प्रेरणा उत्सव 2024:Prerana Utsav 2024-25

प्रेरणा उत्सव 2024: शिक्षण मंत्रालय, भारत सरकार द्वारा प्राप्त निर्देशानुसार व नवोदय विद्यालय, समितीच्या मार्गदर्शनाखाली पीएमश्री नवोदय विद्यालय, गढी ता. गेवराई जि.बीड येथे प्रेरणा उत्सव 2024-2025 अंतर्गत जिल्हा स्तरीय निबंध, चित्रकला व कविता लेखन या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रेरणा उत्सव 2024-25
प्रेरणा उत्सव 2024-25

संदर्भः- प्राचार्या, जवाहर नवोदय विद्यालय, गढी ता. गेवराई जि. बीड, यांचे पत्र क्र. फा.क.प्रेरणा / जनविवी/ 2023-24/3- दि.04/04/2024

उपरोक्त विषयो व संदर्भान्वये आपणास कळविण्यात येते की, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार द्वारा प्राप्त निर्देशानुसार व नवोदय विद्यालय, समितीच्या मार्गदर्शनाखाली पीएमश्री नवोदय विद्यालय, गढी ता. गेवराई जि.बीड येथे प्रेरणा उत्सव 2024-25 अंतर्गत जिल्हा स्तरीय निबंध, चित्रकला व कविता लेखन या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी उत्सवात आपल्या शाळेतील विद्याथ्यांचा सहभाग नोंदवावा.

Prerana Portal

01. प्रथम सर्व शाळांनी Prerna Portal वर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे त्यांच्या विशेष उपलब्धीनुसार रजिस्ट्रेशन करावे.

प्रेरणा पोर्टल रजिस्ट्रेशन

02. स्पर्धेत इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थ्यां सहभागी करावेत.

03. प्रेरणा पोर्टलवर नोंदनी केलेल्या विद्यार्थ्यांची विद्यालय स्तरावर वरील स्पर्धांचे आयोजन दि.15/04/2024 पर्यंत शाळास्तरावर करावे.

04. प्रत्येक शाळेतुन एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनी यांचे प्रथम क्रमांक काढावेत.

05. शाळेतुन प्रथम क्रमांक आलेले एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनी यांना जिल्हास्तरावर स्पर्धेस सहभागी होण्यासाठी दि.19/04/2024 रोजी जवहार नवोदय विद्यालय, गढी ता. गेवराई जि. बीड येथे पाठविण्यात यावे.

06. मुलीची शाळा असेल तर दोन मुली व मुलांची शाळा असेल तर दोन मुले स्पर्धेसाठी निवडावेत.

07. स्पर्धेचे विषय (विकसित भारत) आणि (समाज आणि राष्ट्रासाठी माझे योगदान) असा आहे.

08. चित्रकला स्पर्धा. निबंध स्पर्धा व काव्य लेखन स्पर्धा इत्यादींचा स्पर्धेत समावेश आहे.

करिता आपल्या शाळेतील व विद्यार्थी सदरिल उपक्रमात सहभागीकरुन जिल्हास्तरीय स्पर्धे करिता पाठवावे तसेच सर्दारल विद्याथ्यांची माहिती सोबतच्या प्रपत्रामध्ये भरुन प्राचार्या, जवाहर नवोदय विद्यालय, गढी ता. गेवराई जि. बीड, यांना पाविण्यात यावी.

PDF download करणेसाठी खाली दिलेल्या Download बटनावर क्लिक करा.

👉👉👉  Download

प्रेरणा उत्सव माहिती

प्रेरणा उत्सव 2024-25

Scroll to Top