“आनंददायी शनिवार” या उपक्रमाची गरज : तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे.
Table of Contents
“आनंददायी शनिवार” हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांसाठी : या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. यानुषंगाने “आनंददायी शनिवार” हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांसाठी राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचें उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी “आनंददायी शनिवार” हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
“आनंददायी शनिवार” उपक्रम शासन परिपत्रक:
“आनंददायी शनिवार” या उपक्रमाची खरी गरज-
विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
“आनंददायी शनिवार” या उपक्रमाचा उद्देश –
- विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
- विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे
- शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे
- विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवरमात करण्याची क्षमता निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे
आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये खालील कृतींचा समावेश असेल.
- प्राणायाम / योग/ ध्यान-धारणा / श्वसनाची तंत्रे
- आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण
- दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन
- स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना
- रस्ते सुरक्षा
- समस्या निराकरणाची तंत्रे
- कृती, खेळ यावर आधारित उपक्रम
- Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम
- नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य
वरील कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपुर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना राहील.
४. आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असतांना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपध्दतीनदवारे आंनददायी स्वरुपाचा होण्याच्या दृष्टिने आयुक्त (शिक्षण), पुणे व संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी एकत्रितपने रूपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करावी.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४०३१४२०५००३९६२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
सदर शासन परिपत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या DOWNLOAD बटनावर क्लिक करा.
आनंददायी शनिवार काय आहे ?
आनंददायी शनिवार हा एक उपक्रम आहे
आनंददायी शनिवारची उद्दिष्ट काय आहेत?
विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे
शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे
विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवरमात करण्याची क्षमता निर्माण करणे.
विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे
आनंददायी शनिवारचा हेतू काय आहे?
तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
आनंददायी शनिवारचा काय फायदा होईल?
या उपक्रमामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत होईल व विद्यार्थी आनंदाने शाळेत येतील
आनंददायी शनिवार नेमका कसा साजरा करायचा?
शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृती घेऊन साजरा करावा
कृती खालील प्रमाणे असाव्यात :
प्राणायाम / योग/ ध्यान-धारणा / श्वसनाची तंत्रे
आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण
दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन
स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना
रस्ते सुरक्षा
समस्या निराकरणाची तंत्रे
कृती, खेळ यावर आधारित उपक्रम
Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम
नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य
आनंददायी शनिवार कधी साजरा करायचा?
आनंददायी शनिवार महिन्याच्या प्रत्येक शनिवारी साजरा करायचा
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.