संकलित मूल्यमापन 2 चे गुण Chat Bot वर नोंदविणे बाबत : विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन 2(PAT-3) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.यावर संकलित मूल्यमापन – 2(PAT-3) चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे.
Table of Contents
विषय : संकलित मूल्यमापन -2 (PAT-3) (महाराष्ट्र) या chat bot वर नोंदविणे बाबत…
संदर्भ : 1. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी/2023-24/3675, दि.8 ऑगस्ट 2023
2. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी-VSK/2023-24/4345 दि.13 सप्टेंबर 2023
उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-2 limproved Learning Assessment System नुसार सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन 1 व संकलित मूल्यमापन 2 (PAT-3) चे आयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन – 2 (PAT-3)चे आयोजन दि. 4 ते 6 एप्रिल 2024 या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-2 घेण्यात आलेले आहे.
सदर संकलित मूल्यमापन – 2(PAT-3) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु-ट्युबद्वारे देण्यात येतील.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन – 2 (PAT-3) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन – 2(PAT-3) चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन 2 (PAT-3) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.15 एप्रिल 2024 रोजी दुपारी ठीक 12:00 ते 1:00 या कालावधीत यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात येईल. संबधित शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण यु-ट्युबद्वारे घेण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी संकलित मूल्यमापन 2 (PAT-3) चे गुण दि.15 एप्रिल ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी. सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन – 2 (PAT-3) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे.
ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन – 2 (PAT-3) घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटवॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.
तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.
यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन) दि 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12.00 ते 1.00
https://youtube.com/live/xnnTpdMylxY?feature=share
PAT-3 चाटबॉट मार्गदर्शिका :
https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RI QhbVIj2D7qQgW5Zj6/view?usp=sharing
संकलित मूल्यमापन 2 गुणांची नोंद करणेसाठी लिंक – 2 (PAT-3)
https://cqweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7.
परिपत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या DOWNLOAD बटनावर क्लिक करा.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.