देशाच्या प्रधानमंत्री द्वारा मुलांचे शिक्षण स्मार्ट शिक्षणाला जोडण्यासाठी PM Shri Yojana सुरु केली आहे.या योजनेद्वारे जुन्या शाळांना एक नवीन रूप दिले जाणार आहे.या योजनेचे नाव ‘प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया’ असे ठेवण्यात आले आहे म्हणजेच ‘PM Shri Yojana’ होय.
Table of Contents
या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने केली आहे. या योजने अंतर्गत प्रथमतः देशतील 14500 शाळांचा विकास होणार आहे तसेच या शाळांमध्ये परिवर्तन करून या शाळा आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येतील, जेणे करून बाकीच्या शाळांनी या शाळे प्रमाणे स्वत:च्या शाळा तयार करण्यास प्रेरणा मिळेल. या निवडलेल्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या शाळांमधून जवळपास 20 लाख मुलांना या योजनेद्वारा लाभ मिळणार आहे.
देशात मागील 34 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू झाले आहे. तसेच हे धोरण पायाभूत शिक्षण, प्राथमिक असेच माध्यमिक शिक्षणाचा समग्रपणे विचार करणारे पहिलेच धोरण आहे असे म्हणावे लागेल. भारतीय संस्कृती,परंपरा व जीवनशैलीचा विचार करून तयार केलेले हे धोरण आहे. भारताला ज्ञानाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे हा समृद्ध वारसा पुनरुज्जीवित करण्यास मदत करणारे हे धोरण असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी एक योजना सुरु केली आहे.
PM Shri Yojana च्या शाळेमध्ये विद्यार्थी लाभाच्या अश्या योजना आहेत ज्यामुळे मुले ही जगाच्या स्पर्धेत आत्मविश्वासाने तोंड देण्यास सक्षम होतील. या शाळांमध्ये नेमके काय बदल होतील याचा थोडक्यात आढावा घेऊ.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020), राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-FS 2022) (NCF-SE 2023)
PM Shri Yojana च्या शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रावर लक्ष केंद्रित केले जाईल. निपुण भारत मिशन राबविले जाईल. सर्व विद्यार्थ्यांद्वारे ग्रेड 3 पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. धोरणात असे म्हटले आहे की, “शिक्षण प्रणालीचे सर्वोच्च प्राधान्य प्राथमिक शाळेत सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मकता प्राप्त करणे असेल.
2025-26 पर्यंत ही सर्वात मूलभूत शिक्षण आवश्यकता (म्हणजे, मूलभूत स्तरावर वाचन, लेखन आणि अंकगणित) प्रथम साध्य केली गेली तरच या धोरणाचा उर्वरित भाग आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रासंगिक होईल शिक्षण मंत्रालयाकडून प्राधान्यक्रमानुसार संख्यात्मकता स्थापित केली जाईल, त्यानुसार सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारे सर्व प्राथमिक शाळांमध्ये सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मकता प्राप्त करण्यासाठी, टप्प्याटप्प्याने लक्ष्ये आणि 2025-26 पर्यंत प्राप्त होणारी उद्दिष्टे ओळखण्यासाठी एक अंमलबजावणी योजना तयार करतील आणि त्याच्या प्रगतीचा बारकाईने मागोवा घेणे आणि त्याचे निरीक्षण करणे असा असेल. त्यानंतर, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी NIPUN भारत मिशन (नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रिडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमरसी) 5 जुलै 2021 रोजी सुरू करण्यात आले आहे.
पायाभूत टप्पा: – हे पुढे दोन भागांमध्ये विभागले गेले आहे: 3 वर्षे प्रीस्कूल किंवा अंगणवाडी , त्यानंतर प्राथमिक शाळेतील इयत्ता 1 आणि 2. हे 3-7 वर्षे वयोगटातील मुलांना कव्हर करेल. अभ्यासाचा फोकस क्रियात्मक आधारित शिक्षणावर असेल.
तयारीचा टप्पा: इयत्ता 3 ते 5, ज्यामध्ये 8-10 वर्षे वयोगटाचा समावेश असेल. यामध्ये हळूहळू बोलणे, वाचन, लेखन, शारीरिक शिक्षण, भाषा, कला, विज्ञान आणि गणित या विषयांची ओळख होईल.
मध्यम टप्पा: इयत्ता 6 ते 8, 11 ते 13 वयोगटातील मुलांचा समावेश आहे. हे विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, कला आणि मानविकी विषयांमधील अधिक अमूर्त संकल्पनांची ओळख करून देईल.
माध्यमिक टप्पा: इयत्ता 9 ते 12, 14-18 वर्षे वयोगटातील. हे पुन्हा दोन भागांमध्ये विभागले गेले आहे: इयत्ता 9 आणि 10 मध्ये पहिल्या टप्प्याचा समावेश आहे तर वर्ग 11 आणि 12 मध्ये दुसरा टप्पा समाविष्ट आहे. या 4 वर्षांच्या अभ्यासाचा उद्देश बहुविद्याशाखीय अभ्यास, सखोल आणि गंभीर विचार यांच्या सोबत जोडण्याचा आहे. विषयांचे अनेक पर्याय दिले जातील.
प्रत्येक शैक्षणिक वर्षात परीक्षा घेण्याऐवजी , शालेय विद्यार्थी केवळ तीन परीक्षांना उपस्थित राहतील, इयत्ता 2, 5 आणि 8 तसेच इयत्ता 10वी आणि 12वीसाठी बोर्ड परीक्षा सुरू ठेवल्या जातील. यासाठी मानके मूल्यमापन संस्था, परख (परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर डेव्हलपमेंट) द्वारे स्थापित केली जातील त्या सुलभ करण्यासाठी, या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना दोन प्रयत्नांची ऑफर दिली जाईल.
परीक्षेचेच दोन भाग असतात, म्हणजे वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक. विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा भार कमी करणे आणि त्यांना अधिक “आंतर-विषय” आणि “बहुभाषिक” बनण्याची परवानगी देणे हे असेल म्हणजेच “एखाद्या विद्यार्थ्याला भौतिकशास्त्रासह फॅशनचा अभ्यास करायचा असेल, किंवा एखाद्याला रसायनशास्त्रासह बेकरी शिकायचे असेल तर त्यांना तसे करण्याची परवानगी दिली जाईल”. विद्यार्थ्याच्या कौशल्याची माहिती देणारी रिपोर्ट कार्डे “सर्वसमावेशक” असतील.
संगणक कोडिंग, व्यावसायिक शिक्षण इयत्ता 6 पासून सुरू केले जाईल आणि अनुभवात्मक शिक्षण स्वीकारले जाईल
मध्यान्ह भोजन योजनेचा विस्तार केला जाईल. समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या नियुक्तीद्वारे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर, विशेषतः मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. व्यावसायिक शिक्षण,डिजिटल शिक्षण,हिरव्यागार आणि स्वच्छ शाळा अशा विविध उपक्रमाद्वारे शाळा समृद्ध करण्यात येतील.
हिरव्या आणि स्वच्छ शाळा (GREEN And CLEAN Schools By PM Shri Yojana)
हिरव्या आणि स्वच्छ शाळांसाठी आता लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. बदलते हवामान,वाढते संसर्गजन्य आजार लक्षात घेता या योजनेंतर्गत आपल्या शाळा हिरव्या व स्वच्छ करण्याचा उद्देश आहे. या अंतर्गत पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालये व जेवण्या पूर्वी स्वच्छ हात धुणे यासाठी शाळांमध्ये खास व्यवस्था करण्यात येतील. परिसर स्वच्छ व सुंदर,पर्यावरणपूरक झाडे, परसबाग, सांडपाणी व्यवस्था, गांडूळखत निर्मिती आदी बाबींचा यात समवेश असेल. यासाठी युवा क्लब,इको क्लब, विद्यार्थ्यांची संसद तयार करण्यात येतील याचबरोबर पालकांचा सहभाग घेण्यात येईल. या बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने काही उपक्रम सुरु केले आहे.
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार :- भारत सरकाच्या शिक्षण मंत्रालयाकडून हा पुरस्कार २०१४ पासून सुरु करण्यात आला आहे.
- प्लास्टिक विरहीत शाळा :- NSS,MCC,युवा क्लब,विद्यार्थी संसदेच्या मार्फत शाळेत प्लास्टिक मुक्त शाळा, एकदाच प्लास्टिकचा वापर,त्याची योग्य विल्हेवाट यासाठी जाणीव जागृती होईल.
- सुजल मिशन :- घरगुती किंवा कार्यालयीन इमारतीमध्ये वापरण्यात येणारे सांडपाणी यांचा पुनर्वापर करण्यास प्रोत्साहन देणे.असे पाणी गार्डनसाठी किंवा अन्य कामासाठी वापण्यात येऊ शकते.
- कॅच द रेन मिशन :- पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे या भावनेतून पाणी अडवणे व जिरवणे महत्वाचे आहे.ही एक मोठी चळवळ झाली पाहिजे.
- विद्यार्थी संसद :- विद्यार्थ्यांसाठी विविध क्लब निएमान करणे व संसद मिर्माण करून शाळेतील विविध उपक्रम राबविण्यासाठी एक व्यासपीठ तयार करून देणे.
- शाळा सुरक्षा योजना :- शाळेत काही घटना घडली तर मुलांना त्यातून बाहेर कसे पडायचे याचे प्रशिक्षण देणे. शाळा सुरक्षेचा प्लान शाळेत असणे.
- जल जीवन मिशन :- स्वच्छ भारत मिशन,अटल मिशन हे सर्व कार्यक्रम स्वच्छ शौचालय, स्वच्छ पाणी त्याचा वापर करून मनुष्याचे जीवनमान उंचावण्यासाठी आहे.
- स्वच्छता पंधरवडा :- पंधरा दिवस स्वच्छता अभियान राबवून शाळेची स्वच्छता करणे,स्वच्छतेची सवय लावणे.
- मिशन लाईफ :- लाईफस्टाईल फोर एन्वायर्नमेंट – २०२२ ते २०२८ दरम्यान जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षण व संवर्धन होईल असे पाहणे.
PM Shri Yojana मुळे डिजिटल साक्षरता (DIGITAL LITERCY)
संपूर्ण जग हे डिजिटल झाले आहे त्यामुळे मुलांना ही डिजिटल झाल्याशिवाय पर्याय नाही यासाठी मुलांना डिजिटल शिक्षणाची ओळख करून देण्यात येणार आहे. यामध्ये अध्ययन अध्यापनाचे वेगवेगळे स्थळे, ऑंनलाईन बँकिंग, खरेदी, विक्री यांची माहिती दिली जाईल. ऑंनलाईन व्यवहार करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, काय करावे व काय करू नये याची माहिती दिली जाईल.
व्यावसायिक शिक्षण (VOCATIONAL EDUCATION)
या शाळांमध्ये इयत्ता ६ वी पासून व्यावसायिक शिक्षणाला प्रारंभ होईल.मुलांना व्यावसायिक कौशल्य जसे हेल्थ केअर ,खाद्य संस्करण,विद्युत /इलेक्ट्रोनिक्स,आयटी,प्रवास व पर्यटन,बँकिंग आदींचे शिक्षण दिले जाईल. या शाळांमध्ये सुसज्य प्रयोगशाळा असेल,एक कुशल शिक्षक किंवा प्रशिक्षक असेल,मुलांसाठी क्षेत्रभेटी असतील,तज्ञांचे व्याख्याने,विविध उपकरणे यश मुलांचे मूल्यमापन केले जाईल.
मानसिक आरोग्य (MENTAL HEALTH)
जगातील 970 मिलियन लोक हे मानसिक आरोग्याने पिडीत आहेत ज्यांना उपचाराची गरज आहे. 10% लहान मुले व युवा मुले ज्यांचे वय 5-15 दरम्यान आहेत ते मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. 70% मुले ही मानसिक आजाराच्या उंबरठ्यावर आहेत ज्यांना समुपदेशनाची गरज आहे. या आकडेवारीवरून शाळांमध्ये मानसिक आरोग्यावर काम करणे अति महत्वाचे आहे हे अधोरेखित होते. पालकांच्या अपेक्षा, परीक्षा,महत्वाकांक्षा यामुळे मुले दबली गेली आहेत. त्यांना समजून घेऊन त्यांचे जगणे आनंदी कसे करता येईल, आपले व मुलांचे मानसिक आरोग्य चांगले कसे ठेवता येईल याचे शिक्षण या शाळांमधून देण्यात येईल.
विद्यार्थ्यांचे स्वसंरक्षण (SELF DEFENCE)
33% मुली या केवळ असुरक्षिततेच्या भीतीमुळे शाळाबाह्य झाल्या आहेत.96% मुलींवर नातेवाईक,शेजारी व मित्रांकडून वाईटकृत्ये केली जातात, 43% अल्पवयीन बालके हे बलत्काराचे बळी आहेत या आकडेवारी वरून आपल्या लक्षात येईल की घर,परिसर,शाळा यामध्ये बालकांचे संरक्षण ही मोठी गंभीर समस्या झाली आहे. आता या शाळांमधून बालकांना स्वसंरक्षण कसे करावे याचे कौशल्ये, तंत्र विकसित केले जातील. आरोग्यदायी नातेसंबंध, विश्वासू मित्र, स्पष्टवक्तेपणा, लिंगसमभाव याबाबी शिकविल्या जातील.
शालेय नेतृत्व (SCHOOL LEADERSHIP)
शाळांना सर्वोत्तम करण्यासाठी उत्साही,स्वयंप्रेरित अशा शिक्षकांची गरज आहे. यासाठी शिक्षकांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास झाला पाहिजे. शिक्षकांना विद्यार्थी,पालक,शालेय समित्या यांचे नेतृत्व करावे लागते. यासाठी शिक्षकांमध्ये सकारात्मकता, आत्मविश्वास, 21 व्या शतकातील कौशल्ये अशा अनेक बाबींची ओळख करून देण्यात येतील.
नाविन्यपूर्ण शिक्षण (INNOVATION)
विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन सुशिक्षित करणेच ध्येय नाही तर त्याला स्वत:च्या यशाचा रस्ता ही शोधता आला पाहिजे यासाठी या योजने अंतर्गत नाविण्यतेचा एक फ्रेमवर्क देण्यातले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पना एकत्रित करून त्यातील सर्वोत्तम कल्पना विकसित करण्यात येईल. त्यातून जे प्रोडक्ट तयार होईल त्याची चाचपणी होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम परिषद (SIC) स्थापन करण्यात येईल.त्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या स्पर्धा घेण्यात येतील.
Conclusion On PM Shri Yojana 2024
अशा विविध उपक्रमाद्वारे पीएम श्री शाळेतील विद्यार्थ्यांना घडविले जाईल. या शाळा इतर शाळांसाठी मॉडेल शाळा असतील. सर्व शाळा अशा आदर्श व्हाव्यात तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जे सांगितले आहे ते सर्व या शाळांमध्ये दिसेल अशी अपेक्षा आहे. या शाळांसाठी शासनाने मोठा निधी ही उपलब्ध करून दिला आहे. पर्यवेक्षकीय यंत्रणा या शाळांना भेटी देऊन वेळोवेळी आढाव घेणार आहेत.
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.