APAAR ID CARD : APAAR ID तयार करण्यासाठी केंद्र शासनाने UDISE प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये (SDMIS) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याचा कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी च्या विद्यार्थ्यांना APAAR ID उपलब्ध करून देण्याकरिता लवकरच सुविधा देण्यात येणार आहे.
Table of Contents
यु-डायस प्लस प्रणालीमधून APAAR ID तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे.
APAAR ID महत्व व उपयोगिता :
- राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR ID उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.APAAR ID हा 12 अंकी असून एकमेव असणार आहे.
- विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित असणार आहे.
- UDISE PLUS प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार Validation झाले आहे त्याच विद्यार्थ्यांचे APAAR ID Generate होतील.
- APAAR आयडीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा (OoSC) मागोवा घेणे, गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे, इ. बाबीं डिजिटल नियंत्रित करण्यात येतील.
- APAAR आयडी तयार झाल्यानंतर Digi locker ला जोडण्यात येणार आहे.
- Digi locker ला जोडल्यामुळे विद्यार्थ्यांने शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष्य, इयत्ता 10वी व 12वी बोर्ड परीक्षेचे निकाल, holistic report card and extracurricular accomplishments ऑनलाईन पध्दतीने बघता येईल.
- APAAR ID प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने पाठविणे सुलभ होईल.
- राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी विद्या समिक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर Graphical Analysis करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबविण्यात येतील.
APAAR ID साठी जबाबदारी
- महाराष्ट्र राज्याकरिता राज्यस्तरावरून राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य हे Nodal Officer असणार आहेत.
- APAAR आयडी तयार करण्याबाबत राज्यस्तरावरील MIS-Coordinator, जिल्हा स्तरावरील Coordinator यांचे APAAR आयडी Creation बाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
- शाळा स्तरावर APAAR आयडी Create करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी Parent Teacher Meeting आयोजित करून Consent by Father/Mother/Legal Guardian of Student for APPR ID Generation हा फार्म भरून घेवून पुढील कार्यवाही करावी.
- याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना https://apaar.education.gov.in/resource या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
- यु-डायस प्लस प्रणाली व विद्या समिक्षा केंद्रामार्फत राज्यामध्ये APAAR आयडी तयार करणे व व्यवस्थापन करणे याकरिता सहकार्य करण्यात येणार आहे.
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.