wachan prerana din | Reading Inspiration Day | 15 ऑक्टोबर,वाचन प्रेरणा दिन मराठी भाषण

वाचन प्रेरणा दिन : wachan prerana din म्हणजेच Dr.A.P.J.Abdul Kalam यांचा वाढदिवस होय. दर वर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज आपण या वाचण प्रेरणा दिनानिमित्त मराठी भाषण विद्यार्थ्यांसाठी पाहणार आहोत.

wachan prerana din | Reading Inspiration Day | वाचन प्रेरणा दिन मराठी भाषण
wachan prerana din | Reading Inspiration Day | 15 ऑक्टोबर,वाचन प्रेरणा दिन मराठी भाषण

Wachan Prerana Din Marathi Bhashan : वाचन प्रेरणा दिन मराठी भाषण

ग्रंथ आमचे साथी ग्रंथ आमच्या हाती

ग्रंथ उजळती अज्ञानाच्याअंधाराच्या राती

सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो आपल्या सर्वांना माझा नमस्कार. भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाइल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत.

त्या निमित्ताने आज मी या ठिकाणी दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती. भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडू येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती. ते नेहमी म्हणायचे की माझं ग्रंथसंग्रहालय ही माझी सर्वात मोठी देन आहे आणि इथे घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी सर्वात अनमोल आहे. पुस्तकाच्या सहवासात मला ज्ञानाबरोबर आनंदही मिळतो. त्यामुळे एक चांगले पुस्तक हे माझ्यासाठी शंभर मित्रांसमान आहे.

पुस्तकातून असाच आनंद विद्यार्थ्यांनाही मिळावा, त्यांना वाचनाचे महत्त्व समजावे तसेच वाचनाची गोडी लागावी व या वाचनातून उद्याचा सुजाण नागरिक घडावा यासाठी 15 ऑक्टोबर हा कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. अब्दुल कलाम हे प्रबळ इच्छाशक्ती व दृढ आत्मविश्वास असणारे एक प्रख्यात लेखक होते. त्यांनी युवकांना मोठी स्वप्ने पहा आणि ते सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम करा असा संदेश दिला. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे खूप प्रेरणादायी होते.

ते नेहमी म्हणायचे जर आपल्या देशाचा विकास व्हायचा असेल तर ज्याप्रमाणे प्रत्येक घरात देवघर असते त्याप्रमाणे प्रत्येक घरात ग्रंथघर असायला पाहिजे. शिक्षण आणि विज्ञानाबद्दल अतिशय आस्था असणारे असे महान वैज्ञानिक आपल्या देशाला लाभले हे आपल्या सर्वांचे परम भाग्य आहे. आजच्या दिवसाकडून प्रेरणा घेऊन आपणही वाचनाची आवड जोपासली पाहिजे. कारण वाचू तरच वाचू. जाताना मी एवढेच म्हणेन.

सोडून कास अज्ञानाची, सवय लावू वाचनाची घेऊन ज्ञान पुस्तकातून, उघडू दारे प्रगतीची.

Scroll to Top