2024 मधील मुख्याद्यापक (प्रा.) पदोन्नतीसाठी शिक्षक संवर्गातील सेवा जेष्ठता यादी | HM Promotion-Seva jeshthata yadi

HM Promotion-Seva jeshthata yadi : जिल्हा परिषद बीड अंतर्गत मुख्याध्यापक (प्रा.) यांचे रिक्त पदे पदोन्नतीने भरावयाची असून त्याबाबत शिक्षक संवर्गांची सेवा ज्येष्ठतेनुसार प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली असून ती याद्वारे सादर करण्यात येत आहे.

2024 मधील मुख्याद्यापक (प्रा) पदोन्नतीसाठी शिक्षक संवर्गातील सेवा जेष्ठता यादी | HM Promotion-Seva jeshthata yadi

283 शिक्षकांची HM Promotion साठी Seva jeshthata yadi

सदर यादी सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे.. दरम्यानच्या काळात यादीतील काही शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या वा इतर कारणामुळे शाळा बदलल्या असण्याची शक्यता आहे, तरी बदललेल्या शाळांमुळे पदोन्नतीच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे सद्यस्थितीत शिक्षक ज्या तालुक्यात कार्यरत आहेत.

त्याच तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आक्षेप सादर करावयाचे आहे, याची सर्व शिक्षकांनी नोंद घ्यावी व संबंधित शिक्षकांकडून प्राप्त होणारे आक्षेप एकत्रित करुन आपण जिल्हास्तरावर सादर करावेत.

जिल्हास्तरावर कुठलेही आक्षेप परस्पर शिक्षकांनी या कार्यालयास सादर करु नयेत, याबाबतची सूचना गटशिक्षण कार्यालयाला देण्यात आल्या आहेत.

महत्वाचे : [दि. 09/12/2024 रोजी सकाळी 10.00 वा. पर्यंत माहिनी सादर करण्यात यावी.]

सदर सेवा जेष्ठता यादी मध्ये खाली नमूद करण्यात आलेल्या बाबी प्रामुख्याने तपासणी करण्यात यावी.

1) जेष्ठता यादी मधील जन्म दिनांक, नियुक्ती चा दिनांक आणि दिव्यांग प्रमाणपत्राचा दिनांक या बाबतची खात्री करणे.

2) ज्या शिक्षकांची प्रथम नेमणूक दिनांक 20/07/1991 आणि 15/07/1991 आहे या बाबत आक्षेप घेतला असून नियुक्ती आदेश दि.22/07/1991 रोजी निर्गमित झाले आहे असे या कार्यालयास कळविण्यात आले असल्याने आपल्या स्तरावरून तपासणी करण्यात यावी.

3) श्री. भोसले नितीन छत्रगुण स.शि, जि.प.के.प्रा. शा. अशोकनगर, बीड यांची प्रथम नेमणूक आणि दिव्यांग प्रमाणपत्र दिनांका बाबत पडताळणी करण्यात यावी.

4) सदरील यादीमध्ये निरंक असणाऱ्या गोपनीय अहवालाची प्रतवारी नमुद करून या कार्यालयाकडे सादर करण्यात यावे.

5) श्रीं. मोटे सिता संतराम, जि.प.के.प्रा.शा. नवगण, बीड यांचा प्रस्ताव या कार्यालयाकडे अपूर्ण प्राप्त झाला असून ग.शि.अ.प.स. बोड यांनी खात्री करून नाव समाविष्ट करण्यात यावे.

मुख्याद्यापक (प्रा.) पदोन्नतीसाठी शिक्षक संवर्गातील सेवा जेष्ठता यादी PDF

Scroll to Top