Rajiv Gandhi Vidyarthi Sanugraha Anudan Yojana : अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणत नुकसान भरपाई देण्याचे दृष्टीने तसेच त्याना सुरक्षा कवच देण्याकरीता राज्यातील इयत्ता १ ली पासून उच्च शिक्षण घेणाया सर्व विद्यार्थ्यांना Rajiv Gandhi Vidyarthi Sanugraha Anudan Yojana सुरू केली आहे.
Table of Contents
Rajiv Gandhi Vidyarthi Sanugraha Anudan Yojana ची उद्दिष्टे,व्याप्ती व पार्श्वभूमी
शासन निर्णय दिनांक 30 ऑगस्ट 2003 पासून राज्यामध्ये राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यात आली आहे.
योजनेची कार्यपध्दती, कार्यान्वित यत्रंणा, लाभार्थी निवडण्याची पध्दती.
- शासनाने शासन निर्णय दिनांक 01 ऑक्टोबर 2013 अन्वये सदर योजना सन 2012-13 पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
- सदर शासन निर्णयान्वये इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत शिकणाया मुला-मुलीसाठी सदर योजना सन 2013-14 पासून नियमित राबविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
- शासन निर्णय दिनांक 21 जून, 2022 नुसार सुधारीत शासन निर्णय काढून सदर योजना राबविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
शासन निर्णय दिनांक 01 ऑक्टोबर, 2013 नुसार लाभार्थी निवडीचे निकष :-
- विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू :- 75,000/-
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व (2 अवयव/2 डोळे किंवा 1 अवयव व 1 डोळा) :- 50,000/-
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व (1 अवयव/1 डोळा) कायम निकामी 30,000/-
- अपंगत्वाच्या कारणाबाबतचे सिव्हिल सर्जन यांचे कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र
Rajiv Gandhi Vidyarthi Sanugraha Anudan Yojana शासन निर्णय दिनांक 21.06.2022 नुसार लाभार्थी निवडीचे निकष :-
- विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू :- 1,50,000/-
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व (2 अवयव/2 डोळे किंवा 1 अवयव व 1 डोळा) :-1,00,000/-
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व (1 अवयव/1 डोळा कायम निकामी):- 75,000/-
- विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यासः प्रत्यक्ष हॉस्पीटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1,00,000/-
- विद्यार्थी आजारी पडून, सर्प दंशाने किंवा पोहताना मृत्यु झाल्यास :- 1,50,000/-
- विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास (क्रिडा स्पर्धेत खेळताना शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेता धक्का, विज पडून): प्रत्यक्ष हॉस्पीटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1,00,000/-
- शस्त्रक्रियेबाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह
- याजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्यक्रमानुसार अदा करण्याचे निर्देश आहेत.
- विद्यार्थ्यांची आई
- विद्यार्थ्यांची आई हयात नसल्यास वडील
- विद्यार्थ्यांचे आई-वडील हयात नसल्यास 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक.
- योजनेची माहिती मिळविणेकरिता संपर्क :-
- 1) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) जिल्हा परिषद.
- 2) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, उत्तर, दक्षिण)
- 3) संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.