Adhyayan Nishpatti : आज आपण पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान अंतर्गत तपासल्या जाणाऱ्या अध्ययन निष्पत्ती विषयी पाहणार आहोत. इयत्ता निहाय व विषय निहाय अध्ययन निष्पत्ती आपण या लेखांतर्गत पाहणार आहोत.
Table of Contents

इयत्ता नुसार अपेक्षित क्षमता (अध्ययन निष्पत्ती) :
इयत्ता पहिली – भाषा- मराठी
- स्वतःच्या भाषेचा उपयोग करुन गप्पागोष्टी करतात.
- मत व्यक्त करतात, प्रश्न विचारतात.
- चित्राचे निरीक्षण करतात.
- ध्वनी ऐकून, समजून ओळखतात.
- अक्षर ओळखतात, लिहण्याचा प्रयत्न करतात.
- अपठीत मजकूर असलेली किमान 4-5 साधे शब्द असलेली छोटी वाक्ये वाचतात.
इयत्ता- पहिली-भाषा – इंग्रजी
- A,B,C,D ओळखतात व अचुक वाचन करतात.
- परिचित वस्तु आणि चित्रांसाठी इंग्रजी शब्द शिकतो. त्यांना नावे देतो.
- कॅपीटल व स्मॉल लिपीमधील फरक ओळखतात.
- साध्या सुचना, आदेश याप्रमाणे प्रतिसाद देतात.
- काळजीपूर्वक ऐकतात.
- स्वतःविषयी इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात.
- छोटी छोटी शब्दे लिहतात.
- इंग्रजी गाणे, कविता आनंदाने ऐकतात.
- 10 पर्यंत संख्या मोजतात.
- शब्द आणि चित्रे यांच्या जोड्या लावतात.
इयत्ता- पहिली – गणित
- 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांवर कृती करतात.
- आकार, लहान-मोठेपणा यानुसार वर्गीकरण करतात.
- 20 पर्यंत संख्यांची नावे म्हणतात आणि मोजतात.
- 1 ते 9 अंकांचा वापर करुन वस्तु मोजतात.
- 20 पर्यंत संख्यांची कमी जास्त याप्रमाणे तुलना करतात.
- दैनंदिन जीवनातील 9 पर्यंत संख्यावर आधारित बेरजेचे प्रश्न सोडवतात.
- चित्रे/अंक वापरुन माहिती गोळा करतात
इयत्ता दुसरी भाषा – मराठी
- माहिती मिळविण्यासाठी प्रश्न विचारतात.
- गप्पा, गोष्टी, कथा लक्षपूर्वक ऐकतात, स्वतः च्या भाषेत सांगतात.
- आपल्या स्तरानुसार कविता, चित्र, पोस्टर्स इ. चे वाचन करतात. त्याविषयी प्रतिक्रया देतात. प्रश्न विचारतात.
- ऐकलेल्या किंवा मनातल्या गोष्टींना स्वतःच्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे चित्र शब्द / वाक्यांद्वारे लिखित स्वरुपात अभिव्यक्त करतात.
- आपल्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव आपल्या लेखनात समाविष्ट करतात.
- अपठीत मजकूर असलेली 40-50 शब्द प्रती मिनिट अर्थासह वाचतात.
- स्वतःच्या कल्पनेने कथा, कविता इ. ऐकवतात व त्यात भर घालतात.
- चित्रातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात.
इयत्ता दुसरी भाषा – इंग्रजी
- इंग्रजीमधील कविता ऐकतात, म्हणतात आणि हावभाव करतात.
- विविध रंग, आकार, वजने ओळखतात.
- इंग्रजीमधील स्त्रीलिंगी, पुलिंगी संबंधी वापरावयाचे सर्वनामे ओळखतात.
- Preposition चा वापर करतात. जसे Like, Before, Between etc.
- स्वतःविषयी बोलतात.
- 50 पर्यंत अंक ओळखतात व सांगतात.
- दिलेल्या सुचनांचे पालन करतात.
- कथा किंवा कवितांना प्रतिसाद म्हणून काही शब्द, वाक्ये, छोटी वाक्ये लिहतात.
इयत्ता दुसरी- गणित
- 99 पर्यंतच्या संख्या वाचतात. लेखन करतात, साधी बेरीज व वजाबाकी करतात.
- 50 पर्यंतच्या संख्या शब्दात लिहीतात.
- दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या साहाय्याने 2,3,4,5 आणि 10 चे पाढे तयार करतात व ते वापरतात.
- दोन अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करतात.
- समान तसेच वेगवेगळ्या किमतीच्या विविध नोटा नाणी वापरुन 100 रु. पर्यंतची रक्कम तयार करतात
- घन, गोल, चौकोन, त्रिकोन, शंकू आकार ओळखतात.
- दोन वस्तुंची जड हलकी अशी तुलना करतात.
- 100 रु. पर्यंतच्या नोटा, नाणी ओळखतात आणि त्यावर बेरीज वजाबाकी क्रिया करतात.
- आठवड्यातील वारांची नावे, महिन्यांची नावे ओळखतात.
इयत्ता तिसरी भाषा – मराठी
- सांगितली जाणारी गोष्ट, कथा, कविता, समजपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात.
- गोष्ट कविता आरोह अवरोहांसह ओघवत्या भाषेत सांगतात.
- गोष्टी, कविता किंवा इतर साहित्य प्रकार समजून घेऊन त्यांत स्वतःच्या माहितीची भर घालतात.
- वर्तमानपत्र, बालसाहित्य, सूचनाफलक समजपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्न विचारतात, मत व्यक्त करतात.
- लेखन करतांना विरामचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह यांचा जाणीवपूर्वक वापर करतात.
- विविध साहित्य प्रकारात आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा अर्थ सुनिश्चित करतात.
- अपठीत मजकूर असलेली 60 शब्द प्रती मिनिट अर्थासह वाचतात.
इयत्ता तिसरी- इंग्रजी
- लक्षपूर्वक श्रवण करतात.
- परिच्छेद वाचन करुन त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात.
- इंग्रजी नाटिकांमध्ये भाग घेऊन हावभावासह अभिनय करतात.
- इंग्रजीमधील छोटा परिच्छेद वाचन करतात व अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
- इंग्रजी सुचनांना प्रतिसाद देतात.
- कौटुंबिक विषयावर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात.
- सांगितलेली सोपे शब्द लिहीतात.
- सोपे विरुद्धार्थी शब्द ओळखतात.
- भिंतींवरील चार्टस, टेबल्स, नकाशे, पोस्टर्सचे वाचन करतात.
- छोट्या शब्दांमध्ये चित्रे, उपक्रम, सन व्यक्त करतात.
- सर्व अक्षरे योग्य आणि प्रमाणानुसार लिहीतात.
इयत्ता तिसरी- गणित
- तीन अंकी संख्या वाचतात व लिहतात. (999 पर्यंत)
- तीन अंकी संख्येची हातच्या व बिनहातच्या संख्यांची बेरीज व वजाबाकी करतात.
- सेंटीमिटर व मिटर या एककाच्या साहाय्याने लांबी व अंतर मोजतात.
- दिनदर्शिकेतील विशिष्ट दिवस व तारीख ओळखतात.
- घड्याळ पाहुन अचुक वेळ सांगतात.
- दैनंदिन जीवनातील प्रसंग / घटनांमध्ये ग्रॅम, किलोग्रॅम, यांचा समावेश असणारी बेरीज व वजाबाकी करतात.
- चित्रांच्या साहाय्याने माहिती दर्शवितात व निष्कर्ष काढतात.
इयत्ता चौथी भाषा – मराठी
- गोष्ट ऐकूण त्यावर आपले मत व्यक्त करतात व प्रश्न विचारतात.
- स्वतःचे म्हणणे मांडतांना भाषेच्या विविध वैशिष्ट्यांचा बारकाईने वापर करतात.
- वर्तमानपत्रातील शिर्षक, बालसाहित्य संवेदनशिलतेने समजून घेऊन त्यावर चर्चा करतात.
- वाचण्यास उत्सुकता दर्शवितात. ग्रंथालयामधील पुस्तके वाचतात.
- एखाद्या विषयावर लिहतांना शब्दांचे बारकावे समजून घेतात व लिहतांना शब्दांचा योग्य वापर करतात.
- योग्य विरामचिन्हांचा वापर करतात.
- दिलेला उतारा समजपूर्वक वाचन करतात.
- श्रृतलेखन करतात.
इयत्ता चौथी – इंग्रजी
- दिलेल्या सुचना बारकाईने ऐकतात व त्याची नोंद घेतात.
- संदर्भावरुन शब्द, वाक्प्रचार आणि वाक्यांचा अर्थ लावतात.
- अभिव्यक्तीसह कविता, गाणी पाठ करतात.
- इंग्रजीमध्ये देण्यात आलेल्या सोप्या सुचना ऐकतात, प्रतिसाद देतात.
- कथा, कथन लक्षपूर्वक ऐकतात व प्रतिसाद देतात.
- शब्दांचा अर्थ लावतात, साधी शब्द कोडे सोडवतात.
- शब्दांचा अर्थ लावण्यासाठी डिक्शनरीचा वापर करतात.
- सोपे शब्द, वाक्य ऐकतात आणि लिहीतात.
- भिंतीवरील इंग्रजी वाक्ये, शब्द वाचतात.
- संभाषणात भाग घेतात. परिचित विषयावर थोडक्यात बोलतात.
- नकाशा वाचन करतात.
- सोप्या आणि लहान वाक्यांचा वापर करुन गोष्टी, चित्रे घटना इ. चे इंग्रजीत वर्णन करतात.
इयत्ता चौथी- गणित
- 2 व 3 अंकी संख्यांचा गुणाकार करतात.
- अपूर्णांकाचा वापर करतात. वर्तुळाचे केंद्र, त्रिज्या, व्यास ओळखतात.
- भौमितिक आकारांचे परिमिती व क्षेत्रफळ काढतात.
- मीटरचे सेंटीमिटर मध्ये व सेंटीमिटरचे मिटर मध्ये रुपांतर करतात.
- घडयाळ पाहुन वेळ सांगतात.
- लांबी, अंतर, वजन, आकारमान यासंबंधी दैनंदिन जीवनातील मुलभूत गणिती क्रियांचा अंतर्भाव असणारे प्रश्न सोडवतात.
- बेरीज वजाबाकी करुन कालावधीचे गणन करतात.
इयत्ता पाचवी भाषा – मराठी
- ऐकलेल्या वाचलेल्या साहित्याविषयी तर्क काढतात, त्यावर चर्चा करतात, प्रश्न विचारतात.
- परिसरात घडणाऱ्या घटना, प्रसंग, इ.चे सुक्ष्म निरीक्षण करतात. त्यावर प्रश्न विचारतात, प्रतिक्रिया देतात.
- माहिती मिळविण्यासाठी वाचन करतात.
- अपरिचित शब्दांचे अर्थ शब्दकोशातुन शोधतात.
- भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक ओळखतात.
- परिसरात घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करुन त्यावर लेखन करतात.
- दिलेला उतारा समजपूर्वक वाचन करतात.
- श्रुतलेखन करतात.
इयत्ता पाचवी – इंग्रजी
- दैनंदिन जीवनातील अनुभव, परिचित कथा यावर आधारित अनुभव इंग्रजीमध्ये लेखी किंवा तोडी स्वरुपात सांगतात.
- योग्य लयीनुसार कविता, गाणी वाचतात.
- प्रश्न, विनंती, खेळ इ. मध्ये केलेल्या चर्चा इंग्रजीमध्ये समजून घेतात.
- वर्तमानपत्रातील बातम्या वाचतात.
- पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेले विविध समानार्थी, विरुद्धार्थी शब्दांचा वापर करतात.
- शब्दे, वाक्प्रचार, वाक्ये लिहीतात.
- योग्य उच्चारांसह व लयींमध्ये गाणी/कविता म्हणतात.
- उतारा, कविता, गाण्यांचे वाचन करतात.
- विविध प्रकारची अनौपचारीक पत्रे लिहीतात.
इयत्ता पाचवी- गणित
- 1000 पेक्षा जास्त किमतीच्या संख्या वाचतात व लिहीतात.
- मुळ संख्या आणि सहमुळ संख्यांचे वर्गीकरण ओळखतात.
- दिलेल्या अपुर्णांकाचा अर्थ जाणून घेतात.
- व्यवहारी अपुर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रुपांतर करतात आणि दशांश अपूर्णांकाचे रुपांतर व्यवहारी अपूर्णांकात करतात.
- अपूर्णांकाचा अर्थ जाणून घेतात.
- काटकोन, विशालकोन, लघुकोन यांचे वर्गीकरण करुन कोन काढतात व त्यांचे रेखाटन करतात.
- आयताकृती वस्तुची परिमिती व क्षेत्रफळ काढतात.
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार मोठ्या संख्यांवरील क्रिया करतात.
इयत्ता सहावी भाषा – मराठी
- अनुभव स्वतः च्या शब्दात सांगतात.
- पाहिलेल्या, ऐकलेल्या घटनांवर मत व्यक्त करतात.
- प्रसारमाध्यमांद्वारे ऐकलेल्या, पाहीलेल्या घटना स्वतः च्या शब्दात मांडतात.
- पाठ्यपुस्तकाचे सुक्ष्म वाचन करुन त्यातील वैशिष्ट्ये शोधतात, अनुमान व निष्कर्ष काढतात.
- मराठी भाषेतील विविध साहित्यप्रकार, बातम्या, वृत्तपत्रे, मासीके इंटरनेटवर प्रसिद्ध होणारे साहित्य समजपूर्वक वाचून स्वतःची आवड निवड सांगतात, मते देतात, सुचना करतात.
- आरोह अवरोहासह मराठी वाचन करतात.
- स्वतःचा शब्दकोश तयार करण्याचा प्रयत्न करतात.
- वर्तमानपत्रे, साहित्ये, मासीके इ.चे समजपूर्वक वाचन करतात.
- परिच्छेदाचे अचुक अनुलेखन व श्रृतलेखन करतात.
- दिलेला उतारा समजपूर्वक वाचन करतात.
इयत्ता सहावी भाषा – इंग्रजी
- सोपी गाणी, कविता कथा समजून घेतात.
- बातम्या, मुलाखती, इंग्रजी कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकतात.
- आजुबाजुला बोलले जाणारे इंग्रजी शब्द समजतात.
- माहिती जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतात.
- विरामचिन्हांचा वापर करुन मोठ्याने वाचतात.
- प्रात्यक्षिके, कथा, नाटके, वक्तृत्व यामध्ये भाग घेतात.
- सर्जनशील लेखनाचा प्रयत्न करतात.
- उताऱ्याचा मुख्य उद्देश सादर करतात.
- व्यवस्थित आणि सुवाच्चपणे लिहतात.
- भाषेत व्याकरणाचा वापर करतात.
इयत्ता सहावी- गणित
- लसावि, मसाविचे उपयोजन करतात.
- पूर्णांकाच्या बेरीज व वजाबाकीची उदाहरणे सोडवतात.
- गुणोत्तराचा वापर करतात.
- कोन ओळखुन त्याचे वर्गीकरण करतात.
- अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार करतात.
- दैनदिन व्यवहारातील शेकडा नफा व शेकडा तोटा काढतात.
- गोल, घन, इष्टिाकाचिती, शंकू यासारख्या त्रिमितीय वस्तु ओळखतात.
- बँकेचे व्यवहार ओळखतात व सरळव्याज काढतात.
- चौकोनाच्या बाजु व कोन ओळखतात.
- विभाज्यतेच्या कसोट्या सांगतात.
इयत्ता सातवी भाषा – मराठी
- कोणतेही चित्र, घटना, प्रसंग पाहून त्याचे स्वतःच्या पद्धतीने तोंडी किंवा लेखी स्वरुपत वर्णन करतात.
- वाचलेल्या सहित्यावर आकलन होण्यासाठी प्रश्न विचारतात चर्चा करतात.
- वेगवेगळ्या स्थानिक, सामाजिक, आणि भौगोलिक घटनांविषयी तर्कशुद्ध प्रतिक्रिया देतात.
- विविध संवेदनशील मुद्द्यांविषयी स्वतःचे तार्किक विचार तोंडी, लेखी स्वरुपात व्यक्त करतात.
- मराठी भाषेतील साहित्य समजपूर्वक वाचतात.
- शब्दसमूह, व्याकरण, वाक्प्रचार, म्हणी इ. चा वापर करतात.
- दिलेल्या वेळेत समजपूर्वक मुकवाचन करतात.
- लेखन नियमानुसार योग्य गतीने वाचन करतात.
- दिलेला उतारा समजपूर्वक वाचन करतात.
- श्रृतलेखन करतात.
इयत्ता सातवी भाषा – इंग्रजी
- लक्षपूर्वक ऐकतात.
- सुचना, विनंत्या यांना प्रतिसाद देतात.
- एखादे भाषण, कथा, संवाद ऐकल्यानंतर त्यामधील तपशील, मुद्दे आठवून सांगतात.
- कथाकथन, नाटक, भाषण इ. मध्ये भाग घेतात.
- कुटुंबात इंग्रजी बोलतात.
- बोलतांना देहबोली, हावभाव आणि चेहऱ्यावरील संवेदना जाणवतात.
- प्रश्न सुचनांना विनम्रपणे उत्तरे देतात.
- एखाद्या घटनेचा तपशीलवार अहवाल लेखन करण्याचा प्रयत्न करतात.
- मोठ्याने अर्थपूर्ण, विरामचिन्हांचा वापर करुन वाचन करतात.
- फलकावरील इंग्रजी सुचना वाचून समजून घेतात.
- ऐकतांना वैयक्तिक संदर्भासाठी नोट्स काढतात.
- संगणकावरील पासवर्ड, ई-मेल, संगणक शिष्टाचार समजून घेतात.
इयत्ता सातवी भाषा – गणित
- दोन पूर्णांकाचा गुणाकार / भागाकार करतात.
- अपूर्णांकाच्या गुणाकार व भागाकाराचे अर्थनिर्वचन करतात.
- बैजिक राशींची बेरीज, वजाबाकी करतात.
- त्रिकोनाचे दोन कोन दिले असता तिसऱ्या कोनाचे माप काढतात.
- चौरसाकार व आयताकार आकाराचे क्षेत्रफळ काढतात.
- स्तंभालेखावरुन माहितीचे अर्थनिर्वचन करतात.
- संख्येचे वर्गमूळ काढतात.
- दिलेल्या माहितीवरुन स्तंभालेख काढतात.
- द्विपदीचे अवयव पाडतात.
इयत्ता आठवी भाषा – मराठी
- विविध प्रकारचे साहित्य वाचून त्यावर चर्चा करतात.
- मराठी भाषेतील विविध प्रकारचे साहित्य / मजकूर वर्तमान पत्रे समजपूर्वक वाचतात.
- वाचलेल्या साहित्यावर विचार करतात आणि अधिक समजून घेण्यासाठी प्रश्न विचारतात.
- एखादे साहित्य वाचून त्यातील सामाजिक मूल्यांविषयी चर्चा करतात. त्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
- वाचलेल्या परिच्छेदाचे विश्लेषण करतात.
- वाचलेल्या साहित्यातील नवीन म्हणी वाक्प्रचार, सुभाषिते इ. चा अर्थ समजून घेतात व उपयोग करतात.
- वाचन व लेखनाचा उद्देश विचारात घेऊन आपले विचार प्रभावीपणे मांडतात.
- दैनंदिन जीवनातील घटनांवर आधारित सर्जनात्मक लेखन करतात.
- लेखनात व्याकरणाचा उपयोग करतात.
- दिलेला उतारा समजपूर्वक वाचन करतात.
- श्रुतलेखन करतात.
इयत्ता आठवी भाषा- इंग्रजी
- इंग्रजीतील विविध कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकतात.
- शाळा, कॉलेज, बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, मार्केट, सिनेमाहॉल इ. ठिकाणी लिहलेल्या सुचना, घोषणा वाचतात व त्यस प्रतिसाद देतात.
- इंग्रजीतून मत व्यक्त करतात.
- शाळा अथवा इतर संस्थाद्वारा आयोजित नाटक, वादविवाद स्पर्धा, भाषणे, वक्तृत्व स्पर्धा यांमध्ये भाग घेतात.
- योग्य शब्द संग्रह वापरुन विविध व्यवसायातील व्यक्तींसोबत इंग्रजीमध्ये बोलतात.
- उतारे वाचून त्याविषयी स्वतःचे मत व्यक्त करतात.
- विविध फॉर्म योग्यरित्या भरतात.
- नवीन शब्द, अभिव्यक्ती शिकतात.
- सर्वेक्षणासाठी इंग्रजी प्रश्नावली तयार करतात.
- इंटरनेटवर उपलब्ध डिजीटल शब्दकोश वापरतात.
इयत्ता आठवी- गणित
- विविध पद्धतीने वर्ग, घन, वर्गमूळ व घनमूळ काढतात.
- बैजिक राशींचा गुणाकार करतात.
- शेकडेवारीच्या संकल्पनांचा वापर करतात.
- कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने विविध चौकोनाच्या रचना करतात.
- चौकोनाचे क्षेत्रफळ काढतात.
- स्तंभालेखाचे वाचन करतात व अर्थनिर्वचन करतात.
- कसोट्यांचा वापर करुन त्रिकोनाची एकरुपता स्पष्ट करतात.
- आलेख कागद किंवा चौकटीचा कागद वापरुन बंदिस्त आकृतीचे अंदाजे क्षेत्रफळ काढतात.
PDF Download करण्यासाठी खाली क्लिक करा.
परीपत्रक पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.