रविकुमार दहिया यांचा जन्म दि. 12 डिसेंबर 1997 रोजी झाला असून रविकुमार हे मुळचे हरियाणा राज्यातील नहरी, जि. सोनिपत येथील आहेत. ते भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू आहेत.
रविकुमार दहिया यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना देखील त्यांनी अशा परिस्थितीवर मात करून कुस्तीमध्ये यश संपादन केले. वडीलांकडे शेतजमीन नसतांना इतरांच्या शेतीमध्ये काम करुन वडीलांनी आपल्या मुलाला प्रशिक्षीत केले. रविकुमार यांनी कुस्तीमध्ये असलेल्या प्रचंड आवडीमुळेच त्यांना यश संपादन कण्यात मदत झाली. किशोरवयापासूनच त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. रविकुमार यांनी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये सतपाल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण घेतले.
2015 मध्ये साल्वाडोर येथे झालेल्या ज्युनियर वर्ल्ड रेसलिंग चैम्पियनशिपमध्ये 55 किलो फ्रीस्टाईल कुस्ती गटामध्ये रविकुमार यांना रौप्य पदक मिळाले. 2017 मध्ये रविकुमार यांना झालेल्या दुखापतीमुळे ते वर्षभर खेळू शकले नाहीत. 2018 साली बुखारेस्ट येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनगटात रौप्य पदक पटकावले. भारताला मिळालेले या स्पर्धेतील ते एकमेव पदक होते. रविकुमार यांनी 2019 च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. तर 2020 साली दिल्ली येथे पार पडलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले.
2020 साली टोकियो येथे पार पडलेल्या ऑल्मिपिक स्पर्धेत रविकुमार यांनी कझाकिस्तानच्या नुरीस्लॅक सनयेव या खेळाडूस पराभूत करून 57 किलो वजनगटात अंतिम गटात प्रवेश केला. मात्र अंतिम फेरीमध्ये रशियाच्या झागुर युगूएव्ह यांचेकडून पराभूत झाल्याने रविकुमार यांना ऑल्मिपिक मध्ये रौप्यपदक मिळाले. ऑल्मिपिक स्पर्धेत मिराबाई चानु नंतर भारताला रौप्य पदक मिळवून देणारे दुसरे भारतीय ठरले. रविकुमार यांचेपूर्वी भारताला कुस्तीमध्ये खाशाबा जाधव, सुशीलकुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांनी पदके मिळवून दिली आहेत. कुस्तीमध्ये भारताला पदक मिळवून देणारे रविकुमार हे 5 वे भारतीय खेळाडू ठरले.
रविकुमार यांच्या कुस्ती खेळातील अतुलनिय कामगिरीसाठी भारत सरकारने रविकुमार यांना 2011 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. ऑलिंपिक सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूचे अभिनंदन……
You May Also read:
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.