1000 सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी 2024 : आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे. तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.
Table of Contents
आपण सशक्त आणि समृद्ध भारताचे स्वप्न पाहत आहोत. मात्र यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक ज्ञान आत्मसात केले पाहिजे. प्रत्येकजण काहीतरी मोठे बनण्याचे स्वप्न पाहतो. पण ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे GK Questions and Answers in Marathi तुमच्यासाठी आणले आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही या ज्ञानाच्या पाण्याचा उपयोग तुमच्या भविष्यातील बाग फुलवण्यासाठी कराल.
1000 सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी २०२४ – प्रश्नावली
- महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ? ⇒ महाराष्ट्र एक्सप्रेस
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखरकारखाने असणारा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? ⇒ गोदावरी
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती ? ⇒ बल्लारपूर
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती) कोणती ? ⇒ रेगूर मृदा
- महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? ⇒ मुंबई उपनगर
- महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
- महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? ⇒ सावित्रीबाई फुले
- महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा ⇒ सिंधुदुर्ग
- महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ? ⇒ रत्नागिरी
- सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
- भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ मुंबई
- भारताची आर्थिक राजधानी कोणती ? ⇒ मुंबई
- सात बेटांचे शहर कोणते ? ⇒ मुंबई
- महाराष्ट्रातील साखरकारखान्यांचा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर
- महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता ? ⇒ कोल्हापूर
- महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता ? ⇒ कोल्हापूर
- महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
- अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ जळगाव
- महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ? ⇒ नागपूर
- महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ? ⇒ नांदेड
- मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात ⇒ नाशिक
- आपल्या देशाचे नाव काय आहे ? ⇒ भारत
- भारताची राजधानी कोणती ? ⇒ दिल्ली
- भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ? ⇒ तिरंगा
- भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ? ⇒ त्रिमुख सिंह
- भारताचे बोधवाक्य कोणते आहे ? ⇒ सत्यमेव जयते
- भारताचे राष्ट्रगीत कोणते ? ⇒ जन-गण-मन
- भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ? ⇒ कमळ
- भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? ⇒ मोर
- भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? ⇒ वाघ
- भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ? ⇒ वंदे मातरम
- भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ? ⇒ हिंदी
- भारताची राष्ट्रलिपी कोणती ? ⇒ देवनागरी
- भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ? ⇒ आंबा
- भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? ⇒ हॉकी
- भारताची राष्ट्रीय नदी कोणती ? ⇒ गंगा
- भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ? ⇒ वड
- भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? ⇒ डॉल्फिन
- भारतातील एकूण राज्ये किती आहेत ? ⇒ 29
- तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे ? ⇒अशोक चक्र
- अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे ? ⇒ 24
- भारताचा स्वातंत्र्यदिन केव्हा असतो ? ⇒ 15 ऑगस्ट
- भारताचा प्रजासत्ताकदिन कधी असतो ? ⇒ 26 जानेवारी
- महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ? ⇒ हरावत (हरियाल)
- महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ? ⇒ शेकरू
- महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल काणत ? ⇒ तामन (मोठा बोंडारा)
- महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ? ⇒ आंबा
- महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ? ⇒ मराठी
- महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ? ⇒ मुंबई
- महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ? ⇒ नागपूर
- महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ? ⇒ 36
- वर्षातील एकूण दिवस किती असतात ? ⇒ 365
- वर्षाचे एकूण आठवडे किती ? ⇒ 52
- पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे ? ⇒71%
- पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे ? ⇒29%
- पृथ्वीचा उपग्रह कोणता ? ⇒चंद्र
- तिळगूळ कोणत्या सणाला वाटतात ? ⇒मकरसंक्रांत
- मकरसंक्रांतीचा सण केव्हा असतो ? 14 किंवा 15 जानेवारी
- हिंदूंचे नव वर्ष केव्हा सुरू होते ?⇒ गुडीपाडवा
- नाताळचा सण केव्हा असतो ?⇒ 25 डिसेम्बर
- कोणत्या सणाला नागाची पूजा करतात ? ⇒ नागपंचमी
- नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता ?⇒ रक्षाबंधन
- सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले ? ⇒ लोकमान्य टिळक
- दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे ? ⇒ विजयादशमी
- शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता ?⇒ बैलपोळा
- दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा करतात? ⇒लक्ष्मी
- दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात? ⇒ आपटा
- श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता ? ⇒रामनवमी
- श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता ? ⇒ गोकुळाष्टमी
- ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय ? ⇒ प्राणवायू
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा कोण? ⇒ सचिन तेंडूलकर
- भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात ? ⇒ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
- सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ? ⇒ शुक्र
- स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता ? ⇒ शनी
- सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ? ⇒गुरु
- दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता ? ⇒ शुक्र
- चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता ? ⇒ पौर्णिमा
- चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता ? ⇒ अमावस्या
- मोरगावच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ मोरेश्वर
- ओझरच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ विघ्नेश्वर
- थेऊरच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ चिंतामणी
- लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ गिरिजात्मक
- रांजणगावच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ महागणपती
- पालीच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ बल्लाळेश्वर
- महडच्या (मढच्या) गणपतीचे नाव काय ? ⇒ विनायक
- सिध्दटेकच्या गणपतीचे नाव काय ? ⇒ सिध्दीविनायक
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? ⇒ यशवंतराव चव्हाण
- महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ? ⇒ श्रीप्रकाश
- महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ? ⇒ मुंबई
- महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? ⇒ मुंबई
- महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? ⇒ मुंबई
- महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ? ⇒ गंगापूर
- महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? ⇒ कर्नाळा
- महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? ⇒ खोपोली
- महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ? ⇒ तारापूर
- महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते ? ⇒ मुंबई
- महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते ? ⇒ राहुरी
- महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ? ⇒ प्रवरानगर
- महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी कोणती? ⇒ इचलकरंजी
- महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह-पोलाद प्रकल्प कोणता ? ⇒ चंद्रपूर
- मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? ⇒ दर्पण
- मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ? ⇒ दिग्दर्शन
- मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ? ⇒ ज्ञानप्रकाश
- महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली ? ⇒ पुणे
- महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती ? ⇒ सातारा
- महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती ? ⇒ मुंबई
- महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ? ⇒ ताज हॉटेल, मुंबई
- एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता ? ⇒ सुरेंद्र चव्हाण
- भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ? ⇒ महर्षी धोंडो केशव कर्वे
- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ? ⇒ वि.स.खांडेकर
- पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ? ⇒ वर्धा
- महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण ? ⇒ सुरेखा भोसले
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती ? ⇒ मुंबई
- महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ? ⇒ सिंधूदुर्ग
- राष्ट्रपतीपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ? ⇒ श्यामची आई
- महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला ? ⇒ वडूज
- महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते ? ⇒ षण्मुखानंद सभागृह, मूंबई
- महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर
- महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ? ⇒ मुंबई शहर
- महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ? ⇒ कळसूबाई शिखर
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसख्या असणारा जिल्हा कोणता ? ⇒ ठाणे
- महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता ? ⇒ सिंधुदुर्ग
- महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता ? ⇒ रत्नागिरी
- महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता ? ⇒ चंद्रपूर
- महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ? ⇒ आंबोली
- महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता ? ⇒ सोलापूर
- महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती ? ⇒ शताब्दी एक्सप्रेस
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर
- शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते ? ⇒ शिवनेरी
- निजामशाहीची राजधानी कोणती ? ⇒ अहमदनगर
- आदिलशाहीची राजधानी कोणती ? ⇒ विजापूर
- शिवरायांचे समाधीस्थळ कोणते ? ⇒ रायगड
- तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते ? ⇒ देहू
- जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते ? ⇒ सिंदखेड राजा
- हिमरुशालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते? ⇒ औरंगाबाद
- रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ? सावंतवाडी
- महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता ? ⇒ मराठवाडा
- महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते ? ⇒ कोल्हापूर
- जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय ? ⇒ नाथसागर
- कोयना धरणाचे दुसरे नाव काय ? ⇒ शिवाजीसागर
- प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे ? ⇒ कोल्हापूर
- तुळजाभवानी मंदिर कोठे आहे ? ⇒ तुळजापूर
- साई बाबा मंदिर कोठे आहे ? ⇒ शिर्डी
- गजानन महाराज मंदिर कोठे आहे ? ⇒ शेगाव
- श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे ? ⇒ अक्कलकोट
- विठ्ठल मंदिर कोठे आहे ? ⇒ पंढरपूर
- खंडोबा मंदिर कोठे आहे ? ⇒ जेजुरी
- चांदबिबीचा महाल कोठे आहे ? ⇒ अहमदनगर
- पेशव्यांची राजधानी कोणती ? ⇒ पुणे
- इंद्राच्या नगरीचे नाव काय ? ⇒ अमरावती
- बिबी का मकबरा कोठे आहे ? ⇒ औरंगाबाद
- ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते ? ⇒ आपेगाव
अ.क्र. | प्रश्नांचा तपशील | उत्तर |
154 | महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ? | नाशिक |
155 | महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता ? | नंदुरबार |
156 | महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ? | पुणे |
157 | ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ? | बीड |
158 | जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता ? | बीड |
159 | महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता ? | रत्नागिरी |
160 | महाराष्ट्रातील तांदळांचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ? | रायगड |
161 | महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता ? | रायगड |
162 | महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ? | सोलापूर |
163 | महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणता ? | सातारा |
164 | मराठवाड्याची राजधानी कोणती ? | औरंगाबाद |
165 | गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते ? | त्र्यंबकेश्वर |
166 | भीमा नदीचे उगमस्थान कोणते ? | भीमाशंकर |
167 | कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते ? | महाबळेश्वर |
168 | ताडोबा अभयारण्य कोठे आहे ? | चंद्रपूर |
169 | कळसूबाई अभयारण्य कोठे आहे ? | अहमदनगर |
170 | महानुभाव पंथाचे केंद्र कोणते ? | नांदेड |
171 | कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे ? | अंबाजोगाई |
172 | वेदांची एकूण संख्या किती आहे ? | 4 |
173 | पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत. ? | सात |
174 | यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कोणते ? | प्रितीसंगम- कराड |
175 | शिवरायांचा राज्यभिषेक कोठे झाला ? | रायगड |
176 | ज्ञानेश्वर महाराजाची समाधी कोठे आहे ? | आळंदी |
177 | संतांची भूमी असे कोणत्या नदीस म्हणतात? | गोदावरी |
178 | महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? | कोयना |
179 | महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ? | नाशिक |
180 | चित्रनगरी हे मराठी चित्रपटनिर्मिती केंद्र कोठे आहे? | कोल्हापूर |
181 | अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे ? | वेरूळ |
182 | महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे ? | वर्धा |
183 | महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते ? | सोने |
184 | मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ? | विवेकसिंधू |
185 | महाराष्ट्रातील खाऱ्यापाण्याचे सरोवर कोणते ? | लोणार सरोवर |
186 | महाराष्ट्रात पोस्टाची तिकीटे, नोटा कोठे छापतात? | नाशिक |
187 | रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय ? | कुलाबा |
188 | देहू व आळंदी ही गावे कोणत्या नदीकिनारी आहेत? | इंद्रायणी |
189 | कोल्हापूर शहर कोणत्या नदी काठावर आहे ? | पंचगंगा |
190 | रंकाळा तलाव कोठे आहे ? | कोल्हापूर |
191 | नागपूर शहर कोणत्या नदी काठावर आहे ? | नाग |
192 | कृष्णा- वेण्णा या नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोणते? | माहुली |
193 | महाराष्ट्रात पोलीस अॅकेडमी कोठे आहे ? | नाशिक |
194 | महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? | ताडोबा |
195 | गोदावरी नदी किती जिल्हातून वाहत जाते ? | 8 |
196 | महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? | पोलीस महासंचालक |
197 | महाराष्ट्रातील वाघासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? | मेळघाट |
198 | महाराष्ट्रात सर्वाधिक विहीरी असलेला जिल्हा कोणता? | अहमदनगर |
199 | रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा | सोलापूर |
200 | मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ? | बाळशास्त्री जांभेकर |
201 | महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा कोणता ? | सातारा |
202 | ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत ? | वज्रेश्वर |
203 | महाराष्ट्रातील सिताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? | दौलताबाद |
204 | महाराष्ट्रातील अंजीरासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? | राजेवाडी |
205 | भारत देश कोणत्या गोलार्धात आहे.? | उत्तर गोलार्ध |
206 | वीजचोरीमुक्त गाव ही संकल्पना राबविणारे पहिले गाव कोणते ? | हिवरे बाजार |
207 | एकही साखर कारखाना नसलेला जिल्हा कोणता? | गडचिरोली |
208 | शहाजी राजे यांची समाधी कोठे आहे ? | होदिगेरे |
209 | हापूस आंब्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण ? | रत्नागिरी |
210 | कलिंगडासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ? | अलिबाग |
211 | चिकूसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ? | घोलवड |
212 | सुपारीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ? | श्रीवर्धन |
213 | बोरांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ? | मेहरूण |
214 | महाराष्ट्रात एकूण जिल्हापरिषदा किती ? | 34 |
215 | शिक्षणाचे माहेरघर कोणत्या शहरास म्हणतात ? | पुणे |
216 | मुस्लीम धर्मातील पवित्र सण कोणता ? | रमजान ईद |
217 | ख्रिश्चन धर्मातील पवित्र सण कोणता ? | नाताळ |
218 | जैन धर्माचे संस्थापक कोण ? | वर्धमान महावीर |
219 | ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण ? | येशू ख्रिस्त |
220 | शीख धर्माचे संस्थापक कोण ? | गुरू नानक |
221 | इस्लाम धर्माचे संस्थापक कोण ? | महंमद पैगंबर |
222 | एका डझनमध्ये किती वस्तू असतात ? | 12 |
223 | एक दस्ता म्हणजे किती जोडपाने ? | 24 |
224 | एक रीम म्हणजे किती दस्ते ? | 20 दस्ते |
225 | एक तोळा म्हणजे किती ग्रॅम ? | 10 ग्रॅम |
226 | एक क्विंटल ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ? | 100 किलोग्रॅम |
227 | एक टन म्हणजे किती किलोग्रॅम ? | 1000 किलोग्रॅम |
228 | द्रव मोजण्याचे परिमाण कोणते ? | लीटर |
229 | गणपती या देवाचे वाहन कोणते ? | उंदीर |
230 | सरस्वती या देवीचे वाहन कोणते ? | मोर |
231 | वि.वा. शिरवाडकर यांचे टोपणनाव काय ? | कुसुमाग्रज |
232 | कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव काय ? | केशवसूत |
233 | नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपणनाव काय ? | कवी बी |
234 | संत रामदास यांचे पूर्ण नाव काय ? | नारायण सूर्याजीपंत ठोसर |
235 | राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव काय ? | गोविंदाग्रज |
236 | त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय ? | बालकवी |
237 | प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपणनाव काय ? | केशवकुमार |
238 | भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते ? | केरळ |
239 | भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ? | हिमालय |
240 | दरवाजांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात.? | औरंगाबाद |
241 | पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? | मणिपुर |
242 | भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते? | अहमदाबाद |
243 | पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? | नागपूर |
244 | नायगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? | गोंदिया |
245 | गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? | मेळघाट |
246 | जगातील सर्वाधिक पवन ऊर्जा असणारा देश कोणता? | चीन |
247 | सर्वाधिक वेळा विश्वकप क्रिकेट विजेता देश कोणता? | ऑस्ट्रेलिया |
248 | भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? | प्रतिभाताई पाटील |
249 | आण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ? | किसन बाबूराव हजारे |
250 | आण्णा हजारे यांचे गाव कोणते ? | राळेगण सिद्धी |
251 | मानवी शरीरातील हाडांची संख्या किती ? | 206 |
252 | कुत्रा चावल्यास कोणता रोग होतो ? | रेबीज |
253 | हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ? | रामायण, महाभारत |
254 | ख्रिश्चन धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ? | बायबल |
255 | मुस्लीम धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ? | कुराण |
256 | शीख धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ? | गुरूग्रंथसाहेब |
257 | पारशी धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ? | झेंदावेस्ता |
258 | ज्यू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ? | तोराह |
259 | जैन धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ? | आगम |
260 | बौध्द धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ? | त्रिपिटक |
261 | हिंदू धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ? | मंदिर |
262 | ख्रिश्चन धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ? | चर्च |
263 | मुस्लीम धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ? | मशीद |
264 | शीख धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ? | गुरूद्वारा |
265 | पारशी धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ? | अग्यारी |
266 | ज्यू धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ? | सिनेगॉग |
267 | जैन धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ? | मंदिर |
268 | बौध्द धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ? | विहार |
269 | महाराष्ट या राज्याचे लोकनृत्य कोणते ? | लावणी, कोळीनृत्य |
270 | आंध्रप्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते ? | कुचीपुडी |
271 | ओरिसा या राज्याचे लोकनृत्य कोणते ? | ओडिसी |
272 | उत्तरप्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते ? | कथ्थक |
273 | पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते ? | भांगडा |
274 | राजस्थान या राज्याचे लोकनृत्य कोणते ? | घुमर |
275 | गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते ? | गरबा, दांडिया |
276 | तामिळनाडू या राज्याचे लोकनृत्य कोणते ? | भरतनाट्यम |
277 | केरळ या राज्याचे लोकनृत्य कोणते ? | कथकली, मोहिनीअट्टम |
278 | दररोज प्रकाशित (प्र्सिध्द ) होणारे ? | दैनिक |
279 | दर आठवड्याला प्रसिध्द होणारे ? | साप्ताहिक |
280 | दर वर्षाला प्रसिध्द होणारे ? | वार्षिक |
281 | दर तीन वर्षाला प्रसिध्द होणारे ? | त्रैवार्षिक |
282 | दर पाच वर्षाला प्रसिध्द होणारे ? | पंचवार्षिक |
283 | क्रिकेट या खेळातील खेळाडूंची संख्या किती ? | 11 |
284 | फुटबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती ? | 11 |
285 | हॉकी या खेळातील खेळाडूंची संख्या किती ? | 11 |
286 | खो-खो या खेळातील खेळाडूंची संख्या किती ? | 9 |
287 | व्हॉलीबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती ? | 6 |
288 | कबड्डी या खेळातील खेळाडूंची संख्या किती ? | 7 |
289 | सारे जहॉं से अच्छा या गीताचे लेखक कोण ? | महंमद इकबाल |
290 | जन-गण-मन या गीताचे लेखक कोण ? | रविंद्रनाथ टागोर |
291 | वंदे मातरम या गीताचे लेखक कोण ? | बंकिमचंद्र चटर्जी |
292 | आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण ? | रासबिहारी बोस |
293 | आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे झाली ? | सिंगापूर |
294 | आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले ? | सुभाषचंद्र बोस |
295 | इन्किलाब झिंदाबाद ही घोषणा कोणाची ? | महंमद इकबाल |
296 | पाच डझन मध्ये किती वस्तू असतात ? | 60 |
297 | किती इंच म्हणजे एक फूट ? | 12 |
298 | एक फूट म्हणजे किती सेमी ? | 30 से.मी. |
299 | 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर ? | 1000 मी. |
300 | 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ? | 100 सेंटीमीटर |
301 | दर 15 दिवसाला प्रसिध्द ? | पाक्षीक |
302 | दर महिन्याला प्रसिध्द होणारे ? | मासिक |
303 | दर तीन महिन्याला प्रसिध्द होणारे ? | त्रैमासिक |
304 | 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ? | 1000 ग्रॅम |
305 | द्रव पदार्थ मोजण्याचे परिमाण कोणते ? | लीटर |
306 | विद्युत बल्बमध्ये कोणता धातू असतो ? | टंगस्टन |
307 | विमानासाठी कोणते इंधन वापरतात ? | पेट्रोल |
308 | कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात ? | उंट |
309 | वाळवंटात दिसणाऱ्या हिरवळीस काय म्हणतात ? | ओअॅसिस |
310 | जगात सर्वाधिक उत्पन्न होणारे फळ कोणते ? | द्राक्षे |
311 | आगकाड्या कोणत्या झाडापासुन तयार करतात ? | सावर |
312 | गोपाळ हरी देशमुख यांचे टोपणनाव काय ? | लोकहितवादी |
313 | धोंडो केशव कर्वे यांचे टोपणनाव काय ? | महर्षी |
314 | बाळ गंगाधर टिळक यांचे टोपणनाव काय ? | लोकमान्य |
315 | ज्योतिबा फुले यांचे टोपणनाव काय ? | महात्मा |
316 | विनोबा भावे यांचे टोपणनाव काय ? | आचार्य |
317 | स्काऊट गाईडचे संस्थापक कोण ? | लॉर्डबेडन पॉवेल |
318 | स्काऊट गाईडचे घोषवाक्य कोणते ? | तयार रहा. |
319 | स्काऊट गाईडचे एकूण नियम किती ? | नऊ |
320 | स्काऊट गाईडच्या प्रार्थनेचे रचनाकार कोण ? | वीर देववीर |
321 | स्काऊट गाईडची प्रार्थना कोणती ? | दया कर दान भक्ती का |
322 | स्काऊट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात? | जांबोरी |
323 | स्काऊट गाईडचे ध्वजगीत कोणते? | झंडा उँचा सदा रहे । |
324 | ऑगस्ट क्रांतीदिन कधी असतो ? | 9 ऑगस्ट |
325 | आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी असतो ? | 8 सप्टेंबर |
326 | गांधींजी व शास्त्रीजी जयंती कधी असते ? | 2 ऑक्टोबर |
327 | महाराष्ट्र दिन कधी असतो ? | 1 मे |
328 | जागतिक कामगार दिन कधी असतो ? | 1 मे |
329 | भारतातातील पंचनद्यांचा प्रदेश कोणत्या राज्यास म्हणतात ? | पंजाब |
330 | भारतातातील राजवाड्यांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात ? | कोलकाता |
331 | भारतातील सुवर्णमंदिराचे शहर कोणत्या शहरास म्हणतात ? | अमृतसर |
332 | भारताचे उद्यान कोणत्या शहरास म्हणतात ? | बेंगलोर |
333 | भारताचे नंदनवन कोणत्या राज्यास म्हणतात ? | काश्मीर |
334 | भारतातील देवळांचे शहर कोणते ? | भुवनेश्वर |
335 | भारतातील गुलाबी शहर कोणते ? | जयपूर |
336 | भारतातील सायबरसिटी कोणत्या शहरास म्हणतात ? | हैद्राबाद |
337 | अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात? | कोची |
338 | भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? | उदयपूर |
339 | भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ? | डॉ. राजेंद्रप्रसाद |
340 | भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती कोण ? | डॉ. झाकीर हुसेन |
341 | भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण ? | ग्यानी झैलसिंग |
342 | पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती कोण ? | डॉ. झाकीर हुसेन |
343 | भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण ? | डॉ. मनमोहन सिंग |
344 | एवरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा भारतीय कोण ? | तेनसिंग नोर्के |
345 | भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण ? | वल्लभभाई पटेल |
350 | भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ? | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन |
351 | लोकसभेचे पहिले सभापती कोण ? | ग.वा. मावळंकर |
352 | भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण ? | व्योमेशचंद्र बॅनर्जी |
353 | इंग्लडला भेट देणारे पहिले भारतीय कोण ? | राजा राममोहन रॉय |
354 | आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण ? | डॉ. नागेंद्र सिंग |
355 | संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय कोण ? | अटलबिहारी वाजपेयी |
356 | भारताचे पहिले मुख्य निवडणुक आयुक्त कोण ? | सुकुमार सेन |
357 | आय.सी.एस. परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय. | सुरेंद्रनाथ बॅनर्जी |
358 | पहिले भारतीय आय.सी.एस. अधिकारी कोण ? | सत्येंद्रनाथ टागोर |
359 | इंग्लीश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण ? | मिहीर सेन |
360 | भारताचा पहिला अंतराळवीर कोण ? | राकेश शर्मा |
361 | प्राणवायू शिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा भारतीय कोण ? | फू दोरजी |
362 | नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण? | रविंद्रनाथ टागोर |
363 | भारतरत्न पुरस्कार मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ? | सचिन तेंडूलकर |
364 | भारताचा पहिला परमवीर चक्र विजेता कोण ? | मेजर सोमनाथ शर्मा |
365 | भारताचे आद्य क्रांतीकारक कोण ? | वासुदेव बळवंत फडके |
366 | भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? | पंडित नेहरू |
367 | भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? | भारतरत्न |
368 | भारतातील सर्वोच्च पद कोणते ? | राष्ट्रपती |
369 | भारताचा पहिला मोगल सम्राट कोण ? | बाबर |
370 | स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण ? | सी. राजगोपालचारी |
371 | रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण ? | विनोबा भावे |
372 | भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ? | ३२,८७,२६३ चौ.कि.मी. |
373 | भारतास किती कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ? | ७५१६ कि. मी. |
374 | महाराष्ट्रास किती कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ? | ७२० कि.मी. |
375 | पहिले भारतीय वैमानिक कोण ? | पुरूषोत्तम काबली |
380 | भारताचे पहिले क्रिकेट कसोटीपटू कोण ? | रणजित सिंग |
381 | भारताची पहिली महिला मुस्लीम राज्यकर्ती कोण ? | रझिया सुलताना |
382 | भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? | इंदिरा गांधी |
383 | भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ? | प्रतिभाताई पाटील |
384 | भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण? | मीराकुमार |
385 | भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण ? | कादम्बनी गांगुली |
386 | परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोंण ? | आनंदी बाई जोशी |
387 | भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष? | ऍनी बेझंट |
388 | भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण ? | सरोजिनी नायडू |
389 | पहिल्या भारतीय महिला राज्यपाल कोण? | सरोजिनी नायडू |
390 | भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ? | सुचेता कृपलानी |
391 | भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण ? | विजया लक्ष्मी पंडीत |
392 | भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर कोण ? | कार्नेलिया सोराबजी |
393 | सर्वोच्च नायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ? | मीरासाहेब फातेमा बीबी |
394 | भारताच्या पहिल्या महिला सभापती कोण ? | सुशिला नायर |
395 | युनोच्या आमसभेचे अध्यक्षपद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण? | विजयालक्ष्मी पंडीत |
396 | केंद्रिय कॅबिनेट मंत्रीपद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण? | राजकुमारी अमृतकौर |
397 | भारताच्या पहिल्या महिला महापौर कोण ? | अरूणा असफअली |
398 | योजना आयोगाची पहिल्या महिला अध्यक्ष कोण ? | इंदिरा गांधी |
399 | एम.ए.ची. पदवी मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण? | चंद्रमुखी बोस |
400 | भारताची पहिली महिला आय.ए.एस. अधिकारी कोण ? | अन्ना राजम जॉर्ज |
401) भारताची पहिली महिला आय.ए.एस. अधिकारी कोण ? >> अन्ना राजम जॉर्ज
402) भारताची पहिली महिला आय.पी.एस. अधिकारी कोण ?>> किरण बेदी
403) पहिली भारतीय महिला क्रांतीकारक कोण ? >> मॅडम भिकाईकामा
404) पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर कोण ? >> एस. विजयालक्ष्मी
405) ऑलिंपिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला ? >> कर्नाम मल्लेश्वरी
406) इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण? >> आरती साहा
407) एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> बच्छेंद्री पाल
408) एव्हरेस्ट शिखर सर करणारी दुसरी भारतीय महिला कोण ? >> संतोष यादव
409) दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतीय महिला कोण ? >> संतोष यादव
410) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ? >> प्रेमा माथुर
411) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ? >> कल्पना चावला
412) जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> उज्वला रॉय
413) नोबेल पारितोषिक मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण? >> मदर तेरेसा
414) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> सुष्मिता सेन
415) भारतरत्न पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण? >> इंदिरा गांधी
416) ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण? >> आशापूर्णा देवी
416) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण? >> देविका राणी
417) बुकर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> अरुंधती रॉय
418) राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> कॅ. लक्ष्मी सहगल
419) अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते ? >> 13%
420) अंटार्क्टिकावर जाणारी पहिली भारतीय महिला कोण ? >> मेहर मुस
421) भारतातील पहिली महिला व्यंगचित्रकार कोण ? >> मंजुळा पद्मनाथम
422) भारतातील पहिली महिला क्रिकेट कर्णधार कोण ? >> अंजुम चोप्रा
423) भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते ? >> द बेंगॉल गॅझेट
424) भारतातील पहिली टपाल कचेरी कोणती ? >> कोलकाता
425) भारतातील सर्वात पहिली रेल्वे कोणती ? >> मुंबई ते ठाणे
426) भारतातील सर्वात पहिला मूकपट कोणता ? >> राजा हरिश्चंद्र
427) भारतातील सर्वात पहिला बोलपट कोणता ? >> आलमआरा
428) भारतातील सर्वात पहिला मराठी बोलपट कोणता ? >> अयोध्येचा राजा
429) भारतातील सर्वात पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? >> दिल्ली
430) भारतातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? >> मुंबई
431) भारतातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते ? >> कोलकाता
432) भारताचा सर्वात पहिला उपग्रह कोणता ? >> आर्यभट्ट
433 ) भारताने पहिली अणुस्फोट चाचणी कोठे घेतली ? >> पोखरण
434) भारताचे सर्वात पहिले क्षेपणास्त्र कोणते ? >> पृथ्वी
435) भारतीय बनावटीची पहिली क्षेपनास्त्रवाहू बोट कोणती ? >> विभूती
436) भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी कोणती ? >> शाल्की
437) भारताचे लढाऊ विमान कोणते ? >> नॅट
438) भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता ? >> विजयंता
439) भारताची सर्वात पहिली अणुभट्टी कोणती ? >> अप्सरा
440) भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना कोणता ? >> कुल्टी
441) भारतातील पहिला तेलशुद्धीकरण कारखाना कोणता ? >> दिग्बोई
442) भारताची सर्वात पहिली कापड गिरणी कोणती ? >> मुंब
443) भारताची सर्वात पहिली ताग गिरणी कोणती ? >> कोलकाता
444) भारतातील सर्वात पहिला सिमेंट कारखाना कोणता ? >> चेन्नई
445) भारतातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? >> दार्जिलिंग
446) भारतातील सर्वात पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ? >> ताजमहल, मुंबई
447) भारतातील सर्वात पहिले संग्रहालय कोणते ? >> कोलकाता
448) भारतातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? >> प्रवरानगर
449) भारतातील सर्वात पहिली सहकारी सूत गिरणी कोणती? >> इचलकरंजी
वाचा :
- Marathi shuddh lekhan| मराठी शुद्धलेखन 12 नियम
- Marathi Suvichar I 1000+ मराठी सुविचार संग्रह
- Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा 50 | संस्कार कथा
updated soon …….visit again.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.