राज्यवर्धनसिंह राठोड यांचा जन्म दि. 29 जानेवारी 1970 रोजी जैसलमेर, राजस्थान याठिकाणी झाला. राजवर्धनसिंह राठोड यांना लहानपणापासून क्रिकेट खेळण्याचा छंद होता.
राज्यवर्धनसिंह राठोड रणजी क्रिकेटचषक सामन्यासाठी मध्यप्रदेश क्रिकेट संघाकडून निवड झाली होती. परंतु त्यावेळी राजवर्धनसिंह यांचे शिक्षण पूर्ण झालेले नसल्याने त्यांच्या आईने त्यांना NDA (National Defence Academy) मध्ये प्रवेश दिला. पुढे त्यांनी इंडियन मिलीटरी अकादमी, डेहरादुन येथे त्यांनी शिक्षण घेतले. इंडियन मिलीटरी अकादमी, डेहरादुन येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यदलात प्रवेश घेतला. पूढे ते कर्नल झाले. सन 2017 साली ते भारताचे क्रिडा मंत्री झाले. भारताचे क्रिडामंत्री म्हणून काम पाहणारे ते प्रथम खेळाडू होते. भारतीय सेनेत लेफ्टनंट या पदावर असलेल्या राजवर्धनसिंह राठोड यांनी 2004 च्या ऑल्मपिकमध्ये पुरुषांच्या डबल ट्रॅप या नेमबाजी प्रकारात रौप्य पदक मिळवले. 2005 मध्ये झालेल्या आशियाई क्ले शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक मिळवून देण्यात राजवर्धनसिंह यांचा महत्वाचा वाटा होता.
राज्यवर्धनसिंह राठोड यांनी आशियाई स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्णपदक जिंकले. 2006 च्या कॉमनवेल्थ गेम्स आणि 2008 मध्ये बिजींग येथील ऑल्मिपिक खेळांमध्ये भारताकडून ते ध्वजवाहक राहीले आहेत. 2006 ते 2008 च्या दरम्यान त्यांनी डबल ट्रॅप या नेमबाजी प्रकारात 25 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. अतिविशिष्ट सेवा पदक मिळविणारे ते ब्रिगेडियर या दर्जाखालील पहिलेच सैनिक आहेत. राजस्थान मधील जयपुर ग्रामीण मतदारसंघातून 2019 च्या लोकसभेवर ते निवडून गेले आहेत. तीन लाखापेक्षा अधिक मतांनी त्यांचा विजय झाला होता.
राज्यवर्धनसिंह राठोड हे ऑल्मिपिकमध्ये भारताला पहिले रौप्यपदक मिळवून देणारे खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. राजवर्धनसिंह यांच्या खेळाचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना 2003-04 या वर्षी अर्जुन पुरस्कार, 2004-05 या वर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तर 2005-06 या वर्षी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
You May Also Know:
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.