30 Vidyarthi labhachya yojana in marathi| विद्यार्थी लाभाच्या योजना

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य,पुणे-1 यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या Vidyarthi labhachya yojana in marathi विद्यार्थी लाभाच्या योजना बद्दल सविस्तर माहिती तसेच PPT व PDF या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Vidyarthi labhachya yojana,All Schemes| विद्यार्थी लाभाच्या योजना

Vidyarthi labhachya yojana in marathi Related to Students

1. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना. (National Means – Cum-Merit Scholarship Scheme) NMMSS

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्रशासन पुरस्कृत योजना सन 2007-08 या वर्षापासून सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र असतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित (आई-वडिलांचे) रु.3,50,000/- पेक्षा जास्त नसावे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत केले जाते. इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या शिष्यवृत्ती निकषानुसार पात्र विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. सदर विद्यार्थ्यांना इयत्ता 7वी मध्ये किमान 55 टक्के गुण असावे. (SC, ST यांना गुणामध्ये 5 टक्के सवलत).

सदर परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराथी, तेलगु व कन्नड या माध्यमातून घेतली जाते. सदर परीक्षेचे शुल्क 100 रु व शाळा संलग्नता शुल्क 200 रु आकारले जाते. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम हा इ. 8वी पर्यंतचा राज्यशासनाचा आहे. पेपर 1 बौध्दिक क्षमता चाचणी (MAT), पेपर 2 शालेय विषयक क्षमता चाचणी (SAT) (सामान्य ज्ञान 35 गुण अ सामाजिक शास्त्र 35 गुण अ गणित 20 गुण) दोन्ही पेपर साठी प्रत्येकी 90 गुण व वेळ 90 मिनीटे.

सदर परीक्षेमधून राज्याला ठरवून दिलेल्या (11682) कोटयानुसार निवडलेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत तयार केली जाते. सन 2017-18 पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे.

योजनेची उद्दिष्टे :-

1. इयत्ता 8वी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दीमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे.

2. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी.

3. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.शिष्यवृत्तीचे दर :-इ. 9 वी ते इ. 12 वी अखेर 4 वर्ष दरमहा रु. 1000/- प्रमाणे (वार्षिक रु.12000/-) शिष्यवृत्ती

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :-

  • सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट .
  • शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे एन.एम.एम.एस. परीक्षेचे गुणपत्रक.
  • शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गतवर्षाचे (इयत्ता 9वी, 10वी, 11वी)गुणपत्रक.
  • सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा उत्तपन्नाचा दाखला.
  • ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा (जातीचा) सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा दाखला.

बैंक पासबुकची प्रत.पात्रतेचे निकषः

  • पालकाचे उत्पन्न रु. 3,50,000/- पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे.
  • शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे.
  • केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
  • इयत्ता 10वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.
  • इयत्ता 10वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास 60 टक्केपेक्षा अधिकगुण (अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यास 05 टक्के सुट.) इयत्ता 9वी मधून 10वी मध्ये गेलेले विद्यार्थी व 11वी मधून 12वी मध्ये गेलेले विद्यार्थीप्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.
  • शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्यांच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे.
  • शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बैंक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे.
  • विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल.
  • जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल.
  • कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाही.
  • शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्याचा दावा विचारात घेतला जाणार नाही.

NMMSS FLOW CHART

NMMSS FLOW CHART

@**विद्यार्थी लाभाच्या इत्तर योजनांची माहिती पाहण्यासाठी त्यांच्या नावावर क्लिक करा.**@

2. राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्ती (2202 1198) (RIMC)

3. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना (इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती योजना)

4. धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी असलेली केंद्र पुरस्कृत मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना (Pre-Matric Scholarship Scheme Minority Students)

5. धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीनीसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना (BHMNS)

6. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना (Pre Matric Scholarship for Students with Disabilities)

7. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती  (2202 0371)

8. आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती (2202 1251)

9. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारची संस्कृत शिष्यवृत्ती (2202 1062, 2202 1071)

10. मराठी भाषा फाउंडेशन योजना (100% राज्य शासन पुरस्कृत)

11. 12 व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत बहु क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत (MsDP) मान्यता प्राप्त राज्यातील संबंधित 09 जिल्ह्यातील 08 गट व 06 शहराकरिता सायबर ग्राम योजना.

12. राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना.

13. प्राथमिक शाळेतील पुस्तक पेढ़ी योजना

14. माध्यमिक पुस्तक पेढ़ी योजना

15. इयत्ता 1 ली ते 4 थी मधील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता योजना

16.जिल्हा बालभवन योजना

17. राज्यातील शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या 103 विकास गटातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळा मधील इयत्ता 1 ली ते 4 थी मधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके. 22023365

18. जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळातील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सुविधा (मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा) 22023664

19. राज्यातील शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या 120 विकास गटातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा करणे.22023646

20. माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती

21. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती

22. प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना विहित आर्थिक दराने मदत देणे. लेखाशीर्ष 22021429

23.राज्यातील अनुदानित माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर (इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर स्तर) विहित दराने शैक्षणिक लेखाशीर्ष-22022926

24.इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण लेखाशिर्ष (2202 3056)

25. इयत्ता 11 वी, 12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण लेखाशिर्ष (2202 2523)

26.ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख पेक्षा अधिक नाही. अशा इयत्ता अकरावी व बारावी मध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्यांना फी माफी (योजनेत्तर योजना) लेखाशीर्ष-2202 1474

27.आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन लेखाशिर्ष-2202 1204

28. मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांनी घोषित केलेले विशेष पॅकेज अंमलबजावणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांतर्गत द्यावयाच्या शैक्षणिक सवलती.(लेखाशोर्ष-2202 एच 151)

29. टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / प्रतिपूर्ती लेखाशीर्ष(2202 2588)

30.अल्पसंख्यांक समाजाच्या संस्था / मदरसांकरिता शिक्षण देणे बाबत योजना. S.P.E.M.M-Scheme for Providing Education in Madarsa / Minorities

Scroll to Top