पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान: शिक्षण व्यवस्थेमध्ये प्राथमिक शिक्षणास महत्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया हा प्राथमिक स्तरावरच रचला जातो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्तानुरुप अपेक्षित शैक्षणिक क्षमता प्राप्त होणे हे अतिशय गरजेचे आहे.
Table of Contents
विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानुरुप वाचन क्षमता विकसित होणे, विद्यार्थ्यास इयतानुरुप गणितीय क्रिया करता येणे, अभिप्रेत आहे. यासाठी शासन स्तरावरुन पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान राबविण्यात येत आहे.
अपेक्षित क्षमता अप्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाने, मार्गदर्शनाने अपेक्षित क्षमता प्राप्ती करुन देणे गरजेचे आहे.
शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याने प्राप्त केलेल्या क्षमतांचा अभ्यास करुन प्रत्येक विद्यार्थ्यास अपेक्षित क्षमता प्राप्त होईपर्यंत मार्गदर्शन करणे, त्यास पुरक अशा अध्ययन अनुभूती देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्तानिहाय अध्ययन क्षमता निश्चित केल्या आहेत.
अभ्यासक्रम संशोधन मंडळाने निश्चित केलेल्या इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन क्षमता सर्व विद्यार्थ्यांनी अवगत करण्याच्या हेतूने छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इ.1 ली ते 8 वी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयातील अध्ययन स्तराची इयत्तानिहाय अध्ययनस्तरांप्रमाणे निश्चिती करावी व विहीत केलेल्या क्षमता प्राप्त व अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी करावी.
भाषा व गणित विषयातील अपेक्षित अध्ययन क्षमता :
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्तानिहाय निश्चित केलेल्या भाषा व गणित विषयांतील अध्ययनक्षमता, (सोबत जोडल्या आहेत)
अध्ययनक्षमता निश्चितीची कार्यपद्धती :-
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान शाळास्तर :-
विषय शिक्षकांनी ते अध्यापन करीत असलेल्या भाषा व गणित विषयासंबंधी विद्यार्थ्यांच्या अध्ययनक्षमता तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्तानिहाय निश्चित केलेल्या भाषा व गणित विषयांतील अध्ययनक्षमतांप्रमाणे प्रश्नसुची तयार करावी.
• तयार केलेल्या प्रश्नसुचीनुसार शिक्षकांनी इयत्तानुरुप भाषा व गणित विषयांच्या क्षमतांची तपासणी करावी व क्षमता प्राप्त व क्षमता अप्राप्त असलेल्या विट स्वतंत्र यादी दि. 25.01.2024 पावेतो तयार करुन वर्ग व विषयनिहाय संख्या निश्चित करावी.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील उपरोक्तप्रमाणे भाषा व गणित विषयात
प्राप्त व अप्राप्त विद्यार्थ्यांची वर्ग व विद्यार्थीनिहाय यादी त्यांचेस्तरावर ठेवावी.
अध्ययनक्षमता निश्चितीची पडताळणी :-
• केंद्रप्रमुख यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या शाळांना दि. 26.01.24 ते दि.08.02.24 दरम्यान भेटी देऊन शिक्षकांनी निश्चित केलेल्या अध्ययनस्तराची यादृच्छिक पद्धतीने पडताळणी करावी.
• केंद्रप्रमुख यांनी शाळेची पडताळणी करीत असतांना संबंधित शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांना सोबत घ्यावे.
शिक्षकांनी निश्चित केलेल्या यादीस केंद्रप्रमुख यांनी पडताळणी करुन अंतिम मान्यता द्यावी.
यादीस मान्यता देत असतांना क्षमता प्राप्त व अप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये अचुकता राहील याची खबरदारी घ्यावी.
• केंद्रप्रमुख यांनी सोबत जोडलेल्या विहीत प्रपत्रात अहवाल भरुन सदरचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दि. 09.02.2024 पावेतो जमा करावा. तसेच या अहवालाची प्रत केंद्रावर ठेवावी.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान तालुकास्तर :-
शिक्षणविस्तार अधिकारी यांनी आपल्या बीट अंतर्गत सर्व केंद्रांचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांचेकडे जमा झाल्याबाबत खात्री करावी.
गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त सर्व केंद्रांचा अहवाल एकत्रित करुन तालुक्यातील सर्व केंद्रांचा अहवाल शिक्षणाधिकारी प्रा. यांच्याकडे विहीत प्रपत्रात दि. 10.02.2024 पावेतो सादर करावा.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान जिल्हास्तर :-
शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अहवाल एकत्रित करुन
तालुकानिहाय एकत्रित अहवाल विहीत प्रपत्रात दि. 12.02.2024 पावेतो विभागीय आयुक्तालयास पाठवावा.
• शाळा, केंद्र, तालुका व जिल्हा स्तरासाठी एकच प्रपत्र असुन ज्यास्तरावर प्रपत्र जतन करावयाचे आहे. केवळ त्या स्तराचे नाव व स्वाक्षरी नमुद करुन प्रपत्र तयार करावे.
उपरोक्त प्रमाणे क्षमता प्राप्त विद्यार्थ्यांची यादी करत असतांना इयत्तानिहाय देण्यात आलेल्या भाषा व गणिताच्या अपेक्षित सर्व क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचींच नावे क्षमताप्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीत येतील. याप्रमाणे दक्षता घेण्यात यावी. तसेच अंतिम अहवाल (दि. 12.02.2024) पर्यंत या कार्यालयास पाठवावा.
असे सूचित करण्यात आले आहे.
सविस्तर GR वाचणे साठी व अधिक माहिती साठी PDF डाऊनलोड करा.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.