NMMS Scholarship Scheme Exam 2024 : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर दिनांक 05 ऑक्टोबर, 2024 पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती,मिळविण्यासाठी पुढे वाचणे सुरू ठेवा.
Table of Contents
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2024-25 इ. 8 वी साठी परीक्षा दि. 22 डिसेंबर 2024

NMMS Scholarship Scheme Exam Date 2024
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2024-25 इ. 8 वी साठी परीक्षा दि. 22 डिसेंबर 2024
NMMS Scholarship Scheme Exam 2024 पात्रता :
a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे, नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा तलाठयांचा सन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
c) विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
- केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
- जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
- शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
- सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी,
Read More: APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार
How to Apply For NMMS Scholarship Scheme Exam (अर्ज कसा करावा )
- दिनांक 05/10/2024 पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
- ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी.
- विद्यार्थ्यांचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवणे बंधनकारक आहे.
- मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे.
- अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही.
- ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉगीनवरुन Edit करता येईल.
- प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल, याची नोंद घ्यावी.
- सविस्तर माहिती परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://mscenmms.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
Exam fee For NMMS Scholarship Scheme 2024

NMMS Scholarship Scheme 2024 विषय व अभ्यासक्रम
परीक्षेसाठी विषय :- सदर परीक्षेसाठी 2 विषय असतील,
a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT):- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
b) शालेय क्षमता चाचणी (SAT):- ही सामान्यतः इयत्ता 7 वी व 8 वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये
1. सामान्य विज्ञान एकूण (गुण 35)
2. समाजशास्त्र (एकूण गुण 35)
3. गणित (एकूण गुण – 20) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण 90 प्रश्न सोडवायचे असतात.
उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
a. सामान्य विज्ञान ३५ गुण
- भौतिकशास्त्र 11 गुण,
- रसानशास्त्र 11 गुण,
- जीवशास्त्र 13 गुण.
b. समाजशास्त्र ३५ गुण
- इतिहास 15 गुण,
- नागरिकशास्त्र 05 गुण,
- भूगोल 15 गुण
c. गणित 20 गुण,
NMMS Scholarship Scheme 2024 परीक्षा मूल्यमापण
विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पध्दतीने करण्यात येते. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण (Negative Marking) पध्दतीचा अवलंब केला जात नाही. खबरदारीचे सर्व उपाय योजना यांचा विचार करुन बिनचूक गुणयादी तयार करण्यात येते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयांसह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्रशासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हयानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
NMMS Scholarship Scheme 2024 शिष्यवृत्ती दर:-
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. 9 वी ते इ. 12 वी पर्यंत दरमहा रु. 1000/- (वार्षिक रु. 12000/-) शिष्यवृत्ती दिली जाईल.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.9 वी व इ. 11 वी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
इ. 10वी मध्ये किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान 55% गुणांची आवश्यकता आहे.)
सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचे मार्फत केले जाते.
NMMS Scholarship Scheme Exam 2024 Notification PDF
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!

This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.