मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जरेवाडीची शाळा विभागात तृतीय; ११ लाखाचे बक्षिस अन् मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

जरेवाडी शाळा ता.पाटोदा : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जरेवारी (ता. पाटोदा) येथील जिल्हा परिषद शाळेने विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे. शाळेला ११ लाखाचे बक्षीस मिळाले असून दि.५ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जरेवाडीची शाळा विभागात तृतीय; ११ लाखाचे बक्षिस अन् मुख्यमंत्र्यांकडून सत्कार
जरेवाडीची शाळा विभागात तृतीय

मुंबई येथील पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण उपसंचालक साबळे यांच्या हस्ते जरेवाडी शाळेस ११ लक्ष रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

जरेवाडी शाळा विभागात तृतीय

शाळांच्या भौतिक विकासासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही स्पर्धा होती. या स्पर्धेत जरेवाडी जिल्हापरिषद शाळेने शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्याथ्यांच्या भरीव सहभागातून यश संपादन केले. तालुका व जिल्हास्तरावरील मूल्यमापनात प्रथम, तर विभागस्तरावरील मूल्यांकनांमध्ये जरेवाडी शाळा तृतीय क्रमांकावर यशस्वी झाली. याबद्दल शिक्षणाधिकारी (मा.) नागनाथ शिंदे, शिक्षणाधिकारी (प्रा.) भगवान फुलारी, सरपंच, पालकांनी स्वागत केले आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील उल्लेखनीय बाबी: शाळेचे सर्व काम सौरऊर्जेवर

• डोंगराच्या पायथ्याशी उभारलेली आकर्षक व भव्य इमारत, शाळेचे संपूर्ण काम सौरऊर्जेवर, दहा वर्षात गळतीचे प्रमाण शून्य टक्के, तर पटनोंदणी १०० टक्क्यांपेक्षा जास्त, दहा वर्षांत ग्रामस्थांनी वस्तू रूपाने ३० लाख रुपयांची मदत केली.

• परसबाग, गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प, भाजीपाला शेती, इमारत बांधकामासह भौतिक सुविधा, शाळेत अद्ययावत स्वतंत्र संगणक व स्वतंत्र प्रोजेक्टर हॉल, कलादालन, दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनात शाळेला दोन लाख रुपयांपेक्षा जास्त बक्षीस मिळतात.

 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामुळे राज्यातील अनेक शाळांचे रूपडे हे पालटले आहे. विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शाळा विकसित कशा होऊ शकतात, याची प्रचिती आली. सर्व शिक्षक, विद्याथी, पालकांच्या परिश्रमातून हे यश प्राप्त झाल्याचा आनंद आहे.

संदीप पवार, आदर्श शिक्षक जि.प.प्रा. शाळा, जरेवाडी.

 

 

Scroll to Top