QR-Base Attendance System द्वारे आता अधिकारी/कर्मचारी यांची कार्यरत ठिकाणावरून उपस्थिती नोंद बाबत.

QR-Base Attendance System : जिल्हा परिषदेने क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी / कर्मचारी यांच्या दैनंदिन उपस्थितीची अचुक नोंद करण्यासाठी QR-Base Attendance System प्रणाली जिल्हा परिषदेने विकसित केली आहे.

QR-Base Attendance System द्वारे आता अधिकारी/कर्मचारी यांची कार्यरत ठिकाणावरून उपस्थिती

क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी/ कर्मचारी यांची कार्यरत ठिकाणावरून QR-Base Attendance System व्दारे उपस्थिती नोंदविणेबाबत…

लोकाभिमुख व गतिमान प्रशासनासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहुन, नागरिकांना विहीत कालावधीत चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी कर्मचारी (उदा. वैद्यकिय सेवेतील अधिकारी/कर्मचारी, पशुवैद्यकिय सेवेतील अधिकारी/कर्मचारी, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, आंगणवाडी सेविका, मदतनिस, इ) हे त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणावर निर्धारीत वेळेत नियमित उपस्थित असतात किंवा कसे याची अचुक माहिती जिल्हा व तालुका प्रशासनास तात्काळ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेने क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी / कर्मचारी यांच्या दैनंदिन उपस्थितीची अचुक नोंद करण्यासाठी QR-Base Attendance System प्रणाली जिल्हा परिषदेने विकसित केली आहे.

उपरोक्त QR-Base Attendance System प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या Office Location चा प्रणालीमध्ये समावेश करावयाचा आहे, जेणेकरून क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीची अचूक नोंद केली जाईल. यासाठी आपल्या अधिनस्त असलेले विस्तार अधिकारी (पंचायत/शिक्षण/कृषि/सांख्यिकी) अथवा आपल्यास संयुक्तीक असणा-या अधिकारी/कर्मचा-यांची नेमणुक करून त्यांना गावाची विभागणी करावयाची आहे.

सर्व क्षेत्रिय कार्यालयांचे Office Location सेट करण्यासाठी ज्या अधिकारी/कर्मचा-यांची नेमणुक केली आहे. त्यांनी त्यांना नेमुण दिलेल्या गावातील क्षेत्रिय कार्यालयाचे लोकेशन हे संबंधित कार्यालयाचे प्रमुख (उदा. वैद्यकिय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, इ) यांच्या मोबाईलवरून, कार्यालयातून अथवा कार्यालयाच्या आवारातून करावयाचे आहे.

कार्यालयाचे लोकेशन सेट करावयाचा कालावधी हा 7 दिवसांचा असेल. यासाठी कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही. वेळेत कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी ही गट विकास अधिकारी यांची राहील.

Office Location सेट करण्यासाठी ज्या अधिकारी कर्मचा-यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांनी त्यांचे आणि क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी/कर्मचारी यांचे Android मोबईलवर Play Store मधून AMS Nagar है Application Install करावयाचे आहे. प्रणाली जाणून घेण्यासाठीची पीपीटी यासोबत जोडली आहे. प्रणालीचे गुजर आयडी व पासवर्ड गट विकास अधिकारी यांचे मोबाईल क्रमांकावर पाठविले आहेत.

QR-Base Attendance System प्रणालीच्या वापराबाबतचे प्रशिक्षण हे गट विकास अधिकारी यांना VC द्वारे दिले जाईल, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतुन ही प्रणाली विकसित केलेली आहे. प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्या आढावा बैठकित या विषयाचा समावेश केलेला आहे. याची सर्व गट विकास अधिकारी यांनी नोंद घ्यावयाची आहे.

Scroll to Top