10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर कंत्राटी शिक्षक नियुक्ती जाहिरात | Appointment of Contractual Teachers

Appointment of Contractual Teachers : डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत (Appointment of Contractual Teachers) कंत्राटी तत्वावर नियुक्ती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय दि. 23, सप्टेंबर 2024 नुसार, करणेत येणार आहे.

Contract Teacher Advertise 2024

Appointment of Contractual Teachers साठी अर्ज सादर करणेची मुदत

Appointment of Contractual Teachers साठी अर्ज सादर करणेचे ठिकाण

सदर नियुक्ती साठी पुढील प्रमाणे अटी व शर्ती लागू आहेत.

1) सदर नियुक्ती ही पुर्णतः कंत्राटी स्वरूपाची आहे.

2 ) सदर नियुक्ती कंत्राटी तत्वावर असलेमुळे, संबंधितांस शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे/सामवून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल.

3 ) अर्जदार व्यक्ती चे वय हे किमान 18 व कमाल वय खुला 38 / मागास प्रवर्ग 43 वर्षे असणे अनिवार्य आहे.

4 ) वरील प्रमाणे वयोमर्यादा खुला व मागास प्रवर्ग नुसार वेगळी आहे, या व्यतिरिक्त उमेदवारांना नियुक्तीस्तव कोणताही आरक्षण लाभ देय असणार नाही.

5) सदर नियुक्तीस्तव डी.एड अथवा बी.एड ही व्यावसायिक अर्हता अनिवार्य आहे.

6 ) 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळेमध्ये पद उपलब्ध आहे, तेथील स्थनिक रहिवाशी असलेल्या उमेदवार / संबंधित तालुका रहिवाशी उमेदवार / तदनंतर जिल्हा रहिवाशी उमेदवार या अनुक्रमानुसार प्राधान्य देणेत येईल.

7 ) सदर नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल, आवश्यकतेनुसार सदर नियुक्ती कालावधी नुतनीकरणाचे अधिकार या कार्यालयाचे असतील.

8 ) मानधन रू.15,000 /- प्रतीमाह (कोणत्याही इतर लाभाव्यतिरीक्त)

9 ) जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.

10 ) अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील.

11 ) उमेदवाराची नियुक्ती सदर उमेदवार शारिरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास, अथवा विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी समाप्त करणेचे अधिकार या कार्यालयाचे असतील.

12 ) नियुक्त कंत्राटी शिक्षकाची सेवा सदर पदावर इतर नियमित शिक्षक प्राप्त झालेस संपुष्टात येईल.

13 ) नियुक्तीधारकास शिक्षणाधिकारी (प्राथ) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील. नियुक्तीधारकास शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचे बंधपत्र/हमीपत्र देणे अनिवार्य आहे.

14 ) तालुकास्तरावरील अर्ज व विहीत कालमर्यादेनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

Contract Based teacher Appointment Sangali Ads

Scroll to Top