निरज चोप्रा l ऑल्मिपिक सुवर्ण पदक विजेता 2020

निरज चोप्रा हे भारतीय भालाफेक पटू आहेत. त्यांचा जन्म दि. 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणा राज्यातील खाद्रागांव, पानीपत येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नीरज सतिषकुमार चोपडा (चोप्रा) असून त्यांचे शिक्षण डी.ए. व्हि. कॉलेज, चंदीगढ येथे झाले.

निरज चोप्रा काकांसोबत पंचकुला येथील शिवाजी मैदानावर जायचे. त्यावेळी काकांनी त्यांना भालाफेक खेळाची माहिती करून दिली. निरज चोप्रा यांचे मूळ आडनाव चोपडे असे आहे. नीरज चोप्रा यांना दोन बहिणी असून त्यांचे वडील शेतकरी आहेत. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण हरियाणा मध्येच पूर्ण केले. निरज यांना लहानपणापासूनच भालाफेक या खेळामध्ये आवड होती. कुटुंबाकडून पाठबळ मिळवत त्यांनी भालाफेक खेळामध्ये करियर करायचे ठरवले, त्यांनी जर्मनीचे जेवेलीन थ्रो चे खेळाडू राहीलेले उसे होन यांचेकडून मालाफेकीचे प्रशिक्षण घेतले.

निरज चोप्रा यांनी भालाफेकमध्ये पारंगत होत विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतला. 2012 साली त्यांनी राष्ट्रीय कनिष्ठ चैम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 2013 साली राष्ट्रीय युवा अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक मिळाले, 2016 या वर्षी तिसरा जागतिक कनिष्ठ पुरस्कार 2016 या वर्षी आशियाई कनिष्ठ चौम्पयनशिप स्पर्धेत रौप्य पदक तर 2010 च्या आशियाई अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. तसेच 2018 साली गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत 86.47 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून निरज यांनी सुवर्णपदक मिळवले.

2018 साली जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत 86.47 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून नीरज पानी सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रिडा स्पर्धेत भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी ध्वजधारक होण्याचा मान निरज यांना दिला गेला. 2020 टोकियो] उन्हाळी ऑल्मिपिकमध्ये दि. ७ ऑगस्ट 2021 रोजी 87.58 मीटर भालाफेक करून त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.  ऑल्मपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू म्हणून निरज यांनाओळखल्या जाते. तसेच ऑल्मपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय खेळाडू आहे. त्यांनी फ्रान्स मध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत 85.17 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर ‘दोहा डायमंड लिग मध्ये त्यांनी 87.43 मीटरचा राष्ट्रीय उच्चांक प्रस्थापित केला.

निरज चोप्रा यांच्या भालाफेक या खेळातील कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना 2018 मध्ये ‘अर्जुन पुरस्कार, 2019 मध्ये ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ तर 2022 मध्ये ‘पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निरज चोप्रा यांचेकडून खेळाची प्रेरणा घेऊन विद्यार्थी निश्चितच त्यांना आवड असलेल्या खेळात प्रगती साध्य करतील यात शंका नाही.

You May Also Know:

    1. Major Ramswamy Parmeswaran
    2. Quarter Master Havildaar Abdul Hamid
    3. Captain Manoj Kumar Pandey
    4. Captain Vikram Batra
    5. Naib Subedar Banasingh
    6. Rifle Man Sanjay Kumar
    7. Major Rama Raghoba Rane
    8. Major Piru Singh
    9. Subhedar Jogindar singh
    10. Major Shaitan Singh Bhati 
Scroll to Top