Marathi Vakprachar व Arth : मराठी भाषेच्या लेखनामध्ये किंवा भाषणामध्ये प्रचारांचा उपयोग केला असता ते भाषण किंवा लिखान प्रभावी होते. त्यासाठी Marathi Vakprachar व Arth आजच्या लेखामध्ये सरावासाठी देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यामातून जवळपास 100 पेक्षा जास्त Marathi Vakprachar व Arth सरावासाठी देत आहोत . याचा आपणास नक्कीच उपयोग होईल.
Table of Contents
Marathi Vakprachar व Arth सरावासाठी खालील प्रमाणे
वाक्प्रचार म्हणजे काय असते ? थोडक्यात वाक्प्रचार म्हणजेच – शब्दशः सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो. तोच भाषेत रूढ होऊन बसतो त्यालाच आपण वाक्प्रचार म्हणतो.
चला तर याच वाक्प्रचाराची काही उदाहरणे खाली अभ्यासू या..
- कळी खुलणे -आनंदित होणे.
- कपाळमोक्ष होणे – मरणे.
- उंटावरून शेळ्या हाकणे – प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे.
- आगेकूच करणे– पुढे पुढे जाणे.
- आभाळ कोसळणे – मोठे संकट कोसळणे.
- आग पाखडणे– दोषांचा वर्षाव करणे.
- कपाळाला हात लावणे – हताश होणे, नाराजी दाखविणे,
- कपाळ फुटणे – दुर्दैव ओढवणे.
- उखळ पांढरे होणे – खूप फायदा होणे.
- आढेवेढे घेणे – नाही नाही म्हणणे.
- आभाळ फाटणे – सर्व बाजूंनी संकट येणे.
- आकाश पाताळ एक करणे– प्रयत्नांची परिसीमा गाठणे.
- आकाशाला गवसणी घालणे -महत्त्वाकांक्षा बाळगणे.
- अंगवळणी पडणे – सवय होणे.
- अंगाची लाहीलाही होणे -अतिशय संताप होणे.
- अंग धरणे – बाळसेदार होणे.
- अवदसा आठवणे – वाईट बुध्दी सुचणे.
- अंग चोरणे -फारच थोडे काम करणे.
- कात्रीत सापडणे – दोन्हीकडून अडचणीत येणे.
- कानउघडणी करणे– चूक दाखविणे.
- कान देणे – लक्षपूर्वक ऐकणे
- कानावर हात ठेवणे – नाकबूल करणे.
- कानीकपाळी ओरडणे -एकसारखे बजावून सांगणे.
- कानोसा घेणे -चाहूल घेणे, अंदाज घेणे.
- केसाने गळा कापणे – घात करणे.
- कंठ दाटून येणे -गहिवरुन येणे.
- कंठाशी प्राण येणे – कासावीस होणे.
- कंबर कसणे– जिद्दीने तयार होणे.
- कंबर खचणे– धीर सुटणे.
- खजील होणे -लाज वाटणे.
- खडे चारणे– पराभव करणे.
वाचा : Marathi Jodshabd | मराठी जोडशब्द विद्यार्थ्यांसाठी
- खडे फोडणे -दुसऱ्याला दोष देत राहणे.
- खापर फोडणे – विनाकारण दोषी ठरविणे.
- गळा काढणे – मोठ्याने रडणे.
- गची बाधा होणे – गर्व होणे.
- गंध नसणे -अजिबात ज्ञान नसणे.
- गहिवरुन जाणे– मनातून गलबलून जाणे.
- गळ्यातला ताईत होणे -अत्यंत आवडता होणे.
- गाशा गुंडाळणे -सामानासह मुक्काम हलविणे.
- गर्क होणे -रंगून जाणे.
- गंगायमुना वाहणे – डोळ्यांतून अश्रुधारा वाहणे.
- घटका भरणे -शेवट जवळ येणे.
- घरोबा असणे -जिव्हाळ्याचे संबंध असणे.
- घर डोक्यावर घेणे – गोंगाट करणे.
- घाम जिरवणे – कष्ट करणे.
- घोकंपट्टी करणे– पाठांतर करणे.
- चाल करुन येणे– हल्ला करणे.
- चाहूल घेणे -अंदाज घेणे,
- चीज होणे -सफल होणे, वाया न जाणे.
- चौदावे रत्न दाखविणे – खूप मार देणे.
- चेहरा पडणे -लाज वाटणे.
- जिवाचे रान करणे– प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.
- जिवात जीव येणे -हायसे वाटणे.
- जिवावर बेतणे -प्राप्ण संकटात येणे.
- जिवाला जीव देणे -प्राणपणाने मदत करणे.
- जीव तिळतिळ तुटणे – हळहळणे.
- जीव भांड्यात पडणे– सुटकेची भावना निर्माण होणे.
- झुंबड उडणे -गर्दी होणे.
- टेंभा मिरवणे– ऐट दाखविणे.
- टोमणा मारणे– खोचक बोलणे.
- टंगळमंगळ करणे– कामाची चालढकल करणे.
- टाळाटाळ करणे – स्पष्टपणे नाही न म्हणणे
सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी 2024 | GK Questions and Answers in Marathi
- डांगोरा पिटणे – जाहीर करणे
- डोळ्यात सलणे – मत्सर वाटणे
- डोळा असणे -पाळत ठेवणे
- तमा नसणे – पर्वा नसणे.
- तोंड देणे -प्रतिकार करणे.
- डाळ न शिजणे– काम न होणे .
- डोळे उघडणे– शहाणपणा येणे.
- डोक्यावर बसवणे – फाजील लाड करणे.
- डोळा लागणे -झोप येणे.
- डोळे उघडणे – अनुभवाने सावध होणे.
- डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे,
- डोळ्यात धूळ फेकणे -फसवणूक करणे,
- डोळे विस्फारणे– आश्चर्याने पाहणे.
- तावडीतून सुटणे– कचाट्यातून सुटणे.
- तोंडचे पाणी पळणे– धीर सुटणे.
- तोंड घालणे -मधे मधे बोलणे.
- तोंड सांभाळणे– जपून बोलणे.
- तोंडसुख घेणे – वाटेल तसे बोलणे.
- तोंडात बोटे घालणे– आश्वर्यचकित होणे.
- तोंडाला पाणी सुटणे – लोभ उत्पन्न होणे.
- तोंडात शेण घालणे – निंदा करणे.
- तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे.
- तोंडाला तोंड देणे– भांडणे.
- तोंड फिरवणे – नाराजी व्यक्त करणे.
- थोबाड रंगविणे -थोबाडीत मारणे.
- बंडा फराळ करणे – उपाशी राहणे.
- दात धरणे– द्वेष करणे.
- दाताच्या कण्या करणे – वारंवार विनंती करणे,
- दाती तृण धरणे -शरण जाणे.
- दवंडी पिटणे -जाहीर करणे.
- दिवस पालटणे -चांगले दिवस येणे.
- दिवस फिरणे -वाईट दिवस येणे.
- धाबे दणाणणे – भीतीने घाबरून जाणे.
- धडकी भरणे-खूप भीती वाटणे.
- धारातीर्थी पडणे– लढता लढता मरण येणे.
- धूम ठोकणे– पळून जाणे.
सुविचार हिन्दी मे | हिन्दी सुविचार
- धूळ चारणे -पूर्ण पराभव करणे.
- नाक कापणे– अपमान करणे.
- नाक घासणे -शरण जाणे.
- नाकी नऊ येणे -त्रासून जाणे
- नाक मुरडणे -नापसंती दाखवणे.
- नांगी टाकणे – घाबरून जाणे.
- नाव मिळवणे – कीर्ती मिळवणे.
- निपचित पडणे -हालचाल न करता पडणे.
- पाठ पुरवणे – सारखे मागे लागणे.
- पाचावर धारण बसणे- भीतीने गोंधळून जाणे.
- पाय धरणे -शरण जाणे, माफी मागणे.
- पायपीट करणे -कष्ट करणे.
- पोटात दुखणे -मत्सर करणे.
- पाठ फिरवणे – दुर्लक्ष करणे.
- पारा चढणे -संताप होणे.
- फितूर होणे – शत्रूला सामील होणे.
- बोटे मोडणे – तिरस्कार करणे.
- बोटावर खेळविणे – आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे.
- भंडावून सोडणे – त्रासून सोडणे.
- भीतीने थरथर कापणे – खूप घाबरणे.
- मूग गिळून बसणे -गप्प बसणे.
- मांडीवर घेणे -दत्तक घेणे.
- मरणाला मिठी मारणे – स्वतःहून मरण पत्करणे.
- मात करणे -विजय मिळविणे.
- राम नसणे -अर्थहीन असणे.
- रंगात येणे – खूप मजा येणे.
- पाठ थोपटणे -शाबासकी देणे.
- पाठबळ असणे-आधार असणे.
- पाय काढणे -निघून जाणे.
- पोटात घालणे -सहन करणे.
- पायात पाय अडकविणे -अडथळा आणणे.
- पोटाबर पाय देणे- रोजंदारी बंद करणे.
- पोटात कावळे कोकलणे -खूप भूक लागणे.
- पोपटपंची करणे -अर्थ न समजता पाठ करणे.
- फडशा पाडणे – खाऊन टाकणे, नाश करणे.
- बोबडी वळणे -घाबरुन बोलता न येणे.
- बस्तान बसविणे- स्थिर होणे.
- बुचकळ्यात पडणे – गोंधळून जाणे.
- भान हरपणे -गुंगून जाणे, तल्लीन होणे.
- माशी शिंकणे -कामात अडथळा येणे.
- मेतकूट जमणे- खूप मैत्री जमणे.
- मुठीत असणे -ताब्यात असणे.
- माश्या मारणे -रिकामे बसणे.
- मुहूर्तमेढ रोवणे – शुभकार्याचा आरंभ करणे.
- रंग दिसणे -संभव असणे.
- रक्त आटवणे -खूप कष्ट करणे.
- Visits to Field Office of Officer in Directorate | संचालनालयातील अधिकाऱ्याच्या क्षेत्रीय कार्यालयाला भेटी
- DFSL Result 2024 pdf download | DFSL Maharashtra Result 2024 डाउनलोड करा
- 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर कंत्राटी शिक्षक नियुक्ती जाहिरात | Appointment of Contractual Teachers
- wachan prerana din | Reading Inspiration Day | 15 ऑक्टोबर,वाचन प्रेरणा दिन मराठी भाषण
- NMMS Scholarship Scheme Exam 2024 Notification released
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.