50 Health tips in marathi : मित्रांनो सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी राहता येणे खूपच अवघड झाले आहे. त्यासाठी निरोगी राहणे झाले आता सोपे या लेखाच्या माध्यमातून आपणास खूपच महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. निरोगी आयुष्य जगायचे असेल तर या बाबींचे पालन करणे आपणासाठी आवश्यक आहे, चला तर पाहू या निरोगी आयुष्य जगण्यासाठीच्या 50 Health tips in Marathi.
Table of Contents
50 Health tips in marathi for Body
1) कायम सकारात्मक विचार करणे.
2) प्रत्येक कामाचे योग्य नियोजन करणे.
3) आनंदी व उत्साहीत लोकांच्या सहवासात राहणे. .
4) मन एकाग्र राहण्यासाठी प्रयत्न करणे
5) स्वतः निरोगी असल्याची कल्पना करणे.
6) रात्रीचे जागरण न करता पुरेशी 6 ते 7 तास झोप घेणे.
7) शक्यतो दुपारची झोप न घेणे.
8) पचनशक्ती वाढविण्यासाठी उपाय करणे.
9) 75 टक्के तरी शाकाहारी राहणे. मांसाहाराचे प्रमाण कमी करणे,
10) जेवताना पहिला ढेकर येताच जेवण घेणे थांबविले पाहिजे.
11) जेवताना गरज भासल्यास पाणी पिणे.
12) जेवणानंतर थोडेसे पाणी पिणे.
13) जेवणा नंतर एक तासाने पोटभर पाणी पिणे,
14) पाण्याचा प्रत्येक घोट चूळ भरुन पिणे व बसून पिणे.
15) सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या / भांडयातील कोमट पाणी एक ते दिड ग्लास पिणे.
16) पाणी रोज उकळून थंड केलेले कोमट असताना पिणे.
17) सकाळी कोमट पाणी, दुपारी ताक/ मट्ठा व संध्याकाळी दूध पिणे.
18) सकाळी व संध्याकाळी दररोज थंडच पाण्याने स्नान करणे.
19) सर्वच पिष्टमय पदार्थ थोडे जास्तच वेळा चावावेत. उदा. भात, नाचणी, वरी, ज्वारी, बाजरी, गहू, बटाटे, बेकरीतील सर्व पदार्थ इ.
20) प्रत्येक घासामध्ये जास्तीत जास्त लाळ मिसळली पाहिजे.
21) पचन न होणारे अन्न पदार्थ स्वतः ओळखण्यास शिकून त्यांचे प्रमाण कमी करणे. मात्र सर्वच पदार्थांचा आस्वाद घेणे.
22) आहारात कच्चे पदार्थ, भाजीपाला, फळे, भाजके पदार्थ जास्त खाणे.
23) जेवताना बोलणे, हसणे, दुःख व्यक्त करणे टाळावे.
24) पोटाचा निम्मा भाग अन्नाने, पाव भाग पाण्याने तर उरलेला पाव भाग हवेसाठी मोकळा ठेवावा.
25) वजन वाढत असल्यास रात्रीचे जेवण न घेणे किंवा कमी करणे.
26) जेवणात लोणचे, पापड, खारवलेले पदार्थ, मीठ कमी करणे,
27) साखरेचे प्रमाण जास्त असणारे गोड पदार्थ कमी खाणे.
28) मोड आलेली कडधान्ये वाफवून किंवा शिजवून खावीत.
29) मैदा, बेसण पदार्थ आतड्यांना चिकटून राहतात म्हणून कमी खावेत.
30) कोंडा मिश्रित तांदळाची भाकरी जास्तच भाजून खाणे.
31) जास्त कॅलशियम मिळण्यासाठी नाचणीची भाकरी खाणे.
32) उंचीच्या मानाने वजनाचे प्रमाण योग्य ठेवावे. उदा. उंची जेवढी इंच तेवढे कि. ग्रॅम वजन राखावे.
33) लांब वाढणाऱ्या भाज्या खाल्ल्याने माणूस लांबलचक राहतो. उदा. पडवळ, दूधी, शिराळी, कारली, घोसाळी, सर्व प्रकारच्या शेंगा.
34) आकाराने गोल वाढणा-या भाज्या खाल्यास माणूस गोल गोल होतो. उदा. बटाटा, भोपळा, टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची इ.
35) एकाच वेळी पोटभर जेवणापेक्षा जशी भूक लागेल तसे खावे.
36) तेलकट, तिखट, आंबट, खारट पदार्थांचे प्रमाण आहारातून कमी करणे.
37) कडू व तुरट पदार्थ आहारात जास्त घेणे. गोड पदार्थ कमी खावेत.
38) आठवडयातून किमान एक दिवस तरी उपवास करावा.
39) चहा प्यायचा असल्यास ओढत फुरके मारत प्यावा. त्यामुळे चहाचा कोणताच त्रास होत नाही. किडणी, स्टोन प्रॉब्लेम असल्यास काळा चहा दूध व साखर/गुळ नसलेला चहा प्यावा.
40) सांधेदुखी असल्यास आहारात मेथीचे पदार्थ वारंवार खावेत.
41) ॲक्यूप्रेसरचा उपयोग करुन सर्व आजार दूर करता येतात.
42) हातांचे व पायांचे तळवे नियमित सकाळी व संध्याकाळी रिकाम्या पोटी दाबावे,घासावेत व ॲक्यूप्रेसर दयावा.
योगासन / प्राणायाम बाबत Health tips
43) योगासनांचा सराव वारंवार करावा. जेवणानंतर वज्रासनात बसावे. जेवढी शक्य आहेत तेवढीच योगासने करावीत.
44) प्राणायाम मात्र नियमित करावे.
45) कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम दररोज करणे.
46) श्वास रोखून शारीरिक हालचाली करणे.
47) प्राणायाम प्रकार डोळे बंद करुनच करणे.
48) चालणे, धावणे, पोहणे जे शक्य असेल ते वारंवार करणे.
49) ताणतणाव दूर होण्यासाठी डोळे बंद करुन श्वासावर लक्ष्य केंद्रित करणे.
50) ध्यानधारणा, उपासना करुन स्वतःचे आरोग्य निरोगी ठेवता येते.
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.