varisht vetan shreni,nivad shreni prastav | वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव pdf download

varisht vetan shreni,nivad shreni prastav : वरिष्ठ वेतनश्रेणी सेवा कालावधीत 12 वर्षानंतर प्रस्ताव सादर केल्यानंतर मिळते, तसेच निवडश्रेणी सेवा कालावधीत 24 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव सादर करून मिळते.

varisht vetan shreninivad shreni prastav

varisht vetan shreni prastav | वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव सादर करणेसाठी आवश्यक कागदपत्रे

१) शाळा मुखपत्र (Covering Letter)

२) प्रपत्र -अ नमुन्यात माहिती

३) वरिष्ठ वेतनश्रेणी संस्था ठराव (नमुना १ मध्ये) (सदर संस्था ठरावामध्ये प्रथम नेमणूक दिनांक, वरिष्ठ श्रेणी पात्र दिनांक, लागू केलेली वरिष्ठ वेतनश्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणीचे किमान तीन आठवडयांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे, त्यांचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल पाहता त्यांची सेवा समाधानकारक आहे, त्यांचे सेवेत दिनांक ते अखेर सेवाखंड असून सदर सेवाखंड क्षमापित करण्यात येत आहे, विनाअनुदानित सेवा असल्यास त्याचा तपशील, संबंधित कर्मचारी वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणेस पात्र आहे इत्यादी सविस्तर संपूर्ण तपशील असणे आवश्यक आहे. संस्था ठराव सोबत असलेल्या नमुना-१ प्रमाणेच आवश्यक आहे. अपूर्ण संस्था ठराव सादर करु नये.

४) सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र (किमान तीन आठवडयाचे आवश्यक आहे)

५) कर्मचारी वैयक्तिक मान्यता प्रत (शिक्षण सेवक, नियमित, शैक्षणिक वर्षापूर्ती मान्यता असल्यास त्या सर्व मान्यता प्रती सादर कराव्यात.)

६) विनावेतन रजा/असाधारण रजा, सेवाखंड इ. तपशील (नमुना २मध्ये) (विनावेतन / असाधारण रजा, सेवाखंड असलेस तेवढे दिवस वरिष्ठ वेतनश्रेणी दिनांक पुढे दर्शविणे आवश्यक आहे.)

७) मुख्याध्यापक व कर्मचारी प्रमाणपत्र (नमुना ३ मध्ये) (या मध्ये वेतन जादा अदा झालेस परत करणेचे हमीपत्र, न्याय प्रविष्ठ प्रकरण नसलेचे प्रमाणपत्र, यापूर्वी पदोन्नती नाकारली नसलेचे प्रमाणपत्र, उशिराबाबतचा खुलासा, सेवा समाधानकारक असलेचे प्रमाणपत्र, किमान तीन आठवडयांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले असलेचे हमीपत्र इत्यादी तपशील आवश्यक आहे.)

८) सेवा समाधानकारक असलेचे संस्था प्रमाणपत्र (नमुना-४ मध्ये)

९) मूळ सेवापुस्तक

१०) वेतन निश्चिती प्रस्ताव दोन प्रतीत सेवापुस्तकातील वेतन निश्चिती नोंदीसह (विकल्प वरिष्ठ श्रेणी मंजुरी संस्था ठराव दिनांकापासून एक महिन्याच्या आत देणे आवश्यक आहे.)

शैक्षणिक माहितीच्या PDF साठी आमच्या Educationa pdf site ला एकदा अवश्य भेट द्या .त्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला टच करा Educational PDF Downlaod

Educational PDF Downlaod

varisht veyan shreni |वरिष्ठ वेतनश्रेणी pdf download

varisht veyan shreni |वरिष्ठ वेतनश्रेणी pdf download

निवडश्रेणी प्रस्ताव pdf download

Scroll to Top