15 August Speech In Marathi | Bhashan | 15 ऑगस्ट भाषण

15 August Speech in Marathi या लेखाशिर्षखाली 15 ऑगस्ट 2023 या दिवशी  77वा  स्वातंत्र दिन आपण साजरा करणार आहोत. त्यासाठी  15 August Speech In Marathi आपण पुढे पाहणार आहोत.  Bhashan तयारी साठी आपणांस खाली काहीं नमुना दाखल भाषाने देत आहोत.  

15 August Speech in Marathi 

भाषण क्रं : 1

1)  15 ऑगस्टला दरवर्षी भारताचा स्वतंत्र दिवस साजरा केला जातो . १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
2) भारतीयांसाठी स्वातंत्र्य दिन हा अभिमानाचा दिवस आहे.
3) स्वातंत्रा दिन भारतातील इंग्रजी राजवटीचा शेवट आणि भारताच्या स्वातंत्र्याचा काळ लक्षात ठेवतो.
4) स्वातंत्र्यदिनी आपल्या शाळेत तसेच शासकीय कार्यालय ध्वजारोहण केले जाते.
5) भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी,तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वजण एकत्र आजच्या येतात.
6) स्वातंत्र्य दिन हा भारतासाठी एक आणि उत्कृष्ट भविष्यासाठी शक्तीची क्षेत्रे तयार करण्याचा महत्त्वपूर्ण दिवस आहे.
7) स्वातंत्र्य दिनी, भारत, जगातील सर्वात मोठी मत आधारित प्रणाली, विविधतेत एकता दाखवते.
8) स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या आणि आपल्या देशाला स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वर ठेवणार्‍या मुक्त सैनिकांचे कौतुक करण्याचा दिवस आहे.
9) आपल्या देशाचे राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत वंदे मातरम , जनगणमन  हा  वंदे मातरमचे पठण करून स्वातंत्र्य दिनाची प्रशंसा केली जाते.
10) महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू आणि अशा अनेक आद्यपुरुषांनी आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न केले.

भाषण क्रं : 2

आजच्या कार्यक्रमाचे प्र्मुख पाहूणे, मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना शुभ प्रभात. तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या स्वातंत्र दिनी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली या बद्दल मी आपले आभार व्यक्त करतो/करते. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान स्वातंत्र्य सैनिक आणि नेत्याची आठवण करतात. भारताचा स्वतंत्रता दिवस फक्त ब्रिटिश सरकार पासून देशाला स्वातंत्र्याची आठवण करून देत नाही, तर हा दिवस देशाची एकजूटदेखील जगासमोर दाखवतो. आणि संपूर्ण देशाची शक्ति जगासमोर मांडतो. 

जवळपास 150 वर्ष  भारतावर राज्य केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश इंग्रजा पासून स्वतंत्र झाला. इंग्रजांचे अत्याचार सोसून कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्या. तेव्हा कुठे आपण स्वतंत्र झालो. आजच्या या मंगल प्रसंगी आपल्या देशाचे पंतप्रधान देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचा ध्वज फडकावून भाषण करतात. या दिवशी स्वतंत्र लढ्यात शहीद नेत्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.

आपला देश दिन प्रतिदिन प्रगतिच्या दिशेने जात आहे. व लवकरच आपण एक महासत्ता बनून जगासमोर उभे राहू. भारताच्या स्वातंत्र्याच्या 4 वर्षानंतर आपल्या देशाने राज्यघटना लागू केली. आपल्या राज्यघटनेने देशाला अधिक मजबूत केले. आज आपण जगातील सर्वात मोठी वैविध्य असलेली लोकशाही आहोत. कृषी क्षेत्रापासून तर औद्योगिकीकरणापर्यंत आपण जगातील मोजक्या प्रगत देशाच्या बरोबरीत आहोत.आपला देश प्रगतीपथावर पुढे पुढे जात आहे. 

ज्या पद्धतीने आपण आज देशाच्या महान नेत्यांची आठवण करतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या महान सैनिकांना न विसरता त्यांनाही धन्यवाद द्यायला हवेच. आपल्या देशाचे महान सैनिक दिवस रात्र सीमेवर उभी राहतात. त्यांचे बलिदान लक्षात घेता आपण एकजूटतेने देशासाठी कार्य करायला हवे. 

 माझे भाषण येवढ्या शांत चित्ताने तुम्ही ऐकुन घेतल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांना स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत.

भाषण क्रं : 3

आदरणीय  व्यासपीठ आदरणीय पुजनीय गुरुजनवर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या बालमित्रांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्याचा सुवर्ण दिवस.

आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा तसेच अभिमानाचा आणि  मान सन्माचा दिवस आहे.अशा या क्रांतिकारी मंगलदिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा.

15 ऑगस्ट 1947 …  हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य भुमीपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्या चा आनंद अनुभव झाला.

भारतीय जनता, थोरपुरुष, क्रांतिकारकांच्या आत्मबलिदानातुन स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता , त्यामुळे समस्त भारतीयां साठी हा फार आनंददायी व सुखमय असाच दिवस आहे.

15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत सुमारे 150  वर्षे होता. इंग्रजांच्या दिलेल्या असमानतेचा वागणुकीचा, भेदभाव आणि सक्तीचे नियम यामुळे अनेक शूर वीर भारतीयांच्या मनामध्ये एकतेची  भावना निर्माण होऊ लागली व देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे त्यांना वाटू लागले.

या कारणांमुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिक व  समाज सुधारक विविध ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढे उभारू लागले. यामध्ये मोलाचे कार्य  भगतसिंग राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आजाद,लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, अशा कित्येक स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांनी  प्राण पणाला लावले.

लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध कडक भूमिका घेऊन स्वदेशी बहिष्कार चळवळीचा पाठपुरावा केला. आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली.

टिळकांच्यां नंतर महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी मिळवण्यासाठी सत्याग्रह करून स्वातंत्र्यलढ्याच्या नव्या पर्वाची सुरुवात करून दिली.भगतसिंग, राजगुरू, सुखदेव व बटुकेश्वर दत्त  यासारखे अनेक युवा क्रांतिकारकांनी सशस्त्र हल्ले घडवले.भगतसिंग व राजगुरू लाठी हल्ल्याचा आदेश  दिलेल्या जेम्स स्कॉट या पोलिस अधिकाऱ्यास मारण्याचे नियोजन केले.

परंतु नजरचुकीने दुसऱ्याच अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली, अधिकाऱ्याच्या हत्येचा कट केल्यामुळे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या भारत मातेच्या सुपुत्रांना लाहोर याठिकाणी फासावर लटकवण्यात आले.

 काकोरी कट, मीरत कट,चितगाव कट असे अनेक क्रांतिकारी लढे हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आले. 1942 पासून चले जाव आंदोलन म्हणजे छोडो भारत आंदोलन सुरू झाले. यावेळी  स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी अधिक प्रखर प्रयत्न केले.

8 ऑगस्ट रोजी गांधींजींनी भारतीय जनतेस ‘करो या मरो’ हा संदेश दिला. याशिवाय ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे असे ठणकावून सांगितले .नेताजी सुभाषचंद्र  बोस भारतीयना तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा असे आव्हान केले.यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमधील सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाली.

प्रमुख नेत्यांना अटक झाल्यामुळे  जनतेने स्वतः चलेजाव आंदोलनाची दिशा स्पष्ट केली व देशभरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अबाल वृद्ध व स्त्रिया रस्त्यावर आल्या या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील नेत्यांनी भूमिगत जनतेला मार्गदर्शन केले.

अशा प्रकारे 1942 पासून चाललेल्या छोडो भारत चळवळीचा गोड शेवट 1947 च्या  स्वातंत्र्यप्राप्ती नंतर झाला. 15 ऑगस्ट 1947 ची रम्य पहाट उगवली आणि 150 वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत  जखडलेला भारत अखेर स्वतंत्र झाला.दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील ब्रिटिशांचा झेंडा युनियन जॅक उतरवून त्याठीकाणी भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.

अशाप्रकारे भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 76 वर्षे पूर्ण झालेली आहे. आणि या वर्षी आज आपण 78 वा गणराज्य दिवस म्हणजे स्वातंत्र दिवस साजरा करीत आहोत.

 
 

भाषण क्रं : 4

 

 सलाम आहे त्या वीरांना,
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला !
ती आई आहे भाग्यशाली,
जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे,
हा देश अखंड राहिला ..!!!

आदरनीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय देश बांधवांनो. आज 15 ऑगस्ट, आज आपण येथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना या शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

बालमित्रांनो, पारतंत्र्यात किती दिवस जगायचे? आणि इंग्रजांच्या गुलामीत किती अत्याचार सहन करायचा? आपल्याच देशात परके म्हणून किती दिवस जगायचे? सोन्याचा धूर निघनाऱ्या देशाला असं उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचे? असा प्रश्न प्रत्येक भारतीयांना पडला नसता तर नवलच.

बालमित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजाच्या तावडीतून स्वतंत्र झाला. त्या अगोदर  150 वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले. एखाद्या धाण्याला जशी कीड लागते तशी व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय रोवला आणि कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण 150 वर्ष  राहिलो. भयानक अत्याचार, असह्य वेदना आपल्या भारतीयांनी सहन केल.

अशा क्रुर, जुलमी राजवटी विरुद्ध लढण्यासाठी भारत भूमीच्या उदरात अंकुर उगवले. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध बंड करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपल्या देशात आपलीच जनता राज्य करणार, अशी मोठी क्रांती घडवण्याचा निर्णय भारत मातेच्या या सुपुत्रांनी घेतला.

अशक्यप्राय लक्ष होते! पण नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवले. कारण त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती पुढे अशक्य अशी कोणतीच गोष्ट नव्हती.  इंग्रजांसोबत स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात सहभागी झाले. अनेक क्रांतिकारक  हसत हसत फासावर गेले.

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूडॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या नेत्यांनी ही स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला. सर्व बाजूंनी इंग्रजांना घेऱ्य़ात घेण्यात आले. आणि शेवटी तो सुवर्णदिन उगवला. इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यात भारतीयांना यश आले. 150 वर्षे या भारत भूमीवर फडकणारा ईग्रजी सत्तेचा ‘युनियन जॅक’ खाली उतरवण्यात आला आणि तिरंगा अभिमानाने त्याजागेवर फडकवण्यात आला.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो, लाखो राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान हसत हसत दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम !!! आणि एक गोष्ट लक्षात असू द्या. आपण स्वातंत्र्य आहोत. अन्याय आणि अत्याचार कधीच सहन करू नका. त्याला वेळीच विरोध करा. कारण जर गप्प बसाल तर परत कोण राज्य करेल कळणार नाही. आपल्यातील न्यायाची ज्योत पेटती राहू द्या. एवढे बोलून मी माझे भाषण इथेच संपवतो.

जय हिंद जय भारत.

You May Like This 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

हे देखील वाचा :

Opposite Words in Marathi                                                                                                                                    Vidyarthi विविध Yojana | 12 विद्यार्थी लाभाच्या योजना
Morning Assembly Anchoring Script | इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन
15 August Speech In Marathi | Bhashan | 15 ऑगस्ट भाषण
Olympic Medalist in India | ऑलिम्पिक पदक विजेते
Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा 50 | संस्कार कथा
Marathi Suvichar I 1000+ मराठी सुविचार संग्रह
Marathi shuddh lekhan| मराठी शुद्धलेखन 12 नियम

Scroll to Top