RIMC Dehradun Scholarship : महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून RIMC Dehradun Scholarship ही प्रवेश परीक्षा जून व डिसेंबर अशा दोन सत्रात घेतली जाते व प्रत्येक सत्रात दोन अशा एकूण चार विद्यार्थ्याची प्रतिवर्षी निवड करण्यात येते.
Table of Contents
RIMC Dehradun Scholarship योजनेची उद्दीष्ट, व्याप्ती, पार्श्वभूमी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून ही प्रवेश परीक्षा जून व डिसेंबर अशा दोन सत्रात घेतली जाते व प्रत्येक सत्रात दोन अशा एकूण चार विद्यार्थ्याची प्रतिवर्षी निवड करण्यात येते निवड झालेल्या विद्यार्थ्याला इयत्ता 8 वी ते 12वी पर्यंत असे पाच वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. शासन निर्णय क्रमांक एससीएच 1098 / ( 80/98) माशि 8दिनांक 6/11/98 अन्वये प्रतिवर्षी प्रति विद्यार्थ्यास रुपये 40,000/- देण्यात येते. विद्यार्थ्याच्या प्रगती अहवाला आधारे व शिक्षण पुढे चालू ठेवलेल्या अशा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.
शिष्यवृत्तीचे संच व दर – एकूण वार्षिक 4 विद्यार्थी, शासन निर्णय दि.25 जुलै, 2017 अन्वये शिष्यवृत्ती मध्ये रु.40,000/- वार्षिक वाढ करण्यात आलेली आहे. तसेच सदर लाभ हा जानेवारी, 2017 च्या सत्रापासून नव्याने प्रवेश घेतलेल्या तसेच संस्थेत शिक्षण पुढे चालू ठेवलेल्या विद्यार्थ्यांना देय आहे.
पात्रतेचे निकष –
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून ही प्रवेश परीक्षा जून व डिसेंबर अशा दोन सत्रात घेतली जाते. सदर परीक्षेत विद्यार्थी पात्र असावा.
1. मान्यता प्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी वर्गात शिकत असलेला किंवा इयत्ता 7 वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी.
2.प्रवेश घेतेवेळे विद्यार्थ्यांचे वय 01 जानेवारी रोजी 11.5 (साडे अकरा वर्षे) वर्षापेक्षा कमी व 13 वर्षापेक्षा अधिक नसावे.
3. परीक्षार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
परीक्षेचे माध्यम –
हिंदी आणि इंग्रजी
- परीक्षेचा कालावधी प्रत्येक वर्षी 01 व 02 जून पुढील वर्षी जानेवरीच्या प्रवेशासाठी आणि 01 व 02 डिसेंबर पुढील वर्षी जुलैच्या प्रवेशासाठी
- परीक्षेचे शुल्क आवेदन शुल्क सर्वसाधारण विद्यार्थी रु.600/- व एससी व एसटी रु.555/- चा भारतीय स्टेट बँक चा डीडी कमाउंट, आर.आय.एम.सी. डेहराडून यांचे नावे काढलेला असावा.
परीक्षेचे विषय-
पेपर 1 – इंग्रजी (गुण-125, वेळ : 02 तास)
(Reading Section – 20 marks, Writing Section, 30 marks, Grammar- 75 marks)
पेपर 2 – गणित (गुण-200 वेळ 1 तास 30 मिनिटे)
पेपर 3– सामान्यज्ञान (गुण-75, वेळ 1 तास)
मुलाखत – 50 गुण (मुलाखतीस पात्र ठरण्यासाठी लेखी परीक्षेत 50 टक्के गुण आवश्यक आहे.)
परीक्षा केंद्र – पुणे
शिष्यवृत्तीची रक्कम – महाराष्ट्र शासन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी रु.४०,०००/- एवढी शिष्यवृत्ती देते. (आर.आय.एम.सी.डेहराडून या संस्थेस रक्कम दिली जाते.)
Vidyarthi Labhachya Yojana
2. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना. (National Means – Cum-Merit Scholarship Scheme) NMMSS
- पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना (इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती योजना)
- धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी असलेली केंद्र पुरस्कृत मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना (Pre-Matric Scholarship Scheme Minority Students)
- धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीनीसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना (BHMNS)
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना (Pre Matric Scholarship for Students with Disabilities)
- कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती (2202 0371)
- आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती (2202 1251)
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारची संस्कृत शिष्यवृत्ती (2202 1062, 2202 1071)
- मराठी भाषा फाउंडेशन योजना (100% राज्य शासन पुरस्कृत)
- 12 व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत बहु क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत (MsDP) मान्यता प्राप्त राज्यातील संबंधित 09 जिल्ह्यातील 08 गट व 06 शहराकरिता सायबर ग्राम योजना.
- राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना.
- प्राथमिक शाळेतील पुस्तक पेढ़ी योजना
- माध्यमिक पुस्तक पेढ़ी योजना
- इयत्ता 1 ली ते 4 थी मधील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता योजना
- जिल्हा बालभवन योजना
- राज्यातील शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या 103 विकास गटातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळा मधील इयत्ता 1 ली ते 4 थी मधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके. 22023365
- जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळातील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सुविधा (मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा) 22023664
- राज्यातील शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या 120 विकास गटातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा करणे.22023646
- माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती
- स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती
- प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना विहित आर्थिक दराने मदत देणे. लेखाशीर्ष 22021429
- राज्यातील अनुदानित माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर (इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर स्तर) विहित दराने शैक्षणिक लेखाशीर्ष-22022926
- इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण लेखाशिर्ष (2202 3056)
- इयत्ता 11 वी, 12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण लेखाशिर्ष (2202 2523)
- ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख पेक्षा अधिक नाही. अशा इयत्ता अकरावी व बारावी मध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्यांना फी माफी (योजनेत्तर योजना) लेखाशीर्ष-2202 1474
- आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन लेखाशिर्ष-2202 1204
- मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांनी घोषित केलेले विशेष पॅकेज अंमलबजावणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांतर्गत द्यावयाच्या शैक्षणिक सवलती.(लेखाशोर्ष-2202 एच 151)
- टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / प्रतिपूर्ती लेखाशीर्ष(2202 2588)
- अल्पसंख्यांक समाजाच्या संस्था / मदरसांकरिता शिक्षण देणे बाबत योजना. S.P.E.M.M-Scheme for Providing Education in Madarsa / Minorities
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!