Income Tax वजावटी अंतर्गत मा. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आपल्या 2023 मधील अर्थसंकल्पात जुन्या स्किममध्ये आयकराच्या करमाफ उत्पन्न मर्यादा व आयकर दर या मध्ये काहीही बदल केला नाही. आर्थिक वर्ष २०२३-24 साठी करदात्यासाठी आयकराची मर्यादा व दर खालील प्रमाणे असतील . तसेच नवीन स्किममध्ये यावर्षी आयकरामध्ये बऱ्यापैकी सूट दिली आहे.
Table of Contents
पगारी उत्पन्नातून मिळणाऱ्या वजावटी
01) घरभाडे भत्ता : कलम 10 (13 ए): स्वतःच्या मालकीचे राहते घर नसलेल्या व एकूण वार्षिक पगाराच्या 10% पेक्षा जास्त घरभाडे देणाऱ्या कर्मचाऱ्याचा घरभाडे भत्ता जास्तीतजास्त मिळणाऱ्या घरभाडे भत्त्याइतका कमी होऊ शकतो. त्यासाठी भाडे पावती लागेल. तसेच घरमालकाचे पॅन क्रमांक ही द्यावा लागेल.
02) प्रमाणित वजावट : कलम 16: प्रमाणित वजावट ₹ 50,000/- किंवा मिळालेला पगार यापैकी कमी असलेली रक्कम स्टॅण्डर्ड डिडक्शन म्हणून दोन्ही स्किममध्ये वजावटीस पात्र आहे.
03) व्यवसाय कर : कलम 16 (iii): प्रत्यक्ष भरलेल्या व्यवसाय कराची संपूर्ण वजावट या कलमाखाली मिळेल.
04) घरबांधणी/खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज : बँका यांचेकडून घेतलेल्या दोन घरासाठीच्या गृहकर्जावरील व्याजाला ₹ 2 लाखांची वजावट मिळेल. तसेच घरदुरुस्तीसाठी किंवा टॉपअप कर्ज घरासाठी घेतले असल्यास ₹ 30,000/- ची वजावट मिळेल.
05) गुंतवणूकीवरील वजावट (कलम 80 सी): प्रॉ. फंड, कर बचत म्युच्युअल फंड, विमा हप्ता, पी.पी.एफ., एन.एस.सी., पायाभूत उद्योगाचे बाँड, नाबार्ड बाँड, शैक्षणिक फिज्, पेन्शन फंडात केलेली गुंतवणूक, सुकन्या समृद्धी योजना, घरासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड, शेड्यूल्ड / नॅशनल बँकेत 5 वर्षांकरिता केलेली मुदत ठेव. इ. मध्ये गुंतवणूक / खर्च केल्यास त्याची उत्पन्नातून वजावट मिळते. ही मर्यादा ₹ 1.5 लाख आहे.
गोंधळ कमी करण्यासाठी विशिष्ट योजनेत विशिष्ट गुंतवणूक करता येईल अशी मर्यादा काढून टाकली असून एका किंवा त्यापेक्षा जास्त योजनांमध्ये ₹1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक / खर्च करुन वजावट मिळवता येईल.
05अ) (कलम 80 सीसीडी): कलम 80 सीसीडी (2) मध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यातील केंद्र अथवा राज्य सरकारने भरलेल्या 14% अंशदान उत्पन्नाचे निर्धारण करताना संपूर्णपणे वजावटीस पात्र आहे. तसेच कर्मचाऱ्याचे स्वतःचे 10% अंशदान हे कलम 80 सी अंतर्गत वजावटीस पात्र आहे.
06) वैद्यकीय विमा योजना: (कलम 80 डी) या योजनेअंतर्गत वैद्यकीय खर्चाची भरपाई मिळण्यासाठी असणारी ‘मेडिक्लेम
पॉलिसी’ आणि वैद्यकीय तपासणीसाठी केलेला खर्च (₹ 5000/-) स्वतः, स्वतःच्या पती / पत्नी / मुले / आई / वडिलांसाठी केलेली असेल तर ₹ 25,000/- ची सुट मिळेल.
तसेच या योजनेअंतर्गत जर करपात्र व्यक्तींचे आई वडील हे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या वैद्यकीय विमा व वैद्यकीय खर्चावर ₹ 50,000/- ची वजावट मिळेल. वरील दोन्ही प्रकारातील खर्च / हप्ते हे बँकेतून झालेले पाहिजेत.
07) नॅशनल पेन्शन स्कीम: कलम 80 सीसीडी (आयबी): या कलमाखाली कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्या खात्यामध्ये भरलेल्या ₹ 50,000/- पर्यंतच्या रकमेला सुट मिळेल.
08) उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजावर सुट : (कलम 80 ई): स्वतःच्या पती/पत्नी/मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता घेतलेल्या कर्जावरील भरलेल्या पूर्ण व्याजाची सुट या कलमान्वये मिळेल.
09) अवलंबून असणाऱ्या अपंग व्यक्तीसाठी केलेला वैद्यकीय खर्च व गुंतवणूक : (कलम 80 डीडी) : या अशा अवलंबून असणाऱ्या व्यक्तीसाठी केलेल्या खर्चाची किंवा गुंतवणूकीची वजावटीची मर्यादा र 75,000/- पर्यंत वाढविणेत आली आहे. अपंगत्व हे जर गंभीर स्वरुपाचे (80% किंवा जास्ती) असेल तर ₹ 1,25,000/- एवढी सुट मिळेल.
10) अपंगत्व : (कलम 80 यु): करदाता स्वतः 40% पेक्षा जास्त अपंग असेल तर या कलमान्वये सुट ₹75,000/- एवढी आहे.
वरील कलमांतर्गत अपंगत्व हे जर गंभीर स्वरुपाचे (80% किंवा जास्त) असेल तर ₹ 75,000/- चे ऐवजी र 1,25,000/- एवढी सुट मिळेल.
11) दीर्घ औषधोपचार लागणाऱ्या रोगाच्या उपचारासाठी वजावट (कलम 80 डी.डी.ची.): काही ठराविक रोगाच्या (मेंदूचे आजार, कैंसर, एडस्, हिमोफिलीया इ.) उपचारासाठी/पुनर्वसनासाठी करदात्याच्या उत्पन्नातून झालेला प्रत्यक्ष खर्च किंवा र 40,000/ – यापैकी जी रकम कमी असेल ती वजावटीस पात्र राहिल व ही सवलत मिळणेसाठी सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सर्टिफिकेट व खर्चाचे पुरावे दरवर्षी द्यावे लागतील. विम्यापोटी किंवा मालकाकडून औषधोपचाराच्या खर्चापोटी काही रकम भरपाई म्हणून मिळाली असेल तर तेवढ्याने ह्या कलमाखालील वजावट कमी होईल. आजारी व्यक्ती 60 वर्षावरील असेल तर र 1,00000/- वजावट मिळेल.
12) देणगीवरील सुट : (कलम ८० जी): मान्यताप्राप्त सार्वजनिक / सामाजिक संस्था अथवा संघटना यांना दिलेल्या देणगीच्या 50% रकम वजावटीस पात्र राहिल. देणगी एकूण पगाराचे (गुंतवणूक वजा जाता) 10% पर्यंतच ग्राह्य धरली जाईल. तसेच र 2,000/- वरील देणगी ही रोखीने दिलेली असल्यास मान्य होणार नाही.
13) विजेवर चालणाऱ्या 4 चाकी वाहनांवर मिळणारी सुट (80 इ.इ.बी.): विजेवर चालणाऱ्या 4 चाकी वाहनांसाठी करपात्र व्यक्तीनी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले असल्यास त्या व्यक्तीस आयकरात त्याने भरलेल्या व्याजाची ₹1,50,000/- पर्यंत सुट मिळेल. (कर्ज हे 01/04/2019 ते 31/03/3023 या कालावधीत घेतलेले असावे.)
14) बँक व्याज : (कलम 80 टी.टी.ए.): सर्व बँकेतील बचत खातेवरील करदात्याला मिळणारे व्याज ₹ 10,000/- पर्यंत करमाफ केले असून ₹ 10,000/- पेक्षा जास्त मिळणारे असे व्याज व सर्व बँकामधील ठेवींवर मिळणारे सर्व व्याज पगारात मिसळून आयकर गणना करावी लागणार आहे. 01/04/2020 पासून बँका / कंपन्यांकडून मिळणारा लाभांश (डिव्हीडंड) करपात्र करणेत आला आहे. (बँकेतील ठेवींवरील व्याज हे आपले पॅनवर ऑनलाईन दिसत आहे)
15) (कलम 87 ए) : नवीन स्किममध्ये करपात्र उत्पन्न 6,00,000/ चे आत असेल तर बसणारा आयकर किंवा ₹ 24000 / यापैकी कमी असलेली रक्कम सुट मिळेल. तसेच जुन्या स्किममध्ये करपात्र उत्पन्न 5,00,000/- चे आत असेल तर र 12,500/- पर्यंत आयकरामध्ये सूट मिळेल.
16) वेतन थकबाकी (Arrears) मिळाली असेल तर सुट (Relief): कलम 89 (1) : फॉर्म 10 ई भरुन वरील कलमाखाली आयकर कमी होऊ शकतो.
१७) आयकर कायम खाते क्रमांक (PAN) (कलम 139 ए) सुधारीत आयकर कायद्याप्रमाणे एकूण मासिक पगार र 20,833/- किंवा अधिक असेल व आयकर क्रमांक (पॅन) घेतला नसेल तर आयकर क्रमांक (पॅन) घ्यावा लागेल. सदरचे सर्व काम आता युनिट ट्रस्ट/एन.एस.डी. एल. या खाजगी संस्थेकडे दिले असून त्यासाठी आता रंगीत फोटो 2, आधार कार्ड व इतर माहिती लागेल.
१८) विवरण पत्र दाखल करणे बाबत कलम 139 ए (1 ए) आकारणी वर्ष 2024-25 (आर्थिक वर्ष 2023-24 ) या वर्षाकरिता ₹ 2,50,000/- पेक्षा जास्ती उत्पन्न असणाऱ्या सर्व व्यक्तींना (आयकर कपात असो वा नसो) विवरणपत्र आय.टी.आर.-1 फॉर्म मध्ये 31 जुले पर्यंत सादर करावे लागेल. उशीरा विवरणपत्र दाखल केलेस (31 जुलै नंतर) दंड र 5000/- पर्यंत लागू शकतो. 5 लाखाचे वर उत्पन्न असाणाऱ्यांना विवरणपत्र ऑनलाईन (E-Filling) भरणे सक्तीचे केले आहे.
19) उद्गम कर कपात : कलम 192: सदर कलमान्वये मालकाने (Employer) प्रत्येक करपात्र व्यक्तीला वार्षिक आयकर किती बसतो ते काढून सदर बसलेला आयकर हा दरमहा सरासरीने 12 महिन्यामध्ये कपात करुन पगार झालेवर 7 दिवसांचे आत बँकेत चलनाने भरणेचा आहे. न भरलेस किंवा कमी भरणा झालेस उशीरासाठी दरमहा 1.25% व्याज भरावे लागेल. तसेच दरवर्षी अखेरीस एकूण कापलेल्या करासंबंधीचे प्रमाणपत्र फॉर्म नं 16 मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑनलाईनवर काढून प्रत्येक कर्मचाऱ्यास द्यावयाचे आहे.
20) तिमाही वेतन विवरणपत्र (फॉर्म नं. २४ क्यू): पगारातून कपात केलेल्या आयकर कपातीचे विवरणपत्र त्रैमासिक करण्यात आलेले असून दर तिमाही विवरणपत्र फॉर्म नं. 24 क्यू मध्ये तिमाही संपल्यावर 30 दिवसांचे आत म्हणजे दरवर्षी 31 जुलै, 31 ऑक्टोबर व 31 जानेवारी पर्यंत दाखल करावे लागेल व शेवटचे तिमाही विवरणपत्र दाखल करणेसाठी अंतीम मुदत 31 मे पर्यंतच राहिल. वरील सर्व विवरणपत्र दाखल करणेस उशीर झालेस विवरणपत्र दाखल करेपर्यंत कलम 272 ए प्रमाणे प्रतिदिन 200/- प्रमाणे फी भरुन विवरणपत्र सादर करावे लागेल.
21) शेअर्स व म्युच्युअल फंड यांच्या विक्रीवरील भांडवली नफा हा आर्थिक वर्ष 2020-21 पासून करपात्र केलेला असून असे झालेले सर्व व्यवहार आपल्या पॅनवर ऑनलाईन दिसत आहेत.
वरील प्रमाणे आर्थिक वर्ष 2023-24 करिता पगारदारांकरीता आयकराचे सर्वसाधारण नियम आहेत. वरील नियमांचा विचार करुन नियोजनबद्ध गुंतवणूक आताच केली तर बचत होऊन प्राप्तिकरही वाचेल व पुढे ऐनवेळेस होणारी धावपळही कमी होईल.
Old Regime:
वार्षिक उत्पन्न | प्राप्तिकराचा दर |
₹ 2,50,000/- पर्यंत | काहीही नाही |
₹ 2,50,001/- te 5,00,000/- | 5% |
₹ 5,00,001/- te 10,00,000/- | ₹ 12,500/- +5 लाखावरील उत्पन्नावर 20% |
₹ 10,00,001/- च्या वरील सर्व | ₹ 1,12,500/- + 10 लाखावरील उत्पन्नावर 30% |
+ 4% Health and Education Cess
New Regime:
वार्षिक उत्पन्न | प्राप्तिकराचा दर |
0 te ₹ 3,00,000/- | नाही |
₹ 3,00,001/- te ₹ 6,00,000/- | 5% |
₹ 6,00,001/- te ₹ 9,00,000/- | 10% |
₹ 9,00,001/- te ₹ 12,00,000/- | 15% |
₹ 12,00,001/- te ₹ 15,00,000/- | 20% |
₹ 15,00,001/- te varil sarv | 30% |
+ 4% Health and Education Cess
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.