Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala :मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी: विदयार्थ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे
Table of Contents
राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमातंर्गत सर्व शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदवला आहे, राज्यातील 1 लाख 1 हजार शाळांनी आजामितीस सहभाग नोंदविला असून शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. “Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील 2 कोटी 11 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विदयाथ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून “Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala’ या अभियानाचा प्रारंभ केला आहे. राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.inhttp://www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर
पुढीलप्रमाणे सहभाग विदयाथ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
1. शैक्षणिक घोषवाक्य अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विदयार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे,
2. मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी: विदयार्थ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे,
या दोन स्वतंत्र उपक्रमा मधील सहभागी विदयार्थ्यांमधून प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयार्थ्याला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.
3. वाचन प्रतिज्ञा : प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दीगत होण्यासाठी ‘वाचन सवय प्रतिज्ञा’ मुलांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विदयाध्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच विदयाथ्यांकरीता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विदयार्थ्यांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.
याकरीता http://www.mahacmletter.in या संकेतस्थळावर या दोन उपक्रमांपैकी एक उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे. त्याकरीता या सोबत जोडलेल्या मॅन्युअल/फ्लोचार्ट प्रमाणे शाळास्तरापर्यंत सर्व विदयार्थ्यांना सूचना पोहच होतील याची दक्षता घेण्यात यावी, वरील एक ते तीन वरील उपक्रम संकेतस्थळावर दि. 17/02/2024 ते दि.25/02/2024 या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत, त्याप्रमाणे सोबत जोडलेला फ्लोचार्टनुसार अंतिम दिनांकापूर्वी उपक्रमाची माहिती अपलोड करण्याच्या सूचना सर्व
संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.असे पत्रात नमूद केले आहे.
Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala फ्लोचार्ट
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.