Visits to Field Office of Officer in Directorate | संचालनालयातील अधिकाऱ्याच्या क्षेत्रीय कार्यालयाला भेटी

Visits to Field Office of Officer in Directorate : शिक्षण संचालनालय (योजना) मार्फत राबविण्यात येणा-या योजनांच्या कालबध्द कार्यक्रमाची दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा, तालुका, बीट, केंद्र व शाळास्तरावरील झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेणे साठी संचालनालयातील अधिकाऱ्याच्या क्षेत्रीय कार्यालयाला भेटीचे (Visits to Field Office of Officer in Directorate) आयोजन करण्यात आले आहे.

Visits to Field Office of Officer in Directorate | संचालनालयातील अधिकाऱ्याच्या क्षेत्रीय कार्यालयाला भेटी

Visits to Field Office of Officer in Directorate | संचालनालयातील अधिकाऱ्याच्या क्षेत्रीय कार्यालयाला भेटी

शिक्षण संचालनालय (योजना) मार्फत राबविण्यात येणा-या योजनांच्या कालबध्द कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणीबाबत नियमित ऑनलाईन बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकामधून दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा, तालुका, बीट, केंद्र व शाळास्तरावरील झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेणे.

तसेच केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा, तालुका व शाळा स्तरावर केलेली पूर्वतयारी तसेच उल्लास मेळावा पूर्वतयारी व कार्यवाहीचा तसेच शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी योजना संचालनालनालयातील अधिकारी संदर्भीय पत्रातील वेळापत्रकाप्रमाणे शैक्षणिक विभागांना व त्या अंतर्गत जिल्हा, तालुका कार्यालयांना आणि निवडक शाळांना भेटी देणार आहेत.

अ. क्र.भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व पदनामभेट द्यावयाच्या शैक्षणिक विभागाचे नांवभेटीचा दिनांक
1श्रीम. अनिता कडू सहसंचालक शिसंयो व श्रीम. लीना भागवत छत्रपती संभाजीनगर विभाग02/12/2024 ते 06/12/2024

भेटी दरम्यान संबंधित अधिकारी शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शाळा तसेच उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमतांतर्गत सुरु असलेले वर्ग यांना भेटी देवून असाक्षर व स्वयंसेवक यांच्याशी चर्चा करतील.

शाळांमधून विविध शासकीय योजनांची सुरु असलेल्या अंमलबजावणीची पाहणी करुन विहित नमुन्यात माहिती घेतील. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था/शाळांना भेटी देऊन तेथे सुरु असलेल्या विविध शासकीय योजनांच्या अंमबजावणीची पाहणी करुन विहित नमुन्यात माहिती घेतील.

दौरा/भेटी दरम्यान गटशिक्षणाधिकारी यांनी अधिका-यासोबत स्वतः उपस्थित रहावे. आपल्या तालुक्यांतर्गत भेटीचे नियोजन तयार करुन या कार्यालयास आणि आपल्या अधिनस्त शाळांना पाठयावे. अशा सूचना पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत.

आपणास दिलेले उद्यिष्ट, बँक अंकाऊट, शाळा भेटी, स्वंयसेवक यादी, असाक्षर यादी गावनिहाय तयार ठेवावी. असे पत्रामध्ये नमूद आहे.

संचालनालयातील अधिकाऱ्याच्या क्षेत्रीय कार्यालयाला भेटीचे पत्र Visits to Field Office of Officer in Directorate pdf स्वरूपात पाहण्यासाठी खाली क्लिक करा

Scroll to Top