ELeave: सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना यापुढे घ्यावी लागणार ऑनलाईन रजा

ELeave: ELeave च्या बाबतीत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दि.28/03/2024 रोजी जारी करण्यात आला आहे.ज्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2024 पासून करण्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.

ELeave: सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना यापुढे घ्यावी लागणार ऑनलाईन रजा
ELeave: सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना यापुढे घ्यावी लागणार ऑनलाईन रजा

Table of Contents

ELeave बाबतीत शासन परिपत्रक

राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबीसंदर्भात eHRMS (Human Resource Management System) प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्या प्रणाली अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत.

सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधीनस्थ कार्यालयांचा (उदा. आयुक्तालय, संचालनालय इ.) समावेश या eHRMS प्रणालीत करण्यात येणार आहे. सदर प्रणालीवर सर्व अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तकविषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना दि.03 मार्च, 2023 च्या परिपत्रकान्वये सूचित करण्यात आलेले आहे.

2. eHRMS प्रणालीमध्ये leave या सेक्शनमध्ये रजेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा दिलेली आहे. मात्र बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. eHRMS प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित होण्याकरिता प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक असल्याने सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी (खुद्द आणि क्षेत्रीय) यांना दिनांक 01 एप्रिल, 2024 पासून त्यांचे सर्व रजेचे अर्ज eHRMS प्रणालीमार्फतच सादर करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच सर्व विभागांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे रजा लेखे अद्ययावत करावीत. कोणतेही रजेचे अर्ज यापुढे ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत.

ELeave: सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना यापुढे घ्यावी लागणार ऑनलाईन रजा
ELeave

3. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक 202403281238182407 असा आहे.

परिपत्रक DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

DOWNLOAD

 

Scroll to Top