बजरंग पुनिया हे भारतीय कुस्तीपटू असून त्यांचा जन्म दि. 26 फेब्रुवारी 1994 रोजी झाला. ते मुळचे हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील खुदाण या गावातील आहेत. बजरंग पुनिया हा एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू आहे जो 65 किलो वजनी गटात स्पर्धा करतो.
Table of Contents
2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुनियाने कझाकिस्तानच्या दौलेट नियाझबेकोव्हचा 8-0 च्या फरकाने पराभव करून कांस्यपदक जिंकले. जागतिक कुस्ती स्पर्धेत 4 पदके जिंकणारा पुनिया हा एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे. ते भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या 2023 भारतीय कुस्तीपटूंच्या आंदोलनातील एक नेते आहेत.
बजरंग पुनिया : सुरुवातीचे जीवन आणि पार्श्वभूमी
त्यांनी वयाच्या 7व्या वर्षापासूनच कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. कुस्ती खेळण्यासाठी वडीलांनी त्यांना प्रोत्साहन दिले. बजरंग यांच्या कुस्ती खेळास कुटुंबियांनी सर्वोतोपरी मदत केली. कुस्तीच्या सरावासाठी सोनीपत येथील (SAI sportsauthorityofindia) प्रादेशिक केंद्रात प्रवेश मिळावा, या केंद्रात सराव करता यावा, – यासाठी त्यांचे कुटुंबिय सोनीपत येथे स्थलांतरित झाले. सुरुवातीच्या काळात सोनीपत येथील प्रादेशिक केंद्रात सराव करत नंतर दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियममध्ये त्यांनी कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. तसेच पुढे त्यांनी कर्नालमधील पोलीस अकादमीमध्ये सराव केला.
बजरंग पुनिया यांनी कुस्तीमध्ये आपला सराव कायम ठेवत पुढे विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. 2013 च्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये 60 किलो वजनगटामध्ये कांस्य पदक मिळवले. या पदकानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली. 2014 मध्ये ग्लासगो. स्कॉटलंड येथे पार पडलेल्या राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत 69 किलो वजनगटात रौप्य पदक जिंकले. पुढे 2017 साली दिल्ली येथे झालेल्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 60 किलो वजनगटामध्ये सुवर्णपदक मिळवले. 2018 या वर्षी गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या 65 किलो वजनगटाच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. आशियाई स्पर्धेमध्ये बजरंग पुनिया यांनी इंडोनेशिया येथील जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत 65 किलो वजन गटामध्ये अंतिम फेरित जपानच्या ताकातानी दाईई या खेळाडूस पराभूत करुन सुवर्णपदक पटकावले. तसेच बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 65 किलो वजनगटामध्ये अंतिम सामन्यात जपानी मल्ल ताकुतो ओतुगारो यांचेकडून पराभव पत्कारावा लागल्याने रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. या पदकामुळे जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत दोन वेळा पदके मिळवणारे ते प्रथम भारतीय ठरले.
2020 साली टोकियो येथे खेळल्या गेलेल्या ऑल्मिपिक स्पर्धेसाठी पुनिया यांची निवड झाली. या स्पर्धेसाठी त्यांनी स्वतःला पात्र केले. या स्पर्धेत ते उपांत्य फेरीपर्यंत खेळले व त्यांना ऑल्मिपिक स्पर्धेत कांस्य पदक मिळाले. सद्यस्थितीत ते कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली गोहना येथे सराव करत आहेत. ते भारतीय रेल्वेत तिकीट परीक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. खेळातील त्यांच्या यशस्वीतेसाठी भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.