योगेश्वर दत्त l ऑल्मिपिक कांस्य पदक विजेता २०१२

योगेश्वर दत्त यांचा जन्म दि. २ नोव्हेंबर १९८२ रोजी हरियाणा राज्यातील सोनीपेठ जिल्हयातील भैंसवाल कालन येथे झाला. योगेश्वर दत्त यांना शिक्षकी वारसा असलेले कुटुंब लाभले.

कुस्ती खेळाची प्रेरणा त्यांना त्यांच्या गावातील नावाजलेले कुस्तीपटू बलराज पहेलवान यांचेकडून मिळाली. कुस्ती खेळामध्ये योगेश्वर दत्त यांनी करिअर करावे असे सुरवातीला त्यांच्या कुटुंबियांना वाटत नव्हते. परंतु हळूहळू योगेश्वर यांची कुस्ती खेळातील प्रगती पाहून त्यांच्या वडीलांकडून त्यांना पाठबळ मिळाले.

योगेश्वर दत्तने 2006 मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 60 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होण्याच्या अवघ्या 9 दिवस आधी त्याने आपल्या वडिलांना गमावले होते.. तसेच 2010 मध्ये योगेश्वर दत्तने बाजी मारली होती. गुडघ्याला दुखापत असूनही 2010 मध्ये दिल्ली येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 60 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक.

योगेश्वर यांना कुस्तीमध्ये विशेष आवड होती. त्यांनी आपला कुस्तीतील सराव कायम ठेवत. पुढे त्यांनी २०१२ साली लंडन येथे झालेल्या ऑल्मिपिक क्रिडा स्पर्धेत सहभाग नोंदवला व पुरुष गटात ६० किलो वजन गटातील फ्रीस्टाईल कुस्ती मध्ये कांस्यपदक भारताला मिळवून दिले.

योगेश्वर दत्त हा ऑल्मिपिक खेळात कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावणारा 3 रा भारतीय ठरला. कौटुंबिक परिस्थिती बाजुला सारत व शारिरीक दुखण्यावर मात करत मिळवलेला विजय हा त्याखेळातील रुची दर्शवितो. विद्यार्थ्यांनी योगेश्वर दत्त यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या आवडत्या खेळात स्वतःचे, कुटूंबाचे व राष्ट्राचे नाव कमावणे आवश्यक आहे

 

Scroll to Top