उपक्रम यादी इयत्ता चौथी सर्व विषय | Upkram Yadi std.4th All Subject

उपक्रम यादी इयत्ता चौथी : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी म्हणजेच त्यांचा शारीरिक, भौतिक, भावनिक व सामाजिक विकास साधनेसाठी सहशालेय उपक्रमांतर्गत वर्षभर जे काही उपक्रम घ्यावे लागतात ते सर्व उपक्रम यादी इयत्ता चौथी या लेखाच्या माध्यमातून आपणासमोर सादर करत आहे.

सहशालेय उपक्रम यादी इयत्ता चौथी

उपक्रम यादी इयत्ता चौथी विषय मराठी

  • १. अलंकारिक शब्दांच्या संग्रह करणे.
  • २. “माझी आई” या विषयावर दहा ओळी लिहा.
  • ३. विविध प्राणी / पक्षी यांचा कात्रणाचा संग्रह करणे.
  • ४. तुमच्या परिसरात सण समारंभाच्या दिवशी गायली जाणारी गाणी संग्रहित करणे.
  • ५. वर्तमानपत्रात येणाच्या शैक्षणिक बातम्याचा संग्रह करणे.
  • ६. शैक्षणिक संस्था स्थापन केलेल्या थोर समाज सुधारकांचे फोटो मिळवा संग्रह करा.
  • ७. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या धाडसी मुलांची माहिती मिळवा.
  • ८. पावसाच्या नक्षत्रांची माहिती तयार करणे.
  • ९. भाषिक खेळ व शब्दकोडी तयार करणे.
  • १०. वेगवेगळया खेळांविषयीची माहिती व चित्रे जमवून संग्रह करणे .

उपक्रम यादी इयत्ता चौथी विषय गणित

  • १. विविध भौमितीक आकृत्यांचे चित्र व माहिती मिळवा.
  • २. नाणी व नोटा यांच्या संग्रह करणे.
  • ३. परिसरातील वस्तूचे त्यांचा प्रकारानूसार वर्गीकरण करणे.
  • ४. तुमच्या वर्गाचे क्षेत्रफळ काढा.
  • ५. विविध वस्तूचे वजन नोंदविणे .
  • ६. गणितातील विविध सूत्रांविषयी माहिती मिळवा व यादी तयार करणे.
  • ७. वस्तूंचा साहयाने भागाकार करणे.
  • ८. कागदापासून विविध आकार तयार करणे.
  • ९. पाढे म्हणने व यादी तयार करणे.
  • १०. गावातील किराणा दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .

उपक्रम यादी इयत्ता चौथी विषय परिसर भाग १

  • १. प्राणी व त्यांचे उपयोग यांची यादी तयार करणे .
  • २. महाराष्ट्रात कोणत्या जिल्हयात कोणता खादयपदार्थ प्रसिध्द आहे याची यादी तयार करणे.
  • ३. नकाशा तयार करणे. (गाव, तालुका, जिल्हा, राज्य कोणताही एक )
  • ४. शेतीच्या अवजारांविषयी माहीती गोळा करणे.
  • ५. वर्तमानपत्रात येणाच्या नैसर्गिक आपत्तीविषयक बातम्याचा संग्रह करणे.
  • ६. आपल्या परिसरात आढळणाच्या वनस्पतीच्या चित्रांचा संग्रह करणे व माहीती गोळा करणे.
  • ७. होकायंत्राचा सहाय्याने दिशा दाखविणे .
  • ८. तुमच्या गावातील सार्वजनिक स्त्रोतातील पाणी कोणकोणत्या कारणांनी अस्वच्छ होते त्याची माहिती मिळवा.
  • ९. गावातील व्यवसायास / शेतीस भेट देणे व माहीती गोळा करणे.
  • १०. गावातील ग्रामपंचायत / प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देणे.

उपक्रम यादी इयत्ता चौथी विषय परिसर भाग २

  • १. महाराष्ट्रातील संताची माहिती व चित्रे गोळा करा.
  • २. महाराष्ट्रातील गड व किल्ले यांची माहिती व चित्रे गोळा करा.
  • ३. नकाशात हिंदवी स्वराज्य दाखविणे .
  • ४. दिवाळीच्या सुटटीत तुमच्या मित्रांसोबत रायगडाची प्रतिकृती तयार करा.
  • ५. वर्तमानपत्रात येणाच्या ऐतिहासिक बातम्याचा संग्रह करणे.
  • ६. इतिहासावर आधारित म्हणींच्या संग्रह करणे.
  • ७. शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळाविषयी माहिती मिळवा.
  • ८. बाजी प्रभू यांच्याविषयी माहिती मिळवा.
  • ९. जवळचा किल्यास भेट देणे व माहीती गोळा करणे .
  • १०. रायगडावर सहलीचे नियोजन करणे.

उपक्रम यादी इयत्ता चौथी SUB English 

  • 1. Write the your mother tongue the name of English letters that begin with the ए sound.

    2. Tell the story.

    3. Make a list of as many things as you can using the table of page no.23.

    4. Make simple apposite words list.

    5. Names of birds and animals, their young ones, their females and their living places.

    6. Make simple rhyming words list.

    7. Make a list of Singular and plural.

    8. short conversation. about my self, Lets speak.

    9. Collect the words of ” A Garden of words”.

    १०. सोप्या इंग्रजी शब्दांची मराठी अर्थासह यादी तयार करणे.

उपक्रम यादी इयत्ता चौथी विषय कला

  • १. बडबड गीते / देशभक्तीपर गीते / लोकगीते तालासुरात म्हणणे (संगीत)

    २. गाण्यामध्ये / कथेमध्ये प्राणी, पक्षी वाहने इ. चा आवाज काढून पार्श्वसंगीत देणे. (संगीत)

    ३. स्वर व त्यांचे प्रकार याविषयी माहिती मिळविणे .

    ४. विविध वादयांच्या चित्रांचा संग्रह करणे.

    ५. चित्रकाराची मुलाखत घेणे .

    ६. मानवी चेहत्र्याचे चित्र रेखाटणे .

    ७. निसर्ग चित्र रेखाटणे.

    ८. छोटा अभिनय करणे. उदा. कृतींच्या अभिनय / वाचिक अभिनय / एकात्मिक सादरीकरण .

    ९. विविध आवाज काढणे .

    १०. नकला करणे.

उपक्रम यादी इयत्ता चौथी विषय कार्यानुभव

  • १. पूर / वादळ / भूकंप / आग इ. प्रसंगांच्या चित्रांचा संग्रह करणे. (आपत्ती व्यवस्थापन )

    २. पालेभाज्या / फळभाज्या इ. चित्रांचा संग्रह करणे. (अन्न)

    ३. शिवणकामाच्या साधनांची चित्रओळख करून देणे / चित्रांचा संग्रह करणे. (वस्त्र)

    ४. बांबू उदयोग व बांबूच्या विविध जातींची माहिती मिळविणे (कळक, चिवा, हुडा, मानवेल )

    ५. काडीपेटी पासून आगगाडी तयार करणे.

    ६. औषधी वनस्पतींविषयी माहिती मिळविणे व चित्रांचा संग्रह करणे.

    ७. राखी तयार करणे.

    ८. मातीपासून भांडी / फळे / घर बनविणे.

    ९. कागदापासून होडी / तलवार / टोपी बनविणे .

    १०. संगणकाचे विविध भाग व त्यांची माहिती तयार करणे प्रतिकृती तयार करणे.

उपक्रम यादी इयत्ता चौथी विषय शा.शिक्षण

  • १. सुर्यनमस्काराविषयी माहिती मिळविणे व त्यातील विविध कृतीचे चित्र गोळा करणे .

    २. कोणत्याही एका मुख्य खेळाविषयी माहिती मिळवा (बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, टेनिस, कबडडी, किकेट)

    ३. मानवी मनोरे करणे.

    ४. डोक्यावर वस्तूठेवून चालणे / चवडयावर चालणे.

    ५. योगासनांचे प्रकार व माहिती मिळविणे. (बंदधपदमासन, योगमुद्रा, मत्स्यासन, हंसासन, मकरासन)

    ६. लाठीचे प्रकार व मूलभूत कियांविषयी माहिती मिळविणे .

    (सीधा हाथ, उलटा हाथ, जंग मूह, दो रूख, आगे फलांग, पिछे फलांग)

    ७. स्थानिक पारंपारिक खेळ घेणे टिपरी / लेझीम / झिम्मा .

    ८. लेझीम व त्याचे प्रकार माहिती मिळविणे. (घूम जाव, जोहरा चाल, आगे फलांग, पिछे फलांग )

    ९. अॅथलेटिक्स उपकम उदा. उडया मरत पुढे जाणे पाय मागे दुमडत धावणे जागेवर उड्या मारणे .

    १०. गतिरोधक मालिका .

Scroll to Top