Samanarthi Shabd या लेखा अंतर्गत आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत. काही समानार्थी शब्द किंवा समान अर्थाचे शब्द ज्याचा उपयोग विविध स्पर्धा परीक्षा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी होऊ शकतो याची आम्हास खात्री आहे.नवनवीन समानार्थी शब्द पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल. चला तर पाहूया समानार्थी शब्द.
Table of Contents
Samanarthi Shabd | समानार्थी शब्द | पर्यायवाचक शब्द
* अकृत्रिम- स्वाभाविक, नैसर्गिक, वास्तविक, सहज, खरे.
* अखंड- सलग, एकसंध, अभंग, संपूर्ण, अविच्छिन्न.
* अगत्य- कळकळ, आस्था, आपुलकी.
* अगाध- अथांग, खोल, अमर्याद, गहन, अगम्य.
* अंगारा- रक्षा, राख, उदी, भस्म, विभूती.
* अगोदर- आधी, पूर्वी, प्रथम, आरंभी, प्रारंभी, सुरुवातीला.
* अग्नी- आग, अनल, पावक, वन्ही, हुताशन, विस्तव, ज्वाला, जाळ, अंगार, वणवा, वडवानल, वैश्वानर
* अघटित- असंभाव्य, अशक्यप्राय, विलक्षण, अपूर्व, नवलपूर्ण, आश्चर्यकारक.
* अचरट- अविचारी, वाह्यात, व्रात्य, बावळट.
* अचाट- असामान्य, विलक्षण, चमत्कारिक, भलतेच, बेसुमार, अजब, कल्पनातीत.
* अचानक- एकदम, अकस्मात, एकाएकी, अनपेक्षितपणे, आकस्मिकरीत्या योगायोगाने, अवचित.
* अचूक- बिनचूक, नेमके, निर्दोष, यथायोग्य, बरोबर.
* अजस्र- अवाढव्य, महाकाय, अगडबंब, प्रचंड, धिप्पाड,
* अजिंक्य- अजेय, अपराजित, दुर्दम्य, दुर्भेद्य, दुर्दमनीय, अदम्य, दुर्लघ्य.
* अट- शर्त, हरकत, अटकाव, अडथळा, तहातील कलम.
* अटकाव- आडकाठी, प्रतिबंध, मनाई, हरकत, अडवणूक.
* अडचण- निकड, बाधा, पेच, पंचाईत, अडथळा, प्रतिबंध.
* अंत- शेवट, अखेर, समाप्ती, समारोप, सांगता, समापन, परिणती, पर्यवसान, तड, उपसंहार, तिश्री, मृत्यू, नाश, विनाश.
* मर्यादा- सीमा, कड.
हे वाचा ☞☞ मराठी बोधकथा
* अतिरेक- बेसुमारी, अमर्यादपणा, पराकाष्ठा, कडेलोट, कळस, आधिक्य.
* अतिरेकी- अत्याचार, दहशतवादी, आतंकवादी, विद्रोही, आतताई, नक्षलवादी, पिसाट.
* अनवधान- दुर्लक्ष, बेपर्वाई, बेफिकिरी, बेसावधपणा, हयगय.
* अनाथ- पोरका, निराधार, निराश्रित, असहाय, पालकहीन.
* अत्याचार- जुलूम, जबरदस्ती, अन्याय, बलात्कार, गळचेपी, मुस्कटदाबी, जबरी, सक्ती.
* अत्यंत- बहुत, अतिशय, पुष्कळ, अतीव, असंख्य, अमित, अपरिमित, अगणित, अपार, असीम.
* अंथरूण- बिछाना, शय्या, शेज, बिस्तर, वळकटी, बिछायत.
* अंदाज- तर्क, अदमास, अनुमान, अटकळ, कयारा, होरा, ठोकताळा, सुमार.
* अधांतरी- निराधार, विनाआधार, निरालंब, त्रिशंकू स्थितीत, काळोख, अंधकार, तम, तिमिर.
* अंधार- अधाशी हावरट, हपापलेला, हव्यासी, खादाड, बुभुक्षित,
* अधिकार- प्रभुत्व, सत्ता, अंमल, ताबा, हुकुमत, स्वामित्व, आधिपत्य हक्क, प्रभुता, नियंत्रण, प्रभुसत्ता,
* अधोगती- अवनती, अधःपात, अपकर्ष, अधःपतन, पतन, दुर्गती, घसरगुंडी.
* अध्यात्म- आत्मज्ञान, वेदान्त, ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान, अद्वैत.
* अनावर- अनिर्बंध, मोकाट, निरंकुश, अनियंत्रित, बेछूट, बेलगाम, उच्छृंखल, बेभान, कड्याबाहेर.
* अनुकूल- हितकारक, उपकारक.
* अनुचित- अयोग्य, असंगत, अयुक्त, वावगे.
* अनुभव- प्रत्यय, प्रचीती, प्रत्यंतर, साक्षात्कार, प्रतीती, अनुभूती, आस्वाद.
* अनुमोदन- संमती, सहमती, समर्थन, दुजोरा, स्वीकृती, होकार, पाठिंबा, मान्यता, पुष्टीकरण, समर्थन.
* अनुरूप- यथायोग्य, यथोचित, सुसंगत, अनुसार, साजेसे, जुळणारे, शोभणार.
* अपमान- अवमान, अवहेलना, अप्रतिष्ठा, मानहानी, मानभंग, मानखंडना, तेजोभंग, उपमर्द, उपहास, अनादर,अवज्ञा, पाणउतारा.
* अपरिमित- अगणित, अमर्याद, असीम, अमाप, बेहद.
* अपुरे- अपूर्ण, तोकडे, अपर्याप्त, त्रोटक, थोडे थोडके.
* अर्धचंद्र- उचलबांगडी, हकालपट्टी, बडतर्फी, उच्चाटन.
* अप्रतिम- अद्वितीय, अनुपम, अतुलनीय, अतुल्य, अजोड, असामान्य, अलौकिक, उत्कृष्ट.
* अफवा- वंदता, खोटी वार्ता, वावडी, गप्प, आवई, कंडी, कीवदंती, भूमका.
* अभिजात- जातिवंत, कुलीन, सुसंस्कृत, विशुद्ध, अस्सल.
* अभिनय- नक्कल, बतावणी, हावभाव, अंगविक्षेप, सोंग.
* अभिनव- नवीन, नूतन, नवे, आधुनिक, अपूर्व.
* अभ्युदय- प्रगती, उत्कर्ष, भरभराट, उन्नती, उत्थान.
हे वाचा ☞☞ मराठी सुविचार संग्रह
* अमित- असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.
* अमोघ- रामबाण, अचूक, प्रभावी.
* अमृत- सुधा, पीयूष.
* अर्ज- अर्थ विनंती, प्रार्थना, याचना, आवेदनपत्र, नम्र निवेदन.
* अर्थ- आशय, अभिप्राय, मतलब, तात्पर्य, हेतू, दम, कस, जोर, राम.
* धन- द्रव्य, संपत्ती, वित्त, पैसा.
* अरण्य- वन, रान, कानन, जंगल, विपिन.
* अलिप्त- अलग, वेगळे, निराळे, असंलग्न, उदासीन, तटस्थ.
* अवकळा- अवदशा, दुर्दशा, स्याहीनता.
* अवडंबर- डामडौल, स्तोम, प्रस्थ, थाटमाट, भपका, आडंबर.
* अशक्त- दुर्बल, दुबळा, कमजोर, कमकुवत, सामर्थ्यहीन.
* अशक्य- असंभाव्य, असंभवनीय, असाध्य.
* अश्लील- शक्तिहीन, बलहीन,
* अस्वस्थ- ग्राम्य, असभ्य, अशिष्ट, असंस्कृत, बेचैन,
* अस्थिर- अशांत, व्याकूळ, हवालदिल.
* अक्षर- अविनाशी, अविकारी, अक्षय, शाश्वत.
* आई- माता, जननी, माय, जन्मदा, जन्मदात्री, अम्मा, माऊली, मातोश्री.
* आकर्षण- भुलावा, मोहिनी, ओढ, ओढा, वेध, मोह.
* आकर्षक- मोहक, वैधक, मनमोहक, चित्तवेधक, दिलखेचक.
* आकस- अढी, द्वेष, मत्सर, वैर, खुन्नस.
हे वाचा ☞☞ विरुद्धार्थी शब्द Opposite Words
* आकार- आकृती, रूप, स्वरूप, रूपरेषा, घडण, बनावट.
* आकाश- गगन, नभ, व्योम, अंबर, आसमान, अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश, अस्मान, ख, खगोल, तारांगण.
* आग- अग्नी, विस्तव, अंगार, निखारा, ज्वाळा, आगडोंब, वणवा, वडवानल, धग, उष्णता.
* आगळीक- कुरापत, कळ, खोडी, कागाळी.
* आग्रह- हट्ट, हेका, अनुरोध, मिनतवारी, अनुनय.
* आघात- तडाखा, मार, फटका, प्रहार, धक्का, टोला.
* आचरण- वागणूक, वर्तणूक, वर्तन, आचार, चालचलणूक.
* आजार- रोग, व्याधी, व्यथा, अस्वास्थ्य, दुखणे, अनारोग्य.
* आठवण- स्मरण, सय, स्मृती.
* आतुर- आर्त, व्यथित, पीडित, पीडाग्रस्त, विव्हळ, उतावळा, उतावीळ, उत्सुक, उद्यत.
* आत्महत्या- आत्मघात, बलिदान, आत्मार्पण, आत्मसमर्पण, बलिदान, स्वहत्या, समाधी, जलसमाधी.
* आदर- पूज्यबुद्धी, पूज्यभाव, मान, मोठेपणा, श्रद्धा, सद्भाव, भक्तिभाव.
* आदि- आधीचा, आरंभीचा, प्रारंभीचा, प्रथम, पहिला, मूळचा, आद्य, आदिम.
* आदेश- हुकूम, आज्ञा, फतवा, फर्मान, ताकीद, उपदेश.
* आधार- आसरा, आश्रय, पाठिंबा, साहाय्य, मदत. टेकू, नेट, पाया.
* आधुनिक- अर्वाचीन, नवीन, नूतन, अभिनव, सध्याचा, हल्लीचा, नवा.
* आनंद- हर्ष, संतोष, तोष, प्रसन्नता, मोद, प्रमोद, आल्हाद, उल्हास, खुशी.
* आपुलकी- आपलेपणा, जिव्हाळा, जवळीक, आस्था, ममत्व, ममता, आप्तभाव.
* आपोआप- आबाळ सहज, अनायासे, विनायास, विनासायास, लीलया.
* हेळसांड– हयगय, दुर्लक्ष.
* आमिष- लालूच, प्रलोभन, लाच, मोह, मधाचे बोट.
* आयुष्य- जीवन, आयु, हयात, जीवितकाल, वय, उमर.
* आरंभ- सुरुवात, प्रारंभ, श्रीगणेशा,मुहूर्तमेढ.
* आरसा- आदर्श, दर्पण, ऐना.
* उत्तम- उत्कृष्ट, छान, चांगला, अभिजात, अप्रतिम, अजोड, सरस, अस्सल.
* उपचार- उपाय, इलाज, चिकित्सा, तोड, तोडगा, युक्ती.
* उत्तेजन- उद्दीपन, स्फूर्ती, प्रोत्साहन, चेतना, प्रलोभन, आकर्षण, शाबासकी.
* उत्पत्ती- जन्म, पैदास, उद्भव, उदय,प्रादुर्भाव.
* उत्पन्न- मिळकत, प्राप्ती, आवक, उपलब्धी.
* उत्पात- उपद्रव, उच्छाद, उचापत, खोड्या, अनर्थ, संकट, आपत्ती.
* उत्सुकता- उत्कंठा, जिज्ञासा, आतुरता, औत्सुक्य, उतावळेपणा.
* उदास- हताश, खिन्न, विषण्ण, मलूल, निरुत्साही, विमनस्क, म्लान, सचिंत, कष्टी.
* उदाहरण- दाखला, नमुना, दृष्टान्त, मासला, मिसाल, वानगी.
* उद्योग- धंदा, व्यवसाय, उद्यम, उदीम, काम.
* उनाड- खोडकर, द्वाड, वांड, उडाणटप्पू, स्वैर, मोकाट, भटक्या.
* उन्माद- भ्रम, धुंदी, वेड, कैफ, माज, उन्मत्तता.
* उपकारक- हितकारक, कल्याणकारी, हितावह, अनुकूल.
* उपजीविका- उदरनिर्वाह, चरितार्थ, जीविकोपार्जन, योगक्षेम, निर्वाहसाधन, रोजगार.
* उपदेश- शिकवण, सल्ला, बोध, कानमंत्र, गुरुमंत्र.
* उपहास- चेष्टा, मस्करी, थट्टा, कुचेष्टा, टर, टवाळी, निंदा, अवहेलना, निर्भर्त्सना
* उपोषण- उपास, उपवास, अनशन, निराहार, लंघन, फाका.
* उलट- विरुद्ध, उलटे, विपरीत, उफराटे, व्यस्त, विलोम.
* उशीर- विलंब, खोळंबा, अवकाश, वेळ, अवधी, दिरंगाई.
* ऊर्मी – उसळी, स्फूर्ती, आवेग, आवेश, लाट.
* ऋषी- मुनी, साधू
* एकी- एकता, एक्य, एकजूट, एकोपा, एकात्मता, मेळ, संघटन, समन्वय.
* ऐट- ताठा, डौल, दिमाख, गर्व, रुबाब, नखरा, अभिमान.
* ऐवज- संपत्ती, रकम, रोकड, डबोले.
* ऐश्वर्य- वैभव, समृद्धी, श्रीमंती, संपदा.
* प्रभुत्व- वर्चस्व.
अशाप्रकारे या लेखांमध्ये आपण जवळपास 500 पेक्षा जास्त Samanarthi Shabd पाहिले आहेत हे Samanarthi Shabd शालेय विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा साठी नक्कीच उपयोगात येतील याची आम्हास खात्री वाटते.
लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा व कमेंट करा तसेच काही सूचना असल्यास आम्हाला नक्की कळवा आपल्या सूचनाचा आम्ही आमच्या लेखांमध्ये विचार करू.
You May Also Know :
- Vidyarthi विविध Yojana | 12 विद्यार्थी लाभाच्या योजना
- Morning Assembly Anchoring Script | इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन
- 15 August Speech In Marathi | Bhashan | 15 ऑगस्ट भाषण
- Olympic Medalist in India | ऑलिम्पिक पदक विजेते
- Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा 50 | संस्कार कथा
- Marathi Suvichar I 1000+ मराठी सुविचार संग्रह
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.