15 August bhashan marathi |15ऑगस्ट भाषण मराठी pdf

नमस्कार बाल मित्रांनो आज आपण 15 august bhashan marathi या लेखामध्ये स्वातंत्र्य दिना संदर्भातील छोटी मराठी भाषणे अभ्यासणार आहोत.

Table of Contents

15 August Bhashan marathi

15 August Bhashan marathi

अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हास 3 2/10 राष्ट्रध्वजाविषयी चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत पणे एकूण घ्यावेत ही नम्र विनंती.

आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगी आहे. म्हणजेच त्यामध्ये तीन रंग आहेत. सर्वात वरच्या बाजूला केशरी, मध्यभागी पांढरा व सर्वात खाली हिरवा रंग आहे.

मध्यभागी पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे, त्यास 24 आरे आहेत. केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे, पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे.

ध्वज फडकताच आपण सर्वजण ध्वजाला सलामी देऊन मान राखतो.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.

जय हिंद…!

जय महाराष्ट्र…!

अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हास महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती सांगत आहे.

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्यावर 1630 मध्ये झाला. त्यांनी

आदिलशहा, निजामशहा, मोघलशहा यांच्या विरुद्ध अनेक लढाया केल्या. त्यांच्या दरबारात

सर्व जाती धर्मांची निष्ठावान माणसे होती.

त्यांच्या अंगी अनेक चांगले गुण होते. त्यांनी स्वराज्य स्थापन केले व सर्व जनता

सुखी केली.

अशा थोर महापुरुषाला माझे कोटी कोटी सलाम.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.

जय हिंद…!

जय महाराष्ट्र….!

अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हास चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत पणे एकूण घ्यावेत ही नम्र विनंती.

ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते. शिक्षणाला फार महत्व आहे. म्हणून तर म्हणतात ‘शिकाल तर टिकाल.’

मुला – मुलीत भेदभाव करू नका. मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सोडू नका. ‘मुला पेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.’ गर्भलिंग परीक्षण करू नका. मुलींची संख्या कमी झाली आहे त्यामुळे सरकारने ‘लेक वाचवा अभियान सुरु केले आहे.

सर्वांनी शौचालय बांधून त्याचा वापर केला पाहिजे. जातीभेद मानला न पाहिजे. आपण सर्वजण एकाच परमेश्वराची लेकर आहोत. आपण सर्वजण आनंदाने व सुखाने राहूयात.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.

जय हिंद…!

जय महाराष्ट्र…!

अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत पणे एकूण घ्यावेत ही नम्र विनंती.

ज्योतिबा फुले हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची

स्थापना केली. 1851 मध्ये मुलींसाठी शाळा काढली. आपली पत्नी सावित्रीबाई हिला शिकवून

शिक्षिका बनविले. कष्टकरी लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे त्याशिवाय देशाचा विकास होणार

नाही, त्यासाठी शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी समाजातील स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव

करण्यासाठी अतोनात कष्ट घेतले. अशा या महान समाज सुधारकाचा 27 नोव्हेंबर 1879 रोजी

मृत्य झाला.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.

जय हिंद…जय महाराष्ट्र…!

अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट/स्वातंत्र दिना निमित्त चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत पणे एकूण घ्यावेत ही नम्र विनंती.

आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता. दीडशे वर्ष आपल्या देशावर इंग्रजांची गुलामगिरी होती. त्यांनी आपल्यावर कितीतरी कडक कायदे लादले. यात भारतीय लोंकांचे अतोनात हाल झाले.

या त्रासातून मुक्त होण्यासाठी लोकांनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सावरकर, नाना पाटील, तात्या टोपे, भगतसिंग अशा अनेक वीरांनी जीवाची पर्वा केली नाही. सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला तेव्हापासून आपण 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र दिन म्हणून साजरा करतो.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.

जय हिंद…!

जय महाराष्ट्र…!

15 August bhashan marathi, लेक वाचवा, देश वाचवा

“लेक वाचवा, देश वाचवा”, “स्त्री जन्माचे स्वागत करूया” अशा घोषणा

आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात कारण आजच्या समाज्यामध्ये मुलगी पोटात वाढते

म्हटल कि मुलीला पोटातच मारतात.

का हा मुलीवर अन्याय करतात?

मुलींनाही जगण्याचा हक्क आहे, त्यांना जगू द्या. पोटातील ते छोटस बाळ सुद्धा

म्हणत असलं कि आहे मला जगायचंय, मला पण हे जग बघायचं, मला जन्माला येऊ दे ना.

फक्त मुलगाच वंशाचा दिवा असू शकतो का?? नाही

मुलीसुद्धा आपल्या आईवडिलांचा आधार बनतात, मुलींचाही गौरव केला

पाहिजे, म्हणूनच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे कि मुलीला मारू नका, त्यांना

जन्माला घाला व वाढवा.

मी सुद्धा एक मुलगीच आहे याचा मला अभिमान वाटतो.

जय हिंद…!

जय महाराष्ट्र…!

सावित्रीबाई फुले

अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत पणे एकूण घ्यावेत ही नम्र विनंती.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. स्त्री प्रथम शिकली पाहिजे,

पुरुषा प्रमाणे तिलाही न्याय हक्क मिळाले पाहिजेत, त्या शिवाय हा समाज सुधारणार नाही हे त्यांनी मनोमन जाणले होते. त्यासाठी त्यांनी प्रथम स्वतः शिक्षण घेतले व नंतर मुलींसाठी पुण्यात शाळा सुरु केली. त्यात त्यांना अपमान, शिव्या- शाप सोसावे लागले. प्रसंगी चिखल, शेण यांचा अंगावर मारा सोसावा लागला. पण त्यांनी माघार घेतली नाही.

म्हणूनच आहे सर्व क्षेत्रात स्त्रिया-मुली चमकत आहेत. स्त्री जातीवर सावित्रीबाई यांचे अनंत उपकार आहेत. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम…!

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.

जय हिंद…!

जय महाराष्ट्र…!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हाला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत पणे एकूण

घ्यावेत ही नम्म्र विनंती.

त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव

भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांनी हरीजनांच्या उद्धारासाठी अविरत कष्ट

केले, भारतीय राज्यघटनेचे काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. त्यांना ‘भातरत्न’ हा किताब

देण्यात आला.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.

जय हिंद…!

जय महाराष्ट्र…!

अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हास राजमाता जिजाबाई यांच्या बद्दल चार शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांत पणे एकूण घ्यावेत ही नम्र विनंती.

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी,

ती राष्ट्राचा उद्धार करी.’

जिजाबाईनी शिवरायांना घडविले, त्यामुळे त्यांच्या हातून स्वराज्य निर्मितीचे पवित्र कार्य घडले. सर्व जनता सुखी झाली, मराठ्यांचे स्वतंत्र राज्य तयार झाले.

माता कशी असावी याचा आदर्श जिजाबाईनी निर्माण केला आहे.

जिजाबाईना माझे कोटी कोटी सलाम,

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.

जय हिंद….!

जय महाराष्ट्र…..!

अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हास लोकमान्य टिळक यांच्या विषयी चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत पणे एकूण घ्यावेत ही नम्र विनंती. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखल गाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. भारताला इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ते आयुष्यभर झटले.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी त्यांनी

घोषणा केली. त्यांना अनेक वेळा तुरुंगात जावे लागले. शेवटी भारत देश स्वतंत्र झाला,

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.

जय हिंद…!

जय महाराष्ट्र…!

15 August bhashan marathi pdf download

2024 मधील मुख्याद्यापक (प्रा) पदोन्नतीसाठी शिक्षक संवर्गातील सेवा जेष्ठता यादी | HM Promotion-Seva jeshthata yadi.

2024 मधील मुख्याद्यापक (प्रा.) पदोन्नतीसाठी शिक्षक संवर्गातील सेवा जेष्ठता यादी | HM Promotion-Seva jeshthata yadi

HM Promotion-Seva jeshthata yadi : जिल्हा परिषद बीड अंतर्गत मुख्याध्यापक (प्रा.) यांचे रिक्त पदे पदोन्नतीने…

Read More
Scroll to Top