Lek Ladki Yojana 2024| Maharashtra, Online Registration,Form Link and Download PDF

Lek Ladki Yojana 2024: योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील  मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय ठरवले आहे. तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) सुरु केलीय. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम  करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

Lek Ladki Yojana 2024| Maharashtra, Online Registration, Form Link and Doqnload PDF
Lek Ladki Yojana 2024| Maharashtra, Online Registration, Form Link and Doqnload PDF

लेक लाडकी योजने (Lek Ladki Yojana) चा शुभारंभ महाराष्ट्रात झाल्यानंतर, 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले. जाणून घेऊयात आपण लेक लाडकी योजना नेमकी काय? या योजनेचा नेमका कोणाला लाभ मिळणार? या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात.

Lek Ladki Yojana चा नेमका उद्देश काय आहे ?

या योजनेच्या माध्यमातून:-

  1. राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देने
  2. मुलींचा जन्मदर वाढवणे
  3. मुलींच्या शिक्षणास चालना देणे
  4. मुलींचा मृत्यूदर कमी करणे
  5. बालविवाह रोखणे,
  6. कुपोषण कमी करणे,
  7. शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.

यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘Lek Ladki Yojana’ ही योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे.

Lek Ladki Yojana या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

  1. लेक लाडकी योजने साठी केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली पात्र असणार.
  2. 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणारआहे.
  3. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर केवळ मुलीलाच लाभ मिळणार आहे.
  4. पहिल्या अपत्याच्या पहिल्या  हप्त्यासाठी आणि दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना, माता पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र इतर कागदपत्रांसोबत सादर करणे आवश्यक आहे.
  5. लाभार्थी कुटुंब हे कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  6. लाभार्थ्यांचे बँक खाते हे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक आहे.
  7. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 100000/- लाखापेक्षा जास्त नसावे.

Rooftop Solar Yojana बाबत ची माहिती घर बसल्या भरा मोबाईल वर व मिळवा Subsidy

Lek Ladki Yojana  साठी  आवश्यक कागदपत्रे:

लेक लाडकी योजना 2024 साठी अर्ज सादर करताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. सर्व फॉर्म सोबत  एकूण 10 कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

  1. लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला
  2. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे) सोबत तहसीलदाराचा दाखला आवश्यक आहे.
  3. लाभार्थी मुलीचे आधार कार्ड (केवळ पहिल्या हप्त्या वेळी सादर करणे आवश्यक)
  4. मुलीच्या आई – वडिलाचे आधार कार्ड
  5. बँक पासबुक झेरॉक्स (फक्त पहिल्या पानाची)
  6. रेशन कार्ड झेरॉक्स (केशरी किंवा पिवळे) [पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स]
  7. मतदान कार्ड ओळखपत्र (शेवटच्या हप्त्या वेळी जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल)
  8. शाळेचा बोनाफाईड (मुलगी ज्या वर्गात शिकत आहे त्या संबधित लाभ मिळवण्यासाठी)
  9. माता पित्यांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (केवळ दोन आपत्य असल्यास)
  10. मुलीचे अविवाहित प्रमाणपत्र (18व्या वर्षी अंतिम हप्ता 75 हजार मिळवण्यासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा) सोबत स्वयं घोषणापत्र.

त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे.

Lek Ladki Yojana च्या हप्त्याची रक्कम

मुलीचा जन्म झाल्यानंतर₹5,000/-
मुलगी इयत्ता 1 ली  मध्ये गेल्यावर₹6,000/-
मुलगी 6  वी त गेल्यावर₹7,000/-
मुलगी 11 वी त गेल्यावर₹8,000/-
मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर₹75,000/-
एकूण लाभ –₹1,01,000/-

Pensioners life Certificate Submission बाबत मोठी बातमी मराठी मध्ये जाणून घ्या!

Lek Ladki Yojana चा लाभ घेण्यासाठी कुठे  अर्ज कराल?

तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे. या अर्जात तुमची

  • वैयक्तिक माहिती,
  • पत्त्याची माहिती,
  • मोबाईल नंबर,
  • अपत्यांची माहिती,
  • बँक खात्याचा तपशील आणि
  • योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे.
  • तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.
  • अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.

Lek Ladki Yojana PDF  DOWNLOAD करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.

Lek Ladki Yojana 2024 PDF  DOWNLOAD

Lek Ladki Yojana 2024| Maharashtra, Online Registration,Form Link and Download PDF

Scroll to Top