मेरी कोम | ऑल्मिपिक कांस्य पदक विजेता 2012

मेरी कोम यांचे पूर्ण नाव मंगते चुंगनेजंग मेरी कोम असे आहे. त्यांचा जन्म मणिपूर येथील दुर्गम खेडे कांगथेई याठिकाणी दि. 1 मार्च 1983 रोजी झाला.मेरी कोम यांच्या कुटुंबाची परिस्थिती ही सर्वसाधारण होती.बँकॉकच्या आशियाई स्पर्धेमध्ये मणिपूरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकाविल्याचे पाहून मेरी कोम यांनीही त्यांचेपासून प्रेरणा घेतली व बॉक्सर होण्याचे स्वप्न पाहीले.

बॉक्सिंगसाठी घरचा विरोध असतांनाही वयाच्या 17 व्या वर्षी सन 2000 मध्ये मेरी कोम यांनी बॉक्सिंगमध्ये प्रवेश केला. चांगल्या प्रकारे तयारी करत. मेरी कोम यांनी सन 2000 यावर्षीच राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद मिळवले. जेव्हा त्यांचे फोटो वर्तमानपत्रात झळकले तेव्हा घरच्या लोकांना मेरी कोम यांच्या यशाची कल्पना आली. मेरी कोम यांना असलेली बॉक्सिंगची ओढ पाहून घरच्या मंडळीचाही विरोध ओसरला.
सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम यांनी सुवर्णपदक पटकावले. तदनंतर पुढील पाच वर्षामध्ये सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. हरियाणा राज्यातील हिस्सार येथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्ण पदकावर मेरी कोम यांनी आपले नाव कोरले. याचप्रकारे चीन मधील तैवान येथे यशाची पुनरावृत्ती करत जागतिक स्पर्धांमधील विजयपताका कायम ठेवली. 

अमेरिकेत पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत मेरी कोम यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुढे सन 2003 मध्ये मेरी कोम यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2004 यावर्षी नॉर्वे येथे, 2005 यावर्षी रशियामध्ये आणि 2006 साली दिल्लीमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. प्रतिस्पर्ध्याला बॉक्सिंग रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्यात मेरी कोम माहीर होत्या. दोन मुलांची आई झाल्यानंतरही त्यांनी 2008 मध्ये चीन येथे झालेल्या जागतिक जेतेपद जिंकले, मेरी कोम यांनी महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद 6 वेळा जिंकले असून, 2012 साली लंडन येथे झालेल्या ऑल्मपिक स्पर्धेत फ्लायवेट प्रकारामध्ये कांस्यपदक पटकावले. 19 सप्टेंबर ते 04 ऑक्टोंबर 2014 दरम्यान दक्षिण कोरिया येथील इचॉन शहरात झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले. 2012 यावर्षी मेरी कोम यांनी अनब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहीले.  मेरी कोम यांच्या जीवनावर आधारित 2014 साली ‘मेरी कोम’ नावाचा चित्रपट तयार झाला.

मेरी कोम या प्रसिद्ध भारतीय बॉक्सरने 2001 पासून आठ एआयबीए वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत ज्यात सहा सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक यांचा समावेश आहे. फ्लायवेटसाठी एआयबीए जागतिक क्रमवारीतही ती जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली. कोमने लंडन 2012 ऑलिम्पिक गेम्समध्ये भाग घेतला आणि अंतिम चॅम्पियन निकोला अॅडम्सकडून पराभूत झाल्यानंतर कांस्यपदक जिंकले. महिला बॉक्सिंगमधील भारताचे हे पहिले ऑलिम्पिक पदक होते. कोम टोकियो 2020 साठी पात्र ठरली, ती उन्हाळी खेळांमध्ये अंतिम सहभागी होती. आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. कोमही पाच वेळा आशियाई चॅम्पियन आहे. तिने तिची कारकीर्द तीन मुलांची आई असण्याशी जोडली आहे, मणिपूरमध्ये स्पोर्ट्स क्लब चालवला आहे आणि भारतीय संसदेच्या उच्च सभागृहाच्या, राज्यसभेच्या सदस्या बनल्या आहेत. तिची अधिकृत जन्मतारीख असूनही, कोमचा दावा आहे की तिचा जन्म 24 नोव्हेंबर रोजी झाला होता, तिच्या बालपणात एक चूक झाली होती.

मेरी कोम यांना त्यांच्या खेळातील योगदानासाठी 2003 साली ‘अर्जुन पुरस्कार, 2006 साली पद्मश्री पुरस्कार, 2009 साली ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2013 या वर्षी ‘पद्मभूषण पुरस्कार‘ तर 2020 यावर्षी ‘पद्मविभूषण‘ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

 

 

Scroll to Top