सेवा पुस्तक किंवा Service book म्हणजे आपला आत्मा समजले जाते. शेवटी सेवा निवृत्त्त होताना आपल्याला Seva Pustak Nondi संदर्भांतील वेगवेगळ्या अडचणींशी सामना करावा लागतो. तो त्रास कमी व्हावा असे जर आपणांस वाटत असेल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
1.Service Book बद्दल सर्वसाधारण माहिती
1.1 महत्त्वाचे
* महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 (सेवेच्या सर्व साधारण अटी) मधील नियम 36 परिशिष्ट -4 नुसार Service Book नमुना विहित करण्यात आला आहे.
* मुंबई वित्तीय नियम 1959, नियम -52 परिशिष्ट- 17 अन्वये सेवा पुस्तके अभिलेख जतनाच्या ‘अ’ वर्गात मोडते याचा अर्थ ते प्रदीर्घ कालावधीपर्यंत जतन करून ठेवणे आवश्यक असल्याने ते सुस्थितीत ठेवण्याची सुरुवातीपासूनच दक्षता घेणे आवश्यक असते.
* सेवा पुस्तके त्या कर्मचाऱ्याचा सेवेचा अत्यंत महत्त्वाचा अभिलेख आहे.सेवा पुस्तक अपूर्ण असेल /नसेल /काही आक्षेप असतील तर कर्मचाऱ्यास अधिकाऱ्यास निवृत्तीनंतरचे देय लाभ मिळण्यास अडचणी येतात.
* प्रत्येकाने आपले मूळ तसेच दुय्यम सेवा पुस्तक अध्यायवत व सुस्थितीत आहे का व त्यात सर्व आवश्यक नोंदी घेतल्या आहेत का याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
* अधिकारी / कर्मचारी यांची बदली झाल्यानंतर त्यांचे मूळ सेवा पुस्तक त्यांच्या ताब्यात देऊ नये. सदरचे सेवा पुस्तक एका कार्यालयाकडून दुसऱ्या कार्यालयाकडे विहित मार्गानेच पाठवावे.
* निवृत्ती वेतनाचे प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे पाठविताना त्या अर्जात निवृत्त कर्मचाऱ्यांचे नाव सेवा पुस्तकातील पहिल्या पानावरील नोंदीप्रमाणे असण्याची दक्षता घेण्यात यावी. (वित्त विभाग परिपत्रक 2014)
1.2 सेवा पुस्तकाचे उपविभाग
सेवा पुस्तके प्रामुख्याने पाच उपविभागात विभागले जाते.
1. पहिले पान
2.नियुक्ती तपशिल
3.रजेचा हिशोब
4. अर्थकारी सेवेची प्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या घटनांचा तपशील
5.सेवा पडताळणी
2. सेवा पुस्तकातील महत्वाच्या नोंदी:seva pustak nondi
2.1 पहिल्या पानावरील seva pustak nondi.
1. मूळ तसेच दुय्यम सेवा पुस्तक प्रत्येकी पाच ते सहा पुस्तकांचे एकत्रित बाइंडिंग करून तयार करून घ्यावे व त्याला पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत पृष्ठांकन करावे.
2. जन्मतारखेची नोंद– जन्मतारखेची नोंद घेताना तिची कशाच्या आधारे पडताळणी केली (इ. १० वी सनद )त्याचा उल्लेख करावा. जन्मतारीख अंकी व अक्षरी लिहून कार्यालय प्रमुखांनी स्वाक्षरी करावी.
3. जात व धर्म लिहिताना आपली मूळ जात लिहावी. तसेच आपण ज्या प्रवर्गातून सेवेत लागलो त्याचाही उल्लेख करण्यात यावा.
4. सेवेत प्रवेश करत असताना आपल्या शैक्षणिक अहर्तेची नोंद सेवा पुस्तकात घेऊन त्यात वाढ झाल्यास त्या प्रमाणपत्राच्या उल्लेखासह त्या नोंदी साक्षांकित कराव्यात.
5. वडीलाचे नाव व मूळ राहण्याचे ठिकाण
6. मेडिकल सर्टिफिकेट अर्थात वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंद.
2.2 प्रथम नियुक्तीनंतरच्या seva pustak नोंदी
7. प्रथम नियुक्ती आदेश
8. प्रथम रुजू दिनांक
9. प्रथम नियुक्ती स्थायी/ अस्थायी बाबतची नोंद व नियुक्तीचा प्रवर्ग
10. नियुक्ती पदनाम व वेतन श्रेणी
11. स्वग्राम घोषणा पत्राची नोंद
12. गट विमा योजना सदस्य नोंद
13. अपघात विमा योजना सदस्य नोंद व विमा कपात रक्कम
14. मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण / सूट नोंद
15. हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण / सूट नोंद
16. संगणक अहर्तता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची/ सूट नोंद
17. चारित्र्य पडताळणी नोंद
18. स्थायी प्रमाणपत्राची नोंद
19. जात पडताळणी बाबतची नोंद
20. टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद
21. भविष्य निर्वाह निधी (GPF) खाते क्रमांक नोंद
22.DCPS/ NPS खाते क्रमांक नोंद
23. विभागीय परीक्षा उत्तीर्ण अथवा सूट नोंद
24. परिविक्षाधीन कालावधी समाप्त करून नियुक्ती नियमित केलेल्या आदेशाची नोंद
25. छोटे कुटुंब प्रमाणपत्र
26. अपंगासाठी राखीव पदावर नियुक्ती झाल्यास अपंगत्वाबाबतचे विहित वैधता प्रमाणपत्र
27. निष्ठेची शपथ पत्र कर्मचाऱ्याकडून घेऊन ते साक्षांकित करून सेवा पुस्तकात चिकटावे. (शासन परिपत्रक सा. प्र. विभाग दिनांक 11/9/ 2014 व दिनांक 6/10/2015 )
2.3 seva pustak nondi बाबी / घटना
28. वार्षिक वेतनवाढ
29. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्रमांक 8 मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी.
30. बदली झाली असल्यास बदली आदेश, कार्यमुक्तीचा आदेश, नवीन पदावर रुजु झाल्याचा दिनांक, इत्यादी तपशिलाची नोंद जेथे पदग्रहण अवधी अनुज्ञेय असेल तेथे पदग्रहण अवधीची नोंद
31.पदोन्नती / पदावन्नतीच्या आदेशाची नोंद
32. पदोन्नती / पदावन्नतीच्या पदावर रुजु दिनांकाची नोंद
33. पदोन्नती / पदावन्नतीच्या पदाच्या वर्गाची / वेतनश्रेणीची व वेतन निश्चितीच्या आदेशाची नोंद
34.वेतन निश्चितीसाठी विकल्प दिला असल्यास त्याची नोंद
35. पदोन्नती / वेतन आयोग / कालबध्द पदोन्नतीमुळे / एकस्तर पदस्थापनेमुळे वेतन निश्चिती केल्याची नोंद
36. ज्या वेळेस वेतन श्रेणीत बदल झाला असेल त्यावेळेसची वेतन आयोगानुसार पडताळणी पथकाकडुन करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची नोंद
37. मनासे (वे सु) नियम 1978 नुसार वेतन पडताळणी पथकाकडुन वेतननिश्चिती पडताळणी झालेली नसल्यास शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 20-08-1986 नुसार कार्यालय प्रमुखाने नोंदविलेल्या प्रमाणपत्रकाची नोंद.
38. ज्या वेतन श्रेणीत दक्षता रोध येत असेल तो दक्षता रोध पार करण्यास मंजुरी दिलेल्या आदेशाची नोंद (उदा. 1200-30-1440-EB-30-1800)
39. एखाद्या पदावरील नियुक्ती तदर्थ/तात्पुरची स्वरुपाची असल्यास त्या आदेशाची नोंद व ती नियुक्ती नियमित केली असल्यास त्याची नोंद
40. अनिवार्य प्रशिक्षण/सेवार्गत प्रशिक्षणाची नोंद / पायाभूत प्रशिक्षण / विदेश प्रशिक्षणासाठी पाठविले असल्यास त्याची नोंद
41. ज्या पदावर काम करित असेल ते पद कोणत्या प्रवर्गातील/गटातील आहे त्याची नोंद
42.वार्षिक सेवा पडताळणी नोंद
43.स्वग्राम/महाराष्ट्र दर्शन रजा सवलत घेतल्याची नोंद
44. गट विमा योजना वर्गणीत बदल झाल्यास त्याची दिनांक निहाय व थकीत रकमेसह वसुलीची नोंद.
45.वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा रोखीने / GPE / मध्ये जमा तपशिल प्रमाणक क्रमांक व दिनांक
2.4 विशिष्ठ बाबी / घटना–
46.सेवेतून कमी केली असल्यास त्या आदेशाची नोंद
47.पुर्ननियुक्ती केली असल्यास त्या आदेशाची नोंद
48.दोन नियुक्तीमध्ये, खंड असल्यास खंडाची नोंद
49.दोन नियुक्त्यांमधील खंड क्षमापित केला असल्यास त्याची नोंद
50.सेवा कालावधीतील निलंबन, निलंबन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद
51.सेवेतील झालेली शिक्षा
52.संपात सहभाग घेणे
53.राजीनामा देणे / परत घेणे
54.अनाधिकृत गैरहजेरी
55.पुरस्कार / गौरव / तदनुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी
56.आगाऊ वेतनवाढी मंजुर केलेल्या आदेशाची नोंद व वेतननिश्चीती किंवा ठोक रकमा मंजुर केल्याची नोंद.
57.सक्तीचा प्रतिक्षाधीन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद.
58.वेतन समानीकरणाची नोंद
59.मानीव दिनांक देण्यात आला असल्यास त्याची नोंद
60.नावात बदल झाला असल्यास सप्रमाण नोंद
61. जनगणना रजेची नोंद
62. सुट्टीच्या कालावधीतील प्रशिक्षण नोंद
2.5 स्वियेत्तर सेवेतील नोंदी-
63.स्वियेत्तर सेवेतील नियुक्ती आदेशाची नोंद कालावधीसह
64.स्वियेत्तर सेवेतून मूळ विभागात प्रत्यावर्तन आदेशाची नोंद
65.स्वियेत्तर सेवेत रजावेतन / निवृत्तीवेतन अंशदानाच्या भरणा केलेल्या रकमा
66.स्वियेत्तर सेवेतील महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त No Dues प्रमाणपत्राची नोंद.
67.प्रतिनियुक्ती कालावधीतील गट विमा योजना, रजा लेखा नोंदी घेण्यात याव्यात.
2.6 रजा व तत्सम नोंदी
68. शासन निर्णय वित्त विभाग दि. 9 – 11 – 1990 नुसार आगाऊ जमा करावयाच्या रजा नोंदी
69.कर्मचा-याने वेळोवेळी उपभोगलेल्या व मंजुर केलेल्या रजा नोंदी रजा मंजुर आदेश रजा
लेखा नोंदीसह.
2.7 विविध नामनिर्देशन
70. गट विमा योजना नामनिर्देशन
71. भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन
72. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद
73. मृत्य नि सेवा उपदानाची नामनिर्देशनाची नोंद
74. DCPS/NPS नामनिर्देशनाची नोंद
75. अपघात विमा योजना नामनिर्देशनाची नोंद
76. कुटुंब प्रमाणपत्र
2.8 विविध अग्रीमे नोंदी-
77. शासकीय कर्मचारी / अधिकारी यांना मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिमाच्या नोंदी – (शासन निर्णय
वित्त विभाग दि. 5.9.2000 )
अ) 1) अग्रिमाचा मंजुरी आदेश क्रमांक व दिनांक
2) हयात अपत्यांची संख्या
ब) मंजुर अग्रिमाची एकूण रक्कम रुपये व प्रदान करावयाच्या हप्त्यांची संख्या
क) 1) प्रदान करावयाचा हप्ता क्रमांक
2) हप्त्याची रक्कम रुपये
3) प्रमाणक क्रमांक व दिनांक रुपये
ड) परतफेडीच्या
1) हप्त्यांची संख्या
2) दरमहाच्या समान हप्त्याची रक्कम रुपये
3) परतफेड ज्या महिन्याच्या वेतनातून सुरु होणार आहे तो महिना
ई) मदतपूर्व जादा परतफेडीच्या रकमेची नोंद १) रक्कम रुपये २) चलन क्रमांक दिनांक
78. सहकार विभागाकडून लेखाशीर्ष 6216- गृहनिर्माणसाठी कर्ज मंजूर झालेल्या व वितरीत केलेल्या घर बांधणी कर्जाच्या प्रत्येक हप्प्त्याची नोंद सेवापुस्तकात घेणे आवश्यक आहे. ( शा. परिपत्रक सहकार, पणन व वस्त्रे उद्योग विभाग दि 25.8.2011)
79. घरबांधणी अग्रीम व व्याज वसूल झाल्यानंतर प्राप्त No Dues प्रमाणपत्राची नोंद
80. घरबांधणी अग्रीम वरील Accured Interest चा फायदा घेतला असल्यास त्याची नोंद- (शासन निर्णय वित्त विभाग दि. 3.7.2002 )
2.9 सेवा निवृतीनंतरच्या नोंदी-
81. सेवा निवृत्त / शासकीय सेवेतून कार्यमुक्त केल्याची नोंद.
82. महालेखापाल कार्यालयाकडुन मंजुर अंतिम सेवानिवृत्ती वेतन, DCRG, निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरणाची नोंद
83. रजा रोखीकरण, रक्कम व प्रमाणक क्रमांक व दिनांकाची नोंद.
84. GPF अंतिम प्रदान रक्कम प्रमाणक क्रमांक व दिनांक AG च्या मंजुरी आदेशासह नोंद
85. सेवानिवृत्तीनंतर गट विमा योजनेचे प्रदान केल्याची रक्कम प्रमाणक क्रमांक व दिनांकासह नोंद.
2.10 सेवापुस्तकाची वार्षिक पडताळणी:-
86. म. ना. से. (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981 मधील नियम 45 नुसार सेवापुस्तकाची वार्षिक पडताळणी करणे आवश्यक आहे.
87. प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यामध्ये कार्यालय प्रमुखाने वार्षिक पडताळणी करावी.
88. कार्यालय प्रमुख वेतन देयके, वेतनपट आणि नमुद करण्यात येतील असे तत्सम अभिलेखे यावरुन सेवेची पडताळणी मागील वित्तीय वर्षाच्या अखेरपर्यंत केल्याचे प्रमाणपत्राची नोंद घेणे.
2.11 इतर महत्त्वाच्या सूचना-
89. कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर कर्मचा-यास दुय्यम सेवापुस्तक अद्यावत करुन दिले असल्याची नोंद मुळ सेवापुस्तकात घेऊन त्यावर कर्मचा-याची स्वाक्षरी घ्यावी
90. बालसंगोपन रजेचा स्वतंत्र रजा लेखा ठेवणे आवश्यक आहे.
91. स्त्री कर्मचारीने वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीसाठी आईवडील ऐवजी सासुसासरे यांची निवड केली असल्यास त्याची नोंद
92. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षानी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
93. दरवर्षी माहे सप्टेंबरमध्ये अखेर वित्तिय वर्ष निहाय मूळ सेवा पुस्तकातील नोंदी दुय्यम सेवापुस्तकात घेऊन व तसे प्रमाणपत्र मुळ सेवापुस्तकात नोंदवुन व त्यावर सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.
94. दुय्यमसेवा पुस्तकाची प्रत कर्मचा-यास देऊन त्याची स्वाक्षरी घेण्यात यावी.
95. सेवार्थ ID, आधार नंबर, PAN नंबर, DDO Code एका वेगळ्या कागदावर लिहून तो कागद सेवापुस्तकात चिकटावा.
96. कार्यालयात/कार्यालयातुन रुजू / कार्यमुक्ताच्या नोंदी घेताना मध्यान पूर्व / मध्याननंतर जरुर लिहावे
97. निवृत्ती वेतनासाठी अर्हताकारी नसणारा कालावधी लाल शाईने दर्शविणे आवश्यक आहे.
98. ज्या ज्या वेळेस नामनिर्देशन (nomination) अद्यावत केली जातात तशी नोंद सेवा पुस्तकात घेणे आवश्यक आहे.
99. शासन निर्णय वित्त विभाग दि. 01/09/2005 अन्वये सेवापुस्तकात वेतनविषयक बाबींची नोंद घेत असताना त्यामध्ये महागाई वेतनाची नोंद स्वतंत्रपणे घेण्यात यावी.
100. राजपत्रित अधिकारांच्या बाबतीत दि.30.11.1989 पर्यतच्या सेवेचे अभिलेखे महालेखापाल यांनी ठेवलेल्या नमुना न. 25 रजा लेखा हिशोबासह ठेवलेले प्राप्त करून घेवून त्यातील नोंदी सेवा पुस्तकात घेणे.
3.सेवापुस्तकांना चिकटवायचे महत्वाचे दस्तावेज
शक्यतो सर्व महत्त्वाचे आदेश / प्रमाणपत्र सेवापुस्तकात लावावे म्हणजे ते तात्काळ उपलब्ध
होतात, जसे
1. वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical certificate)
2. जात वैधता प्रमाणपत्र ( Cast validity)
3. नामनिर्देशन ( Nominations)
i. GIS (गटविमा)
ii. GPF ( भविष्य निर्वाह निधी)
iii. Pension
iv. DCRG
v. NPS
vi. DCPS
vii. कुटुंब प्रमाणपत्र
viii. अपघात विमा
4. वेतन निश्चिती (वेतन आयोग / पदोन्नती / इतर)
5. विकल्प (option) Form
6. ज्यादा रक्कम अदायगी वसुलीचे हमीपत्र
7. वेतन आयोग फरकाच्या हप्तेचा तपशिल, तसेच प्रदान रकमेचा प्रमाणक क्रमांक व दिनाकासह
8. चारित्र्य प्रमाणपत्र
9. MSCIT / तत्सम प्रमाणपत्र
10. नाव बदललेले असले तर त्याबाबतचे राजपत्र
11. स्वग्राम घोषित आदेश
12. GIS बद्दल आदेश
13. स्थायित्व प्रमाणपत्र आदेश
14. परिविधाधीन कालावधी पूर्ण केल्याचा आदेश
15. मराठी / हिंदी परिक्षा पास / सुट आदेश
16. विभागीय परीक्षा उत्तीर्ण / सूट आदेश
17. शा. परिपत्रक वित्त विभाग दि.20.1.2001 नुसारचे विवरणपत्र
4.सेवापुस्तक नोंदीतील महत्त्वाचे आक्षेप
1. सेवापुस्तकातील रजा लेखा अपूर्ण असणे.
2. सेवापुस्तकातील रजा लेखा चुकीचा असणे.
3. सेवापुस्तकात मराठी/हिंदी भाषा परिक्षा सुट आदेश नोंद नसणे.
4. वेतननिश्चितीसाठी विकल्प न घेणे.
5. वेतननिश्चितीमधील आक्षेप.
6. चारित्र्य पडताळणी झाल्याची नोंद नसणे.
7. स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद नसणे.
8. शासन निर्णय वित्त विभाग दि.05.05.2010 नुसार आवश्यकत्या प्रकरणात वेतननिश्चिती सुधारीत न केल्यामुळे येणारी वसुली.
9. स्वग्राम घोषित केल्याची नोंदी नसणे.
10. गटविमा योजना वर्गणी कपात रक्कमांची नोंद नसणे
11. टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण नोंद नसणे.
12. विविध नामनिर्देशनाच्या नोंदी नसणे.
13. कार्यालय प्रमखाने दर 5 वर्षांनी पहिल्या पानावरील नोंदी प्रमाणित न करणे.
14. सेवा पडताळणी नोंद नसणे.
15. शा.नि. वित्त विभाग दि.1.9.2015 नुसार सुधारित वेतन संरचनेमध्ये वार्षिक वेतनवाढ मंजूर करताना कर्मचारी यांचे वेतन कमाल टप्पाचे पुढे जात असेल तर अशा प्रकरणी ते वेतन त्या कमाल टप्पावर सीमित
न करणे
16. सेवाप्रवेशोत्तर परिक्षा विहित संधीत उत्तीर्ण न होता वेतनवाढी प्रदानाबाबत
17. संगणक अर्हता परीक्षा विहित दिनांकास उत्तीर्ण न झाल्याने वेतनवाढीचे अतिप्रदान
18. पदोन्नतीची वेतननिश्चीती चुकीच्या वेतनावर करणे
19. सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ चुकीच्या वेतनावर अदा करणे
20. एकाकी पदास ग्रेड वेतन चुकीचा अदा केल्याने अतिप्रदान
21. एकस्तर पदोन्नती क्षेत्रासाठी एकस्तर पदोन्नती योजनेची वेतननिश्चीती चुकीच्या वेतनावर करणे
22. एकस्तर पदोन्नती योजनेची वेतननिश्चीती जोडपत्र- 3 नुसार केल्याने अतिप्रदान.
23. एकस्तर पदोन्नती योजनेची वेतननिश्चीती एकस्तर वरुन एकस्तर योजनेत केल्याने अतिप्रदान
24. आश्वासित प्रगती योजना मंजुर असतांना एकस्तर पदोन्नती योजनेअंतर्गत वेतन अदा केल्याने अतिप्रदान
25. रजा लेखा चुकीचा लिहिल्याने रजारोखीकरणाचे अतिप्रदान
26. विहित नामनिर्देशन / प्रमाणपत्र व नोंदी न घेणेबाबत
27. पदोन्नती / आश्वासति प्रगती योजनेचा विकल्प मंजुर नसतांना वेतननिश्चीती केल्यामुळे अतिप्रदान.
अशाप्रकारे सेवा पुस्तका संदर्भातील सर्व माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे.आपणांस ही माहिती कशी वाटली खाली कमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद……
हि पोस्ट तुम्हाला आवडी असल्यास नक्की कमेंट करा
आम्हाला Follow करा. 👇👇👇👇
Telegram : https://t.me/+H9CutnnkwVswNzk1
हे देखील वाचा :
- Prakalp | प्रकल्प यादी मराठी
- Norman Richard | नॉर्मन रिचर्ड मराठी माहिती
- Scientist Information In Marathi | शास्त्रज्ञांची माहिती
- New Education Policy 2023 | मुलांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार !
- Teacher training | शिक्षक प्रशिक्षण व नवे प्रशिक्षण धोरण
- Yoga Information In Marathi | योगाचे प्रकार व माहिती
- Vidyarthi विविध Yojana | 12 विद्यार्थी लाभाच्या योजना
- Morning Assembly Anchoring Script | इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन
- 15 August Speech In Marathi | Bhashan | 15 ऑगस्ट भाषण
- Olympic Medalist in India | ऑलिम्पिक पदक विजेते
- Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा 50 | संस्कार कथा
- Marathi Suvichar I 1000+ मराठी सुविचार संग्रह
अधिक नवीन माहिती साठी आमच्या Telegram
ग्रूप ला Join व्हा.
Telegram 👇👇👇
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.
Table of Contents