केंद्रप्रमुख कर्तव्य व जबाबदारी : kendrapramukh roles and responsibilities

केंद्रप्रमुख कर्तव्य व जबाबदारी kendrapramukh roles and responsibilities : केंद्रप्रमुख हे समूह साधन केंद्रावरील अधिकारी आहेत.केंद्रातील सर्व शाळेचे प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचे नियंत्रण केंद्रप्रमुख करतात.इतरांप्रमाणे त्यांचे काही कर्तव्य व जबाबदाऱ्या असतात ज्यांविषयी आपण सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत.

kendrapramukh roles and responsibilities केंद्रप्रमुख कर्तव्य व जबाबदारी

केंद्रीय प्राथमिक शाळांच्या संदर्भात केंद्रप्रमुख यांची कर्तव्य : Kendrapramukh Roles and Responsibilities :

1) समुहातील सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाच्या संदर्भात (पटनोंदणी, उपस्थिती वाढवणे व शिक्षणाचा दर्जा) मासिक व वार्षिक उद्दिष्टे ठरवून देणे.
2) समुहातील सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी मासिक व घटक नियोजन निश्चित करून देणे व त्यानुसार केलेल्या अध्यापनाविषयीचा आढावा पुढील महिन्याच्या बैठकीत घेणे.
3) दर तिमाहीस आणि वर्षाच्या अखेरीस समुहातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची किमान अध्ययन क्षमतांवरील प्रभुत्वाची चाचणी घेऊन प्रत्येक शिक्षकाच्या कार्याचे या संदर्भात मूल्यमापन करणे.
4) समुहातील प्रत्येक प्राथमिक शाळेला महिन्यातून दोन वेळा भेट देणे. या दोन भेटीपैकी एक भेट पूर्वसूचना न देता द्यावी व अशा भेटीत एखादा शिक्षक गैरहजर आढळला, तर त्याची एक दिवसाची नैमित्तीक रजा कापण्यात यावी. समुहातील शाळांच्या कामकाजावर देखरेख करणे व त्यांची तपासणी करणे.
5) समुहातील प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांची मासिक गट संमेलने आयोजित करणे.
6) समुहातील शिक्षक नियमितपणे शाळेत येतात याची खात्री करणे.
7) समुहातील शिक्षक शाळेच्या गावी राहत असल्याबद्दल खात्री करणे.
8) समुहातील सर्व शाळांमध्ये सहशालेय कार्यक्रमांचे नियोजन करणे.
9) समुहातील प्रत्येक शिक्षकासाठी पालक भेटीचा कार्यक्रम निश्चित करून देणे.
10) समुहातील प्रत्येक शिक्षकासाठी विद्यार्थ्यांची सर्वकष माहिती मिळवण्याचा कार्यक्रम निश्चित करून देणे.
11) शाळेत दाखल झालेल्या पंरतु सातत्याने गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींची माहिती घेऊन ती शाळेत टिकवण्याच्या दृष्टीने शिक्षकांना पाठपुराव्यासाठी लक्ष्य निश्चित करून देणे.
12) समुहातील शाळांमध्ये शाळेच्या स्तरावर तसेच आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करणे.
13) ग्रामशिक्षण समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे व त्यांच्या ठरावांची नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करणे.
14) महिन्यातून किमान एक ग्रामशिक्षण समितीच्या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणे.
15) उपलब्ध साधनांपासून आणि कमी खर्चात शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी गटातील शिक्षकांना मार्गदर्शन करणे.
16) शाळा सुधार, शैक्षणिक उठाव, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, उपस्थिती भत्ता, गणवेश, पुस्तक, पेढी इत्यादी कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्यांची व्याप्ती आणि उपयुक्तता वाढवण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे.
17) समुहातील प्राथमिक शाळांची प्रतवारी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.
18) समुहातील सर्व मुख्याध्यापक / शाळा प्रमुखांचे वार्षिक गोपनीय अहवाल लिहीणे व शिक्षकांचे मुख्याध्यापक/ शाळाप्रमुख यांनी लिहिलेले गोपनीय अहवालांचे त्यांना विहित वार्षिक लक्ष्यांच्या संदर्भात पुनर्विलोकन करणे.
19) ऑपरेशन ब्लॅकबोर्ड व अन्य योजनांमार्फत प्राप्त होणाऱ्या साहित्याचा उपयोग करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करणे
20) आठवड्यातून किमान चार तासिका अध्यापन करणे.

Kendrapramukh Roles and Responsibilities- शैक्षणिक कर्तव्य व जबाबदारी :

1) दरवर्षी शाळेत दाखल करावयाच्या मुला-मुलींचे 100 टक्के सर्वेक्षण शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यामार्फत करवून घेणे.
2) पटनोंदणी शाळानिहाय लक्ष्य निश्चित करून 31 जुलै पूर्वी दाखलपात्र मुला-मुलींची 100 टक्के पटनोंदणी झाली याची खात्री करणे. 5 टक्के पटनोंदणी प्रत्येक्ष पडताळणे.
3) 6 ते 14 वयोगटातील एक ही मूल शाळेबाहेर राहणार नाही यासाठी संबंधितांकडून कार्य करुन घेणे.
4) शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि ग्रामशिक्षण समितीचे सदस्य यांच्यामार्फत विशेष प्रयत्न करणे.
5) प्रत्येक मूल शाळेत नियमित उपस्थित राहील व शाळेची सरासरी उपस्थिती 95 टक्क्यांपेक्षा कमी राहणार नाही, याची खबरदारी घेणे. यासाठी पालक भेटीचे शिक्षकनिहाय नियोजन करून अशा भेटी नियमितपणे होतात, याची वेळच्या वेळी पाहणी करणे.
6) प्रत्येक विद्यार्थी विषयनिहाय अध्ययन क्षमता संपादन करील यादृष्टीने शिक्षकांना उद्दिष्टे ठरवून देणे व त्यांची कार्यवाही होत आहे, याबाबत पुढील भेटीत खात्री करणे.
7) प्रत्येक शाळेत पटनोंदणी, सरासरी, उपस्थिती, गळती व स्थगिती यांचे लक्ष्य ठरवून देणे. ती साध्य करण्याचा कटाक्षाने प्रयत्न करणे व मुली इत्यादींसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना तसेच अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, सुधारगृहे इत्यांदीची माहिती पालकांना देऊन पात्र मुला-मुलींना त्या-त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत व मार्गदर्शन करणे. )
8) वरचेवर गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती घेऊन असे विद्यार्थी सोपविणे, तसेच ग्रामशिक्षण समितीच्या सभेत सदर विषयावर चर्चा करून त्यावर उपाययोजना ठरविणे.
9) शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचा अध्यापन व अध्ययन प्रक्रिया आनंददायी होण्यासाठी पुरेपूर वापर करणे. केंद्रातील शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबाबतची जबाबदारी आपल्यावर आहे, याचे भान ठेवणे.

अध्यापन व मूल्यमापन विषयक Kendrapramukh Roles and Responsibilities :

  • केंद्रप्रमुखाने केंद्रशाळेत आठवड्यातील किमान चार तासिका अध्यापन करणे.
            अ) केंद्रशाळेत 5 ते 7 वर्ग असतील, तर किमान दोन तासिका यांपैकी वर्गातील असाव्यात व किमान दोन तासिका 1 ते 4 वर्गावरील असाव्यात.
             ब) चार तासिकांपैकी प्रत्येक दोन तासिका भाषा व दोन गणित या विषयांपैकी असाव्यात.
            क) या तासिकांची टाचणे काढावीत. आदर्श टाचणे म्हणून इतर शिक्षकांना ती मार्गदर्शक ठरावीत.
  • प्रत्येक शाळेत सर्व मुला-मुलींची त्रैमासिक क्षमताधिष्ठित चाचणी घेणे.
  •  शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, सैनिक शाळा प्रवेश परीक्षा या विषयांच्या बहिस्थ परीक्षा, इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मुलांची निवड शाळा सुरू झाल्यानंतर एक महिन्याच्या आत करण्याबाबत शिक्षकांना सूचना देणे व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल असे पाहणे.
  • गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने परिसरात असलेल्या माध्यमिक शाळा व इतर शैक्षणिक संस्थांचे आवश्यक ते सहकार्य मिळविणे.
  • ऑपरेशन ब्लॅकबोर्ड व इतर योजनांतर्गत प्राप्त झालेल्या साहित्याचा योग्य प्रकारे उपयोग होत आहे. याची खात्री करणे व आवश्यक तेथे वापराबाबत व निगा ठेवण्याबाबत मार्गदर्शन करणे.
  • उपलब्ध साधनांमधून व कमी खर्चात शैक्षणिक साहित्य / स्वयंअध्ययन साहित्य तयार करण्यासाठी केद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन करणे, त्यासाठी कृतिसत्र घेणे.
  • प्रत्येक शाळेत क्षमताधिष्ठित मूल्यमापनाचे रजिस्टर ठेवले जाईल व ते वेळच्या वेळी भरले जाईल, ते पाहणे.
  • सर्व शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या कार्याचे वर्षअखेरीस मूल्यमापन करणे. त्या अनुषंगाने गोपनीय अभिलेखात त्याचे प्रतिबिंब उमटेल, असे पाहणे.
  • गोपनीय अभिलेख वस्तुनिष्ठपणे लिहिणे.
  • प्रत्येक शाळेत केंद्रप्रमुखाने आपल्या सूचना नोंदविण्यासाठी 200 पानी फुलस्केप बाऊंड बुक रजिस्टर केंद्रप्रमुखाने लॉगबुक म्हणून स्वतंत्र ठेवावे व त्यामध्ये भेटीच्या वेळी नोंदी कराव्यात.
  • सखोल शाळाभेटीच्या वेळी प्रत्येक शिक्षकाने केलेले काम, मुलांची तयारी व मुलांकडून करवून घेतलेले स्वाध्याय, गृहपाठ, प्रयोग इत्यादी बाबत शिक्षकांना मार्गदर्शन करणे. त्या साधनांची निगा राखणे व परिणामकारकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देणे.

शालेय नियोजनविषयक Kendrapramukh Roles and: Responsibilities :

1) अभ्याक्रम, पाठ्यपुस्तक व शिक्षक हस्तपुस्तिका यांच्या आधारे अध्यापन प्रक्रियेचे नियोजन करून घेणे. नियोजनानुसार कार्यवाहीबाबत खबरदारी घेणे.
2) शिक्षकाने केलेल्या अध्यापन प्रक्रियेबाबत पाक्षिक/मासिक आढावा घेणे व राहिलेला अभ्यासक्रम व त्रुटींबाबत सूचना देऊन पूर्तता करून घेणे.
3) दर तिमाहीस किमान अध्ययन क्षमतांच्या चाचणीबाबत नियोजन करणे, प्रत्यक्ष चाचणी घेणे. (लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक) व दर तिमाहीस नोंदी ठेवणे.
4) करवून घ्यावयाच्या सर्व कामाचे शालेय वर्षांच्या सरुवातीलाच इयत्तानिहाय व भौतिक लक्ष ठरवून द्यावे व भेटीच्या वेळी त्याच्या अंमलबजाणीबाबत कटाक्षाने लक्ष देणे व 5 टक्के कामाची पडताळणी भेटीच्या वेळी स्वतः करणे.
5) शिक्षकांची उपस्थिती व थोडक्यात कार्यवृत्तान्त नोंदवावेत.
6) समुहातील सर्व शाळा स्तरावर आंतरशालेय स्तरावर सहशालेय कार्यक्रमांचे नियोजन करून द्यावे. शक्य तेथे शाळा एकत्र करून विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, इत्यादी स्पर्धा घेवून विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे द्यावीत.
7) जिल्हा परिषद व स्थानिक पातळीवरून आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे नियोजन, आयोजन व प्रभावी अंमलबजावणी करावी.
8) शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची, प्रभावी अंमलबजावणीच्या स्वरूपात आवश्यक ती कार्यवाही करणे, योजनेची माहिती घेणे, लाभार्थी निवडणे, त्यांना वेळेवर योजनेचा लाभ देणे व नियमित अहवाल पाठविणे.
9) दरवर्षी समुहातील शाळांची प्रतवारी बस्तुनिष्ठपणे निश्चित केली आहे किंवा नाही, ते पाहणे व प्रतवारी उंचावण्यासाठी शाळांना मार्गदर्शन करणे.
10) प्रत्येक प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी व शाळांनी दर महिन्यात कोणकोणती शैक्षणिक कामे करावयाची याची यादी सुरुवातीलाच देणे व त्यानुसार कार्यवाही करून घेणे.
11) शाळा सुधार योजना, शैक्षणिक उठाव, सावित्रीबाई फुले दत्तक योजना, गणवेश वाटप, पुस्तक पतपेढी योजना, शालेय पोषण आहार इत्यादी कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्यांची व्याप्ती व उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे.
12) केंद्रांतर्गत शाळांतील घटक शाळांचे सहशालेय उपक्रमांचे वार्षिक नियोजन करून घेणे व त्यानुसार कार्यवाही करून घेणे.
13) शैक्षणिक वर्षारंभीच शाळा व शिक्षकनिहाय वर्ग व विषय वाटप करून देणे, केंद्रातर्गत शाळेतील सर्व शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी वार्षिक नियोजन करणे.
14) केंद्रातर्गत शाळांमधील 100% विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नियोजन व पाठपुरावा करणे.
15) विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी शारीरिक शिक्षण व प्रशिक्षण आयोजित करणे. शिक्षकांचे बार्षिक शैक्षणिक स्नेहसंमेलन आयोजित करणे.

Kendrapramukh Roles and Responsibilities प्रशासकीय कर्तव्ये :

1) समुहातील सर्व प्राथमिक शाळा, बालवाड्या, अंगणवाड्या, महिला प्रबोधन केंद्र, ग्रामीण वाचनालये, अनौपचारिक शिक्षण केंद्रे, आश्रमशाळा, प्रौढ शिक्षण केंद्रे, जनशिक्षण निलयम केंद्रे यांना नियमितपणे भेटी देणे.
2) प्राथमिक शाळा भेटीमध्ये दरमहा किमान एक भेट अचानक, व एक  भेट पूर्वनियोजित असावी. पूर्वनियोजित भेटीच्या वेळी शाळा सुरू होण्यापूर्वी उपस्थित बैठकीला उपस्थित राहून पूर्ण दिवसभराचे कामकाज पाहणे व शाळा सुटल्यावर शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.
3) समुहातील सर्व शिक्षक नियमितपणे शाळेत येतात, याची समक्ष पडताळणी करणे. महिन्यातून किमान एक ग्रामशिक्षण समितीच्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणे. (दर महिन्यात वेगवेगळ्या ग्रामशिक्षण समितीच्या बैठकीस उपस्थित राहणे.)
4 ग्रामशिक्षण समितीच्या कामकाजाची माहिती घेणे व त्यामध्ये झालेल्या ठरावाची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणे.
5) अनियमित, कामचुकार शिक्षकांवर योग्य ती कार्यवाही होण्यासाठी वरिष्ठांकडे शिफारस करणे.
6) कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही, याची दक्षता घेणे व शाळांना तात्काळ पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करणे.
7) समुहातील सर्व शाळांचे अभिलेख, दस्तऐवज, डेडस्टॉक, शैक्षणिक साधने, नोंदवह्या, इत्यादी बाबी अद्ययावत राहतील, यासाठी शाळांना आवश्यक त्या सूचना देणे.
8) केंद्रातील सर्व शिक्षक शाळेच्या गावी राहतात, याची खात्री करणे. शाळा सुधार योजना, शैक्षणिक उठाव, सावित्रीबाई फुले दत्तक योजना, गणवेश वाटप, मुलींची उपस्थिती, पुस्तकपेढी, योजना शालेय पोषण आहार योजना, वैद्यकीय तपासणी इत्यादी कार्यक्रमांचा आढावा घेऊन व्याप्ती व उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे.
9) दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होईल, यासाठी आवश्यक ते नियोजन व त्यानुसार कार्यवाही करणे, वैद्यकीय दोष आढळलेल्या विद्यार्थ्यांवर योग्य ते उपचार होतील, असे पाहणे.
10) मुले शाळेत रमावीत याकरिता प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाला पोषक असे विविध उपक्रम सर्व शाळांमधून राबविणे.
11) गटशिक्षणाधिकारी यांनी सोपविलेल्या शाळांची वार्षिक तपासणी करणे.

Kendrapramukh Roles and Responsibilities आर्थिक बाबीसंबंधित कर्तव्ये :

1) आर्थिक बाबीसंबंधित शासनाकडून वेळोवेळी निघालेले शासन निर्णय, जिल्हा परिषदेने निर्गमित केलेले आदेश व सूचना आणि लेखा संहितेतील आवश्यक त्या तरतुदी यांचे योग्य ते पालन होईल, असे पाहावे. त्या दृष्टीने मुख्याध्यापक व शाळाप्रमुखांना मार्गदर्शन करावे.
2) आर्थिक नोंदी ठेवताना (अ) जिल्हा परिषद पंचायत समिती लेखा संहिता 1968 आणि (ब) महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम 1965 या शासकीय नियमांचा व परिशिष्टांचा वापर करावा.
3) शालेय साहित्य विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून खरेदी करणे, त्यांच्या नोदीं वेळच्या वेळी घेणे, त्यांचा योग्य बापर होणे, त्यांची निगा व दुरूस्ती वेळच्या वेळी केली जातील, असे पाहावे.
4) सर्व शाळांचे जमा खर्च, कॅशबुक, डेडस्टॉक, खतावणी इत्यादी आर्थिक व्यवहारांसाठीची रजिस्टर्स विहित नमुन्यात व अद्ययावत ठेवली आहेत, याची खात्री करणे.
5) केंद्रामध्ये शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी, शैक्षणिक साधने तयार करण्यासाठी लागणारी साधने, शिक्षकांना उपयुक्त ग्रंथसंपदा इत्यादी उपलब्ध करून देणे व त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेणे.
6) केंद्रासाठी मिळालेल्या अनुदानातून प्रत्येक केंद्रप्रमुखाने अध्ययन-अध्यापनाला उपयोगी पडतील, अशा संदर्भग्रंथांनी समृद्ध असे ग्रंथालय तयार करावे व त्याचा केंद्रातील सर्व शिक्षकांना लाभ द्यावा.
7) सर्व शाळांच्या आर्थिक तपासणीसाठी विस्तार अधिकारी (शिक्षण) यांना मदत करणे.
8) सर्व आर्थिक व्यवहार नियमांनुसार व शैक्षणिक उपयुकतेसाठी चालले आहेत, याची वरचेवर खात्री करणे व काही गैर आढळल्यास त्वरीत वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे.

Kendrapramukh Roles and Responsibilities कार्यालयीन कर्तव्ये :

1) प्रत्येक महिन्यांच्या 25 तारखेपूर्वी शाळा भेटीचा संभाव्य कार्यक्रम विस्तार अधिकारी यांच्याकडे सादर करणे.
2) दर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी मागील महिन्याची मासिक दैनंदिनी विहित नमुन्यात भेटीच्या सविस्तर अभिप्रायासह विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्यामार्फत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे देणे.
3 ) केंद्र शिक्षण सल्लागार समितीची दरमहा एकदा बैठक आयोजित करणे व अशा बैठकीत घेतलेल्या निर्णयावर कार्यवाही करणे.
4) केंद्रप्रमुख कार्यालयाचे दप्तर अद्ययावत ठेवणे, केंद्रशाळेत स्वतः चे हजेरी रजिस्टर व हालचाल रजिस्टर ठेवणे.
5) केंद्रातील कोणत्याही शाळेच्या ठिकाणी आठवड्यातून किमान दोन मुक्काम करणे.
6) प्रत्येक केंद्रप्रमुखाने आपल्या वार्षिक कामाचा तपशीलवार आरसा म्हणून दरवर्षी एक याप्रमाणे केंद्र रजिस्टर ठेवावे व ते नियमित आपल्या बरोबर ठेवावे.
7) केंद्रप्रमुखांच्या केंद्र कार्यालयात शासन निर्णय, परिपत्रके यांची अद्ययावत फाईल ठेवणे.
8) केंद्रातील शाळासंबंधीच्या विविध योजना, उपक्रमाबाबतचे मासिक / त्रैमासिक अहवाल विहित कालमयदित गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणे.
9) दरवर्षी तीस सप्टेंबरच्या विद्यार्थी पटाच्या आधारे शाळानिहाय शिक्षक निश्चित करण्यासाठी विस्तार अधिकारी (शिक्षण) यांना सहकार्य करणे. केंद्राचा 30 सप्टेंबर अखेरचा सांख्यिकीय अहवाल 30 ऑक्टोबरपर्यंत सादर करणे.
10) मुख्याध्यापकांच्या लॉगबुकची प्रत्येक भेटीत तपासणी करणे. तसेच मुख्याध्यापक स्वतः अध्यापन करतात का, याची पाहणी करणे.
11) वरिष्ठांकडे करावयाचा पत्रव्यवहार विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्यामार्फत करणे.
12) अनधिकृत गैरहजर असणाऱ्या शिक्षकांची माहिती योग्य त्या शिफारशीसह शिक्षण विस्तार अधिकारी/ गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविणे.
अशाप्रकारे केंद्रप्रमुखांची Kendrapramukh Roles and Responsibilities कर्तव्य व जबाबदाऱ्या आपण या लेखाच्या माध्यमातून अभ्यासल्या आहेत.  या माहिती मध्ये आपणास काही बदल आवश्यक वाटल्यास आम्ही त्याचा नक्कीच विचार करू.
कृपया संपर्क फॉर्म भरून आवश्य  कळवा.
Scroll to Top