेळ करणारा – मदारी
- सापाचा खेळ करणारा – गारुडी
- अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
- देशाची सेवा करणारा – देशसेवक
- लोकांत मान्यता पावलेला – लोकमान्य
- दुसऱ्यावर अवलंबून नसणारा – स्वावलंबी
- दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा – कृतघ्न
- जादूचे खेळ करणारा – जादूगार
- शेती करणारा – शेतकरी
- विमान चालविणारा – वैमानिक
- मोजता येत नाही असे – अमाप
- देशविरोधी कारवाया करणारा – देशद्रोही
- युध्दभूमीवर पराक्रम करणारी पराक्रमी स्त्री- वीरांगणा
वाचा :- मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
- पाहणारे लोक – प्रेक्षक
- दानधर्म करणारा – दानशूर
- इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
- ज्याला कुणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
- ज्याला कुणीही जिंकू शकत नाही असा – अजिंक्य
- जिला पती आहे अशी – सौभाग्यवती
- घोडे बांधण्याची जागा – पागा
- मातीचे काम करणारा – कुंभार
- देवाचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक
- दर वर्षाने प्रसिध्द होणारे- वार्षिक
- पाण्यात राहणारे – जलचर
- बरेच आयुष्य असणारा – दीर्घायुषी
- मनातील इच्छीलेल्या सर्व वस्तू देणारी गाय – कामधेनू
- ज्याला मर्यादा नाही असा – अमर्याद
- जमिनीखालून गेलेला रस्ता – भुयार
- राजाने मान्यता दिली आहे असा – राजमान्य
- मोजकेच बोलणारा – मितभाषी
- शत्रूला सामील झालेला – फितूर
- माशासारखे डोळे असणारी स्त्री – मीनाक्षी
- देवाचे अस्तित्व मानणारा – आस्तिक
- हरणासारखे डोळे असणारी स्त्री- मृगनयना
- मोजकेच खाणारा – मितहारी
- भाषण करणारा – वक्ता
- संकट दूर करणारा – विघ्नहर्ता
शब्दसमुहाबद्दल एक शब्द मराठी विद्यार्थी सरावासाठी
- भाषण ऐकणारा – श्रोता
- ज्याला कधीही मरण नाही असा – अमर
- वाचनाची सोय असलेली जागा – वाचनालय
- देवापुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप
- गुरे बांधण्याची जागा – गोठा
- कैदी ठेवण्याची जागा – तुरुंग
- लग्नासाठी जमलेले लोक – वऱ्हाडी
- राज्यातील लोक – प्रजाजन, रयत,
- प्रजाश्रेष्ठ (महान) ऋषी – महर्षी
- पहाटेपूर्वीची वेळ – उषःकाल
- पायी जाणारा – पादचारी
- सिनेमाच्या कथा लिहिणारा – पटकथालेखक
- नाटके लिहिणारा – नाटककार
- जेथे जन्म झाला ती भूमी – जन्मभूमी
- आपण राहतो तो देश – स्वदेश
वाचा :- मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
- सतत उद्योग करणारा – दीर्घोदयोगी
- लाखो रुपयांचा धनी – लखोपती
- इंद्राची स्वर्गातील बाग – नंदनवन
- लिहिता वाचता येणारा – साक्षर
- नाणी पाडण्याचा कारखाना – टाकसाळ
- करोडो रुपयांचा धनी – करोडपती
- प्रश्नज्याचे मन स्वस्थ नाही असा – अस्वस्थ
- लिहिता वाचता न येणारा – निरक्षर
- स्वतःचा फायदा पाहणारा – स्वार्थी
- व्याख्यान देणारा – व्याख्याता
- स्वतःचा फायदा न पाहणारा – निस्वार्थी
- जमिनीचे दान – भूदान
- डोळ्यांचे दान – नेत्रदान
- विद्येचे दान – विद्यादान
- खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
- अजिबात पाऊस न पडणे – दुष्काळ
- पंधरा दिवसाचा काळ – पंधरवडा
- खूप जोराचा पाऊस – वादळ
- शंभर वर्षे आयुष्य असलेला – शतायुषी
वाचा :- मराठी जोडशब्द विद्यार्थ्यांसाठी
- मूर्तीची पूजा करणारा – मुर्तिपूजक
- अतिशय कमी आयुष्य असलेला – अल्पायुषी
- मूर्ती बनविणारा – मूर्तीकार
- देवाची पुजा करणारा – पुजारी
- विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण – पाणपोई
- सरकारने मान्यता दिलेले – सरकारमान्य
- दोन नद्या एकत्र येतात ती जागा – संगम
- शोध लावणारा – संशोधक
- कथा लिहिणारा – कथाकार
- किर्तन करणारा – किर्तनकार
- बातमी देणारा – बातमीदार
- मासे पकडणारा – कोळी
- मनाला मोहून टाकणारे – मनमोहक
- मोटार चालविणारा – चालक
- समुद्रातील किल्ला – दुर्ग
- सुंदर मूर्ती घडवणारा – शिल्पकार
- रोग्याची शुश्रुषा करणारी – परिचारिका
- wachan prerana din | Reading Inspiration Day | 15 ऑक्टोबर,वाचन प्रेरणा दिन मराठी भाषण
- NMMS Scholarship Scheme Exam 2024 Notification released
- 5+Mahatma Gandhi Jyanti bhashan Marathi | महात्मा गांधी जयंती मराठी भाषण
- Now! OBC Needs Only Non Creamylayer Certificate : उत्पंनाची अट रद्द, फक्त हवे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.सविस्तर वाचा.
- APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.