PM Poshan Shakti Nirman Yojana Antargat Navin Pakkruti 2024

PM Poshan Shakti Nirman Yojana : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पाककृतीत सुधारणा केली आहे.

Table of Contents

PM Poshan Shakti Nirman Yojana Antargat Navin Pakkruti 2024

समितीने खालीलप्रमाणे सुचविलेल्या 15 प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर पाककृतींचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” प्रमाणे राहील.

PM Poshan Shakti Nirman Yojana 2024 Menu List

1000102710

2) सुधारित पाककृतीनुसार प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे उपरोक्त तक्त्यातील अनु.क्र.1 ते 12 पाककृती वेग-वेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात. जेणेकरुन विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देणे शक्य होईल.

3) परिशिष्ट “अ” मध्ये पाककृतीनिहाय दर्शविण्यात आलेले खाद्यपदार्थ व त्यांचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यांसाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसारआहे. सदरप्रमाणानुसार शिजविलेला आहार विद्यार्थी पूर्णतः खात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे तांदळाची पाककृती तयार केल्यास तांदूळ व डाळी/कडधान्य यांची बचत शक्य आहे.

4) तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्हातील स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गरजेनुरुप पाककृती निश्चित करताना तांदूळ व कडधान्य / डाळ यांचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे.

संबंधित जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या तांदूळाच्या प्रमाणानुसार कडधान्य / डाळ, तेल, मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला निश्चित करावा. (उदा. इ.1 ली ते इ.5 वीसाठी तांदळाचे प्रमाण 50 ग्रॅम (50 टक्के) घेतल्यास कडधान्य / डाळ, तेल, मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला यांचे प्रमाणदेखील त्याच मर्यादेत (50 टक्के) निश्चित करावेत.)

5) तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणेच विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे. सबब, उपरोक्त अनु.क्र.4 नुसार पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदूळापासून तांदळाची खीर आणि शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला व मोड आलेली कडधान्य (स्प्राऊट्स) यांची कोशिंबीर या पदार्थांचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविध्यता येईल. त्यानुषंगाने याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

5.1) विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) देण्यात यावेत. सदर मोड असलेले कडधान्य (स्प्राऊट्स) तयार करण्याची पाककृती सोबत परिशिष्ट “अ” मधील पाककृती क्र. 15 मध्ये आहे.

5.2) विद्यार्थ्यांना आठवड्यातील चार दिवसांकरीता दररोज तांदळाची खीर व आठवड्यातील एक दिवस नाचणीसत्व या गोड पदार्थांचा लाभ नियमित पाककृतीसोबत देण्यात यावा. नाचणी सत्व तयार करण्याची पाककृती सोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये अनु.क्र.14 येथे नमूद केली आहे.

6) सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत आहेत. त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव (पाककृती क्र.9) या पदार्थांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात यावा.

अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरुपात (पाककृती क्र. 1) लाभ देण्यात यावा. तसेच, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत. सदर दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्व व मोड असलेले कडधान्य (स्प्राऊट्स) देण्यात येऊ नये.

7) गोड खिचडी, नाचणी सत्व व तांदळाच्या खीरीच्या पाककृतीसाठी दुध पावडर, गुळ/साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे. सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरविण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूंच्या खरेदीसाठी महिन्यातील दोन दिवसांच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी शाळा स्तरावर वितरीत करावी. सदर निधीमधून शालेय व्यवस्थापन समितीने दुध पावडर, गुळ, साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करुन विद्यार्थ्यांना विहित पदार्थांचा लाभ देण्यात यावा. याबाबतच्या खर्चाचा आढावा शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी घ्यावा. सदर निधीशिवाय अतिरिक्त निधीची गरज असल्यास त्याप्रमाणे निधी शासनामार्फत देण्यात येईल.

8) प्रस्तुत योजनेंतर्गत शाळास्तरावर धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी पुढील निविदा प्रक्रिया राबविताना सोयाबीन पुलावासाठी आवश्यक असणाऱ्या सोयाबीन वडीचा समावेश शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी करावा.

9) नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळांना करण्यात येईल.

10) योजनेंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत.

आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीव्दारे निर्णय घ्यावा. तसेच, मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घ्यावा.

प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच आहार विद्यार्थ्यांना देणे आवश्यक राहील.

11) सदर विषयाच्या अनुषंगाने शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरुन परिपत्रकान्वये आवश्यक त्या सविस्तर सूचना निर्गमित करण्यात याव्यात. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरउपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202406111337397321 असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

PM Poshan Shakti Nirman Yojana Navin Pakkruti PDF Download

Scroll to Top