मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत सर्व शाळांनी विद्यार्थ्यांकडील अभिप्राय कसा अपलोड करावा.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत अभिप्राय नोंद करणे  :मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षण विषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो खाली नमूद संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. राज्य शासनाने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

Table of Contents

शाळांनी विद्यार्थ्याकडील अभिप्राय कसा अपलोड करावा.
शाळांनी विद्यार्थ्याकडील अभिप्राय कसा अपलोड करावा.

यामधून प्राप्त अभिप्रायांचा विचार राज्याच्या शैक्षणिक धोरण निश्चितीकरणात केला जाणार आहे. शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याच्या प्रक्रीयेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.

उपक्रमाचे नाव : Largest online photo album of “Handwritten Notes in 24 hours”.

कार्यपध्दती :

1) पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे.

2) हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोटया वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.

3) या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल. ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.

4) हा अभिप्राय 5 ते 6 ओळीमध्ये असावा.

5) अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात काढायचा आहे.

6) त्यानंतर शिक्षण विभागाच्या www.mahacmletter.in वेबसाईटवर जाऊन स्वत:च्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.

7) त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.

याबाबत करावयाच्या कृतीबाबत फ्लोचार्ट सोबत जोडलेला असून त्याप्रमाणे सर्व शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी. सदर उपक्रमाचा दि. 26.02.2024 वेळ सकाळी 09.00 ते दि. 27.02.2024 सकाळी 08.59 आहे. सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. त्यानुसार उपरोक्त सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

परिपत्रक पाहण्यासाठी  DOWNLOAD बटनावर क्लिक करा 

FlowChart
Scroll to Top