दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना : सन 2022-23 पासून pre-matric scholarship for student with disabilities या योजनेची अंमलबजावणी शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयामार्फत राबविली जात आहे.
Table of Contents
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणात शिक्षण अतिशय निर्णायक भुमिका बजावते. शिक्षणाची ही महत्तवपुर्ण भुमिका लक्षात घेऊन राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे, भारतीय संविधान आणि दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा 2016 अन्वये दिव्यांग व्यक्तींना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी राज्यांची भुमिका अधोरेखित करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 41भाग 4 अन्वये दिव्यांगांच्या काम करण्याचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी राज्य प्रभावी तरतुदी करेल असे नमुद आहे.
केंद्र सरकारद्वारे इयत्ता 9 वी व 10 वी मधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (Disabled Students) सदर शिष्यवृत्ती दिली जाते.
या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ Public Finance Management System PFMS मार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर परस्पर Direct Benefit Transfer (DBT) द्वारे जमा केली जाते.
Pre-Matric Scholarship उद्दिष्टे
1. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
2. दिव्यांग विद्यार्थ्यांची गळती थांबविणे.
3. पालकांना त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविणेसाठी प्रोत्साहन देणे.
4. पाल्यांच्या शिक्षणावर होणाया खर्चाचा भार कमी करणे.
5. दिव्यांग विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करुन त्यांना शिक्षण प्रवाहात राहणेसाठी मदत करणे.
Pre-Matric Scholarship शिष्यवृत्तीचे दर :-
Pre-Matric Scholarship पात्रतेचे निकषः-
- अनुदानित शाळांतील इयत्ता 9वी व 10वी च्या दिव्यांग विद्यार्थ्यांना (CwDs) प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते.
- सदर विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के किंवा जास्त असावे. नियमानुसार सक्षम अधिकायाचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र हे Rights of Persons with Disabilities Act 2016 मध्ये निकषांनुसार असावे.
- एकाच पाल्यांच्या 2 पेक्षा अधिक अक्षम (दिव्यांग) पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागु नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल.
- सदर शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागु राहील. विद्यार्थ्याने तीच इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
- जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागु होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या सोयीनुसार लाभाची (लाभदायी) शिष्यवृत्ती स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवुन रद्द करवुन घ्यावी. मात्र विद्यार्थी निवास, निवासासाठी देय अनुदान, किंवा अशा प्रकारची राज्यशासनाची किंवा इतर स्त्रोतांकडुन पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्राप्त मदत स्विकारु शकतात.
- शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षाकेंद्रावर प्रशिक्षण घेत असतील तर ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील.
- पालकांचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतातुन प्राप्त वार्षिक उत्पन्न रु. 250,000/- पेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :-
1. विद्यार्थ्याचा फोटो.
2.वयाचा दाखला.
3. पालकांच्या उत्पन्नाचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्या सहीचा)
4. मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्रक.
5. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (Disability Certificate), (Unic Disability Identity Card)
6. आधारकार्ड.
संपर्क :-
- शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना) जिल्हा परिषद
- संबंधित शाळांचे मुख्याध्यापक
30 Vidyarthi labhachya yojana in marathi| विद्यार्थी लाभाच्या योजना
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.