Family Pension 2024 for divorced,widow daughter | नवीन फॅमिली पेन्शन चा फायदा विधवा, घटस्फोटीत मुलीला कसा होणार

Family Pension 2024: आज आपण Family Pension 2024 संदर्भात नुकत्याच जारी झालेल्या शासन निर्णयासंदर्भात सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.(family pension rules after death of pensioner)

Family Pension For Divorced, Widow Daughter

Family Pension 2024 For Divorced, Widow Daughter : GR (अधिसूचना)

Family Pension 2024 ( family pension rules after death of pensioner) नुसार शासकीय कर्मचारी (Government Employee) मृत पावल्यास तथा एखाद्या Pensioners चा मृत्यू झाल्यास त्याच्या पशच्यात Family Pension साठी पूर्वी 24 वर्षा पर्यंत pension मिळणार अशी अट होती.

आता मात्र Family Pension 2024 साठी मुलानंतर त्याची घटस्फोटित / विधवा मुलगी पात्र असणार आहे.
त्यासाठी काही अटी आहेत, त्या खालील प्रमाणे…….
1.”(तीन) अविवाहित मुलीच्या बाबतीत (मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीव्यतिरिक्त), ती चोवीस वर्षे वयाची होईपर्यंत किंवा तिचा विवाह होईपर्यंत, यांपैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अथवा विधवा किंवा घटस्फोटित असलेल्या व ती स्वतःची उपजिविका करत नाही अशा मुलीच्या बाबतीत;”;

(ब) परंतुकामध्ये परिच्छेद (पाच) नंतर, पुढील परिच्छेद जादा दाखल करण्यात येईल :-

“(सहा) शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्युपूर्वीच अस्तित्वात असलेली विकलांगता;

(सात) जेव्हा मयत शासकीय कर्मचारी किंवा निवृत्तिवेतनधारक त्याच्या पश्चात खंड (एक) किंवा खंड (दोन) किंवा खंड (तीन) अन्वये कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधुर किंवा मुलगा किंवा मुलगी नसेल त्याबाबतीत अथवा जर, खंड (एक) किंवा खंड (दोन) किंवा खंड (तीन) अन्वये कुटुंब निवृत्तिवेतनासाठी पात्र असलेली विधवा किंवा विधुर किंवा मुलगा किंवा मुलगी मृत पावली असेल किंवा त्या खंडामध्ये विहित केलेल्या कुटुंब निवृत्तिवेतनास पात्र राहणार नसेल तर, अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलीला, चोवीस वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजिविकेस सुरुवात करीपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत, पुढील शर्तीच्या अधीन राहून, कुटुंब निवृत्तिवेतन, मंजूर करण्यात येईल किंवा नियमितपणे प्रदेय होईल :-

(ए) शेवटचे अपत्य विहित वयाचे होईपर्यंत, परिच्छेद (दोन) ते (चार) मध्ये निर्धारित केलेल्या क्रमानुसार अपत्यांना प्रथम कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय असेल;

(बी) परिच्छेद (एक) आणि (दोन) ला अनुसरुन, कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यासाठी विकलांगता असलेले पात्र अपत्य;

(सी) अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी जेव्हा, तो किंवा ती किंवा ते हयात होते तेव्हा, तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून होती;

(डी) जेव्हा मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या मागे चोवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकपेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुली असतील तेव्हा, जी मुलगी, त्याच्या जन्मक्रमानुसार या पोट-नियमान्वये कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करील अशा मुलीला, प्रथम कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय होईल;

(इ) सर्वात मोठी मुलगी, तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजिवि करीपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत, कुटुंब निवृत्तिवेतनास हक्कदार असेल आणि सर्वात ध तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर किंवा पुनर्विवाह झाल्यानंतर किंवा तिच्या सुरुवात केल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर, कुटुंब निवृत्तिवेतनास पात्र होईल;

(एफ) विधवा मुलीच्या बाबतीत, तिच्या पतीचा मृत्यु किंवा घटस्फोटित मुलीच्या बाबतीत, शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यास :

परंतु, जर घटस्फोटाची कार्यवाही, शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल, परंतु, त्यांच्या मृत्युनंतर घटस्फोट झाला असेल तर, घटस्फोटित मुलीला, घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय राहील :

परंतु आणखी असे की, जर शासकीय कर्मचाऱ्याचा किंवा निवृत्तिवेतनधारकाचा आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर, मुलीच्या घटस्फोटाच्या दिनांकापूर्वी कुटुंबातील इतर कोणत्याही पात्र सदस्यास कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय झाले असेल तर, कुटुंबातील पूर्वोक्त सदस्य कुटुंब निवृत्तिवेतनाकरिता पात्र असल्याचे बंद किंवा मयत होण्यापूर्वी, अशा घटस्फोटित मुलीला कुटुंब निवृत्तिवेतन सुरु केले जाणार नाही.”;

(क) स्पष्टीकरणातील, परिच्छेद (बी) मध्ये, “मुलीचा ज्या तारखेस विवाह होईल” या मजकुराअगोदर, “मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीखेरीज,” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

Family Pension 2024- FAQ

कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी घटस्फोटित मुलींची पात्रता ?

To be eligible for family pension, the criteria for reduced girls are: 1) She should be unmarried and below 25 years of age; or 2) She should be widowed, divorced or separated from her husband, regardless of her age.
According To Family Pension 2024 अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलीला, चोवीस वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजिविकेस सुरुवात करीपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत, पुढील शर्तीच्या अधीन राहून, कुटुंब निवृत्तिवेतन, मंजूर करण्यात येईल

पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक निवृत्ती वेतन नियम?

Refer GR Dated 8 Feb 2024 महाराष्ट्र शासन राजपत्र

पेन्शन धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतनासाठी कोण पात्र आहे ? Who Is Eligible for Family Pension after pensioners Death ?

पेन्शन धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतनासाठी सर्वप्रथम मुलगा व त्यानंतर घटस्फोटीत विधवा मुलगी पात्र असेल.

अवलंबून असलेल्या भाऊ किंवा बहिणीला कौटुंबिक पेन्शन देय आहे?

होय, भाऊ नंतर बहिणीला

Scroll to Top