BLO,Election Duty Compulsory For Teachers! शिक्षकांना BLO व Election Duty बंधनकारक

Election Duty: राज्यातील सर्वच शाळांमध्ये शिक्षकाची कमतरता असल्याने, शिक्षकांना विद्यार्थी गुणवत्तेसाठी किमान BLO,ELECTION Duty तून सूट मिळावी यासाठी शिक्षक संघटनेचा प्रयत्न होता, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

Maharashtra state Teacher's ! BLO/Election Duty Compulsory| शिक्षकांना BLO व Election Duty बंधनकारक

प्रत्येक विद्यार्थ्याची ऑनलाइन माहिती भरणे, पोषण आहाराचा हिशेब, शिष्यवृत्ती परीक्षांचे अतिरिक्त तास, गुणवत्ता वाढविण्यासाठी उपायात्मक अध्यापन, सराव चाचण्या, सत्र परीक्षा आणि निकाल जाहीर करणे अशी अनेक कामे शिक्षकांना शाळांमध्ये करावी लागतात. स्पर्धेदरम्यान पटसंख्येअभावी मराठी शाळा बंद पडत आहेत. त्यावेळी शिक्षकांनी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, वर्षा गायकवाड आणि आता दीपक केसरकर यांच्याकडे निवडणूक ड्युटीतून कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वांकडून आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, मात्र त्यांनाही अद्याप तोडगा निघालेला नाही. सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असतानाही शिक्षकांना BLO,ELECTION Duty का दिली जाते, याबाबत शिक्षकांना आश्चर्य वाटते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 25 हजार तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यात अनुदानित शाळांचे आणखी शिक्षक जोडले जाणार आहेत.

 

Scroll to Top