Marathi Mhani Aani Arth : मराठी भाषा समृध्द आणि धारदार करणारा घटक म्हणून म्हणीकडे पाहिले जाते. कारण, म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी. ‘दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादीत स्वरुपाचे अर्थपूर्ण वाक्य’ म्हणजे म्हण, marathi mhani aani arth ची सांगड मुलांना घालता आली पाहिजे.
Table of Contents

म्हणीवर अनेक प्रकारे साधारणपणे दोन गुणांचा एक प्रश्न विचारला जातो. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमाव्यतिरिक्त या पुस्तिकेत दिलेला म्हणींचा संग्रह पाठ असणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यांची शब्द संपत्ती सधन होण्याबरोबर त्यांची भाषाशैली प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
निवडक Marathi Mhani Aani Arth
- आपला हात जगन्नाथ -आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते..
- आलीया भोगासी असावे सादर -जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे.
- आयत्या बिळात (बिळावर) नागोबा -दुसऱ्यांच्या कष्टांवर स्वतःचा स्वार्थ साधणे.
- आवळा देऊन कोहळा काढणे -शुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करुन घेणे.
- अंथरूण पाहून पाय पसरावे -ऐपतीच्या मानाने खर्च करावा.
- आधी पोटोबा मग विठोबा -आधी स्वतःच्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करणे व नंतर अन्य (परमार्थाचे) काम करणे.
- अती तेथे माती -कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो.
- अति शहाणा त्याचा बैल रिकामा -जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी -शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.
- आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी -जेथे मदतीची गरज आहे, तेथे ती न पोचता भलत्याच ठिकाणी पोचणे.
- असतील शिते तर जमतील भुते -आपला भरभराटीचा काळ असला, तर आपल्याभोवती माणसे गोळा होतात.
- आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? -जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय.
- आगीतून फुफाट्यात -लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणें.
- आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन -किमान लाभाची अपेक्षा केली असताना, अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक लाभ होणे,
- इकडे आड, तिकडे विहीर -दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.
- उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग -उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
वाचा : मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
- उचलली जीभ लावली टाळ्याला -विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे.
- उथळ पाण्याला खळखळाट फार -ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाई मारतो.
- ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये -एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये.
- एक ना धड, भाराभर चिंध्या -एकांच वेळी अनेक कामे स्विकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.
विद्यार्थ्यांसाठी उपयोगी Marathi Mhani Aani Arth
- एका हाताने टाळी वाजत नाही – कोणत्याही भांडणात, भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात.
- ऐकावे जनाचे, करावे मनाचे – कोणत्याही कामाबाबत दुसऱ्यांचे मत घ्यावे, परंतु शेवटी सारासार विचार करुन आपल्या मताप्रमाणे वागावे.
- कर नाही त्याला डर कशाला? – ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भिती बाळगण्याचे कारण नाही.
- करावे तसे भरावे – दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच.
- कामापुरता मामा – गरजेपुरते गोड बोलणारा, मतलबी माणूस
- काखेत कळसा गावाला वळसा – हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे.
- कानामागून आली आणि तिखट झाली – एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे.
- काळ आला होता, पण वेळ आली नव्हती – एखादे घोर संकट येऊनही त्यातून सहीसलामत सुटणे.
- कावळ्याच्या शापाने गाय (गुरे) मरत नाही (नाहीत) – क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही. त्यांच्या थोरपणात उणेपणा येत नाही.
वाचा : मराठी जोडशब्द विद्यार्थ्यांसाठी
- कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभटाची तट्टाणी – अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही.
- कोळसा उगाळावा तितका काळाच – दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात.
- कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे (सूर्य उगवायचा) राहत नाही – निश्चित घडणारी घटना, कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
- कोंड्याचा मांडा करुन खाणे – हलाखीच्या अवस्थेत, आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे.
- कोल्हा काकडीला राजी – सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात.
- खाई त्याला खवखवे – जो बाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
- खाण तशी माती (बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा) – आईवडलांप्रमाणे मुलांची वर्तणूक असणे.
- खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी – एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यांपैकी एकाचीच निवड करणे.
- खायला काळ, भुईला भार निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.
- गरजवंताला अक्कल नसते – गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते.
- गर्वाचे घर खाली – गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्विकारावा लागतो.
- गरज सरो, वैद्य मरो – आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे.
- गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय? – केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही.
- गाढवाला गुळाची चव काय? – अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही.
- गाव करी तो राव न करी (गाव करील ते राव काय करील?)- जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करु शकतात, ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करु शकणार नाही.
- गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली – एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करुन घेणे.
- गुरुची विद्या गुरुला फळली एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
- गोगलगाय नि पोटात पाय एखाद्याचे खरे स्वरुप न दिसणे.
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!

This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.