Abha card मराठी माहिती | Abha card Benefits, Registration and Download

Abha card :  Abha Card च्या मदतीने आपले जीवन आरामाने आणि सुरक्षित बनवण्यासाठी हा एक अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे. या लेखात, आपल्याला आभा कार्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया, त्याचे लाभ, आणि  ते कसे डाउनलोड करायचे हि सर्व माहिती दिली जाईल.

Table of Contents

ABHA म्हणजेच – Ayushman Bharat Health Account होय. हे एक 14 अंकी नंबर असणारे कार्ड आहे. ज्यामध्ये आपल्या संपूर्ण आरोग्याची माहिती Digital स्वरूपात जतन केली जाणार आहे. ज्याचा उपयोग आपल्या साठी तसेच डॉक्टरांना आपली माहिती समजण्यासाठी होणार आहे.

Abha card Marathi mahiti
Abha card Marathi mahiti

या कार्डचा प्राथमिक फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही हॉस्पिटलला जाता तेव्हा तुम्हाला प्रिस्क्रिप्शन, पेपरवर्क किंवा पूर्वीच्या डॉक्टरांच्या नोट्स सोबत आणण्याची गरज नाहीशी होते. डॉक्टरांना तुमचे पूर्वीचे वैद्यकीय रेकॉर्ड पाहण्याची परवानगी देण्यासाठी, फक्त तुमचा आभा क्रमांक निर्दिष्ट करा. त्यामुळे, तुमच्याकडे मागील चाचणी अहवाल नसला तरीही सर्व चाचण्या पुन्हा करण्याची गरज नाही. हे करण्यासाठी पैसा आणि वेळ वाचेल.

Abha Card Registration कसे कराल ?

आभा कार्ड Registration करणेसाठी आपल्याला  येथे क्लिक करावे लागेल.

Abha-card-Marathi-Mahiti

या वेबसाईट वर गेल्यानंतर आधार कार्ड किंवा लायसन्स च्या मदतीने रेजिस्ट्रेशन करावे लागेल.

Abha card Marathi Mahiti

आधार नंबर टाकल्यानंतर  एक OTP येईल तो प्रविष्ट  करा. आधार Authentication हि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आधार वरील सर्व माहिती जसे नांव, लिंग, पत्ता दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक विचारला जाईल तो टाका. आता  तुमचा आभा क्रमांक तयार झाल्याचे स्क्रीन वर दिसू लागेल.

त्यानंतर आपला पत्ता आधार प्रमाणे किंवा प्रविष्ट करावा लागेल. Abha Number Has been Link To Abha Address असा मेसे येईल.

Abha card benefits:

  • तुम्ही नवीन डॉक्टर  किंवा हॉस्पिटलला भेट देता तेव्हा तुमच्यासोबत औषधे आणि वैद्यकीय नोंदी आणण्याची गरज नाही.
  • तुमच्या आभा कार्डमध्ये तुमच्या सर्व चाचण्या आणि वैद्यकीय नोंदी असतील.
  • तुमचा रक्ताचा प्रकार काय आहे, तुम्हाला कोणता आजार आहे आणि तुम्ही कोणत्या डॉक्टरांना यापूर्वी भेटला आहात? ही सर्व माहिती तुम्ही ऑनलाइन मिळवू शकता.
  • जे लोक ऑनलाइन उपचार घेतात त्यांना सर्वात जास्त फायदा होतो, कारण ते फक्त त्यांचे आभा कार्ड सादर करून ऑनलाइन डॉक्टरांना सर्व आवश्यक माहिती देऊ शकतात.
  • विमा कंपन्या आणि आभा हेल्थ कार्ड जोडलेले आहेत. परिणामी तुम्हाला विमा दावा दाखल करणे सोपे जाईल.
  • तुम्हाला तुमचे रिपोर्ट्स, मेडिकल स्लिप इ. हरवण्याची काळजी करण्याची गरज नाही. ऑनलाइन नोंदणी पूर्ण करणे सोपे आहे.

Abha card Downlod

Abha Card डाउनलोड करणेसाठी  येथे क्लिक करा

  • त्यानंतर आपला आधार नंबर टाकून NEXT करा.
  • OTP  टाकल्यानंतर आपली ABHA कार्ड संबंधित माहिती प्रिंट साठी तयार असेल.
  • PDF generate  करा. PRINT किंवा share करा.

वरील माहिती आपणास कशी वाटली नक्की कंमेंट करा. व SHARE करा.

नक्की वाचा :

  1. 7 Amazing benefits Of Yoga
  2. Apaar Id Card मराठीं माहीती | One Nation One Card माहिती
  3. Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा 50 | संस्कार कथा
  4. Marathi Suvichar I 1000+ मराठी सुविचार संग्रह
  5. 500+Samanarthi Shabd Marathi | Advanced समानार्थी शब्द | समान अर्थाचे शब्द
  6. 100 Alankarik shabd | अलंकारिक शब्द मराठी व्याकरण | मराठी अलंकारिक शब्द
  7. Marathi shuddh lekhan| मराठी शुद्धलेखन 12 नियम

हे पहा.

Scroll to Top