Marathi shuddh lekhan| मराठी शुद्धलेखन 12 नियम

आज आपण मराठी शुद्धलेखन व त्याचे नियम यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. प्रथम Shuddh Lekhan म्हणजे काय? याविषयी माहिती पाहूया. Shuddh Lekhan हे विचारांचे स्पष्टीकरण आहे आणि ते वैयक्तिकरित्या किंवा अविचारी विचाराद्वारे त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत नाही. शुद्ध लेखन म्हणजे तुमचे विचार, समरसता आणि निर्णय यांची अभिव्यक्ती. तुम्ही एखादी कल्पना सुसंवादीपणे मांडण्याचा प्रयत्न करत असाल किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे किंवा वस्तूचे चित्रण करत असाल तरीही शुद्धता आणि स्पष्टता हे महत्त्वाचे घटक आहेत.Shuddh Lekhan

मराठी शुद्धलेखनाचे नियम:-

मराठी shuddh lekhan नियम क्रमांक: 1

1) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून होतो त्या अक्षरांवर अनुस्वार द्यावा.

उदा. अंगण, आंबा, इंद्र, उंट, चिंच, चेंडू, डाळिंब, नांगर, भिंग, टिंब, भिंत, झुंड, पुंड, खिंड, पिंपळ वगैरे. (इथेच आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. खणखणीत उच्चार असलेले अनुस्वार ‘ई’ कार व ‘उ’ कार सामान्यतः हस्व असतात. वरील शब्द पहा.)

2) संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांतील अनुस्वार परस वर्णाने लिहिण्यास हरकत नाही. (परसवर्ण – ‘क’ ते ‘प’ वर्गातील पाचवे अनुनासिक)

उदा. गंगा – गङ्गा, कुंज – कुञ्ज, घंटा – घण्टा, चंचू -चञ्चू, चंड – चण्ड, छंद – छन्द, विलंब – विलम्ब. अंत – अन्त, चंपक – चम्पक, शंख – शङ्ख.

सूचना : (1) मराठीत ‘श’ हे अक्षर ‘शे श व श्र असे तीन प्रकारे लिहिले जाते. उदा. श्रद्ध, श्रद्ध

(2) ‘संस्कृत’ मध्ये असे शब्द अनुस्वारयुक्त न लिहिता परसवर्ण अनुनासिक युक्त लिहिण्याची पद्धत शिष्टसंमत असते. तथापि मराठीत अनुस्वारयक्त लेखनच अधिक प्रचलित सुगम व सुकर ठरले.

मराठी शुद्धलेखन नियम क्रमांक: 2

3) नामांच्या किंवा सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांच्या अन्त्याक्षरावर त्याला विभक्तिप्रत्यय किंवा तत्सम शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.

उदा. एकवचन – मुलास, गावात, त्याचा, ओळीमध्ये, मित्रासाठी.

अनेकवचन – मुलांस, गावांत, त्यांचा, ओळींमध्ये, मित्रांसाठी.

पुढील शब्द पहा – मुलामुलींनी, नोकरचाकरांना.

वरील सामासिक शब्दांमधील पहिली पदे अनेकवचनी सामान्यरूपे आहेत. पण त्यांच्या अन्त्याक्षरांवर बिंदू नाहीत, कारण त्यांना विभक्तिप्रत्यय लावलेले नाहीत, पुढल्या पदांना लावलेले आहेत, म्हणून फक्त पुढच्या पदांच्या अनेकवचनी सामान्य रूपांच्या अन्त्याक्षरांवरच अनुस्वार दिले आहेत.

4) आदरार्थी अनेकवचनाबाबत हाच नियम ग्राह्य धरावा.

1) गुरुजींनी बालकांना शाबासकी दिली..

2) पंतप्रधानांनी लोकांना आश्वासन दिले.

मराठी शुद्धलेखन नियम क्रमांक: 3

5) उच्चारानुसारी लेखन वाचन करताना बऱ्याच ठिकाणी ग्रांथिक लेखनातील ‘ए’ कारान्त लेखन ‘अ’ कारान्त होते. त्या ‘अ’ काराचा उच्चार दीर्घ वा पूर्ण होतो व तो अनुस्वाराने दाखविला जातो.

उदा. अ) ग्रांथिक लेखन : माझे म्हणणे असे होते की

ब) उच्चारानुसार लेखन : माझं म्हणणं असं होतं की………

आकाशवाणीवरील संभाषण, नाटकांतले संवाद, घरगुती पत्रलेखन वा संभाषण लघुनिबंध वगैरे (ब) मध्ये दाखविल्याप्रमाणे लेखन व उच्चारण केले जाते. मराठीत उच्चारानुसारी दीर्घ अकारान्त लेखन या पद्धतीने करणे हे आता रूढ झाले आहे. मात्र अशा लेखनाचा परिचय नसलेला मराठी व विशेषतः अमराठी माणूस असे शब्द अनुस्वरांच्या स्पष्ट उच्चारांसहित वाचण्याचा धोका संभवतो. म्हणजे माझं म्हणणं असं होतं की……….

याऐवजी माझम् म्हणणम् असम् होतम् की असे वाचन होईल.

यावर उपाय (1) अशा माणसांना आपल्या अपेक्षेनुसार योग्य वाचन करायला शिकविणे किंवा (2) ‘ए’ काराच्या जागी येणाऱ्या दीर्घ अकारान्त उच्चारासाठी अनुस्वार देण्याऐवजी ‘5’ असे काहीतरी दुसरे चिन्ह देण्याची पद्धती स्वीकारणे.

उदा. माझ म्हणणऽ असऽ होतऽ की………. अर्थातच हा पर्याय मान्यवरसंमत व बहुजनस्वीकृत होईपर्यंत प्रमाण भाषेत ‘शुद्ध’ म्हणून स्वीकारता येणार नाही. पण मी तो मुद्दाम विचारार्थ पुढे ठेवला आहे. तोपर्यंत पूर्वीचा (ब) मधील अनुस्वारयुक्त लेखनाचा पर्यायच शुद्ध समजावा.

मराठी शुद्धलेखन नियम क्रमांक: 4

6) एकाच शब्दामध्ये अनुस्वराचा कोमल अस्पष्ट उच्चार व त्याच शब्दातील अनुस्वराचा स्पष्ट खणखणीत उच्चार असा फरक होताच दोन वेगवेगळे अर्थ निर्माण होतात तेव्हा अनुस्वाराच्या कोमल अस्पष्ट उच्चारासाठी शिरोबिंदू वापरावा आणि अनुस्वाराचा खणखणीत स्पष्ट उच्चार परसवर्ण (‘क’ ते ‘प’ वर्गातील पाचवे अनुनासिक) लिहून दाखवावा.

(अ) अनुस्वाराचा कोमल अस्पष्ट उच्चार    1. देहांत (अनेक देहांमध्ये)  2. वेदांत (अनेक वेदग्रंथामध्ये) 3. शालांत (अनेक शाळांमध्ये)

(ब) अनुस्वराचा स्पष्ट व खणखणीत उच्चार  1. देहान्त ( देहाचा अन्त मरण)  2. वेदान्त (तत्त्वज्ञान)  3. शालान्त (शाळेच्या, अखेरची)

याचप्रमाणे वृत्तांत – वृत्तान्त, सुखांत सुखान्त, दुःखांत दुखान्त, सिद्धांत – सिद्धान्त यासारख्या शब्दांचे – – उच्चार व अर्थ भिन्न होतात व त्यानुसार ते लिहिले जावेत.

shuddh lekhan नियम क्रमांक: 5

7) ज्या शब्दांमधील अनुस्वाराचा उच्चार पुढील व्यंजनवर्गाशी मिळता जुळता नसेल त्या शब्दांत अनुस्वार न वापरता उच्चारानुसारी अनुनासिक वापरावे. असे शब्द सामान्यतः हिंदी व इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेले आढळतात. इन्कार (इंकार), इन्किलाब (इंकिलाब) या प्रमाणेच ट्रांन्सपोर्ट, इन्स्पेक्टर, लायसेन्स, सेन्सार, सेन्ट्रल वगैरे.

मराठी व्याकरणांमध्ये ऱ्हस्व व दीर्घ उच्चार याला खूप महत्त्व आहे या उच्चारानुसार Shuddh Lekhana che काही नियम आहेत ते खालील प्रमाणे.

शुद्धलेखन नियम क्रमांक: 6

1) मराठीत सर्व एकाक्षरी इ-कारान्त व उ-कारान्त शब्द उच्चारानुसार दीर्घ लिहावेत.

उदा. मी, ही, जी, पी, बी, की, स्त्री, तू, धू, जू, भू, ऊ, रू,

अपवाद : ‘नि’ हे उभयान्वयी अव्यय (‘आणि’ या अर्थी) हस्व लिहावे.

शुद्धलेखन नियम क्रमांक: 7

2) * मराठीत आलेले सर्व तत्सम ‘इ’ कारान्त व ‘उ’ कारान्त (हस्वान्त) शब्द अनुक्रमे ई-कारान्त व ऊ-कारान्त (दीर्घान्त) लिहावेत.

अनुक्रमे ई-कारान्त व ऊ-कारान्त (दीर्घान्त) लिहावेत.

संस्कृत – कवि, मति, गति, गुरु, शत्रु, मृत्यु

मराठी – कवी, मती, गती, गुरू, शत्रू, मृत्यू

(i) गडकरी हे कवी होते.

ii) वाघ सिंह हिंस्त्र पशू आहेत.

iii) नानक शिखांचे गुरू होत.

तत्सम व्यक्तिनामे, ग्रंथनामे वा अन्य असे शब्द दीर्घ लिहावेत.

* मात्र हेच मूळचे – हस्वान्त तत्सम शब्द समासात प्रारंभी आले तर ते संस्कृत प्रमाणे – हस्वच लिहावेत.

बुद्धी – बुद्धिमान, कवी – कविराज, मती मतिमंद. याचप्रमाणे गतिमान, रविवार, गुरुदक्षिणा, शत्रुपक्ष, – मृत्युंजय, मंत्रिमंडळ, विद्यार्थिगृह वगैरे.

* पुढील तत्सम अव्यये हस्वान्त लिहावीत.

यद्यपि, अद्यपि, तथापि, संप्रति, प्रभृति, अति, इति, प्रति, यशाशक्ति, यथामति, …… ड] मराठीतील उभयान्वयी अव्यय ‘आणि’ हस्वान्त लिहावे. (मात्र आदी, इत्यादी हे शब्द अव्यये नाहीत, परंतु, किन्तु.

शुद्धलेखन नियम क्रमांक: 8

3) मराठीत आलेले सर्व तत्सम ई कारान्त व ऊकारान्त शब्द दीर्घान्तच लिहावेत आणि समासातही ते दीर्घच लिहावेत.

उदा. दासी – दासीपुत्र, लक्ष्मी-लक्ष्मीकांत, गौरी-गौरीहर, भगिनी – भगिनीमंडळ, वधू – वधूपरीक्षा, भू – भूगोल, शरयू – शरयूतीर वगैरे.

4) संस्कृतमधील विद्यार्थिन्, प्राणिन्, पक्षिन् यासारखे इन्नन्त शब्द मराठीत येताना अन्त्य ‘न्’चा लोप होतो व उपान्त्य अक्षर दीर्घ होते. – विद्यार्थिन् – विद्यार्थी, प्राणिन्-प्राणी, पक्षिन् – पक्षी. मात्र हेच शब्द सामासिक शब्दांमध्ये आरंभी येताना हस्व होतात. विद्यार्थी – विद्यार्थिगृह, मंत्री – मंत्रिमंडळ, पक्षी – पक्षिराज, प्राणी- प्राणिसंग्रहालय.

5) मराठीतले बहुतेक सर्व तत्समेतर इ-कारान्त व उ-कारान्त शब्द उच्चारानुसार दीर्घ लिहावेत.

तारू,आई, काठी, पाटी, वाटी, शाई, पिशवी, विटी, शेतकरी, चेंडू, लाडू, गडू, खडू, विठू, बाळू, दांडू, दयाळू, लाजाळू, विसराळू या शब्दांना विभक्तिप्रत्यय लागल्यावरही ते दीर्घच लिहावेत…

आईच्या काठीने, पाटीवर, वाटीत, खडूने, चेंडूला, दांडूत वगैरे.

हस्व / दीर्घ (उपान्त्य अक्षरे म्हणजे शेवटून दुसरी अक्षरे ) :

नियम क्रमांक: 8

1)मराठीत ई-कारान्त व ऊ-कारान्त एकाक्षरी शब्दांना प्रत्यय लागताच

i) त्यांपैकी काही ऱ्हस्व होतात. (प्रत्यय लागल्यावर मूळची एकाक्षरे उपान्त्य होतात.)

तू – तुला, ही – हिने, ती – तिने, जी- जिने, धू – धुऊन,

ii) पण बी – बीला, फी – फीत, स्त्री स्त्रीने, पू- पूचे, रू- रूस, भू – भूवर म्हणजे काही शब्दांतील ‘ई’कार व ‘ऊ’कार दीर्घच राहतात.

2) i) अकारान्त मराठी शब्दांतील उपान्त्य इ – कार व उ – कार दीर्घ असतात.

जीभ, तीळ, तीट, वीट, पीठ, मीठ, खीर, वडील, वकील, बहीण, परीट, जमीन, गरीब, उडीद, बक्षीस, विहीर.

दूध, तूप,गूळ, चूल, मूल, फूल, धूळ, मजूर, वसूल.

ii) तथापि याच शब्दांना प्रत्यय वा अव्यय लावताना जेव्हा त्यांचे सामान्यरूप होते तेव्हा हेच उपान्त्य (दीर्घ) ई-कार व ऊ- कार -हस्व होतात.

उदा. जीभ – जिभेला, तीळ – तिळाचा, वीट- विटेवर, बक्षीस – बक्षिसाने, चूल चुलीत, धूर-धुरामुळे, पूर- पुरात, सोलापूर सोलापुरात, गूळ – गुळाची.

शुद्धलेखन नियम क्रमांक: 9

3) अपवाद : मराठीत आलेल्या तत्सम अकारान्त शब्दातील उपान्त्य इकार व उकार मुळात (म्हणजे संस्कृतमध्ये) हस्व असल्यास ते तसेच राहतात. उदा.

i) विष, भिन्न, भिल्ल, मिश्र, अनिल, जटिल, कुटिल, मंदिर, अखिल, निखिल, चरित, दुरित वगैरे.

ii) या शब्दांना प्रत्यय वा अव्यये जोडल्यावर त्या उपान्त्य इकार व उकार यांत फरक पडत नाही.

उदा. विष-विषारी, भिन्न-भिन्नता, मंदिर-मंदिरात, दुरित-दुरिताचे….

गुण- गुणांनी, गुच्छ-गुच्छात, गुप्त-गुप्तता, तुच्छ-तुच्छतेने, – मनुष्य-मनुष्याला वगैरे.

शुद्धलेखन नियम क्रमांक: 10

4) (i) मराठीत शब्दातील अन्त्याक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ-कार अथवा उ-कार हस्य असतो.

उदा. किडा, दिवा, महिना, दागिना, पाहिजे, करिता, पलिता, गुणी, सुरी, सुरू, मेहुणा, पाहुणा, नमुना, यमुना, तालुका.अशा शब्दाला प्रत्यय वा अव्यय जोडल्यावरही तो तसाच राहतो.

उदा. किड़ा – किड्याने, महिना-महिन्यात, दागिना – दागिन्याची, सुरी – सुरीने,

 ii) अपवाद: संस्कृतमधून मराठीत आलेल्या (तत्सम) (दीर्घ स्वरान्त) शब्दांतील उपान्त्य स्वर मुळात जर असतील तर मराठीतही ते तसेच राहतात. उदा.

प्रीती, नीती, भीती, कीर्ती, पीडा, क्रीडा, परीक्षा, गीता, लीला, सुशीला, पूजा, पूर्ती, रूपा, स्फूर्ती. या शब्दांना प्रत्यय किंवा अव्यये जोडल्यावरही ते तसेच राहतात.

उदा. प्रीती – प्रीतीने, कीर्ती – कीर्तीमध्ये, पूजा-पूजेत, स्फूर्ती-स्फूर्तीने

शुद्धलेखन नियम क्रमांक: 11

5) i) मराठी शब्दांमधील अनुस्वार, विसर्ग व जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इ-कार, उ-कार सामान्यतः न्हस्व असतात. उदा.

1) अनुस्वार युक्त इ – कार, उ- कार :- भिंत, खिंड, उंच, गुंड

2) विसर्ग युक्त – इ – कार, उ कार :- नि:शंक, छि:, दुःख –

3) जोडाक्षर युक्त इ – कार, उ-कार :- भिल्ल, शिल्लक, कुस्ती, मुक्काम.

ii) अपवाद : असे तत्सम शब्द मात्र मूळ संस्कृतमध्ये हस्व असल्यास हस्व व दीर्घ असल्यास दीर्घ लिहावेत.

उदा. हस्व उपान्त्य इ – कार, उ- कार : चरित्र, गणित, फलित, छिद्र.

दीर्घ उपान्त्य ई कार, ऊ – कार :- तीक्ष्ण, तीव्र, पूर्व, पूज्य, सूक्ष्म ….

शुद्धलेखन नियम क्रमांक: 12

अनुस्वार व हस्व दीर्घ यासंबंधीचे विविध नियम पाहताना एक महत्त्वाचा अघोषित नियम ‘मराठी शब्दाच्या बाबतीत लक्षात येतो तो असा –

6) i) देव, मानव, वजन, स्मरण वगैरे. (हरी, कवी, नदी, भानू, गणू, गुरू, घोडे, दावे, रेडिओ, टाहो वगैरे सारखे इतर शब्द स्वरान्तच आहेत.)

ii) भगवान, विद्वान, सम्राट, परिषद, शशी, विद्यार्थी, पक्षी, क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात.

iii) पेन, पेन्सिल, ट्रक, ट्रंक, एम.ए., बी.एड., पी.एच.डी.

खुलासा : i) तत्सम तद्भव किंवा देशी विदेशी शब्द मराठीत स्वरान्तच आढळतात त्यांची ही उदाहरणे.

ii) मूळ संस्कृतमध्ये व्यंजनान्त असलेले भगवत्, विद्वान्, शशिन्, विद्यार्थिन्, सम्राट् यासारखे शब्दही मराठीत

सामान्य रूपांबद्दल शुद्धलेखनाचे काही नियम

वर Shuddh Lekhan बाबतचे विविध नियम दिले आहेत, तिथेच आवश्यकतेनुसार त्या त्या नियमांखालीच त्या शब्दांना प्रत्यय किंवा अव्यय जोडताना त्यांची सामान्य रूपे कशी होतात, सामान्य रूपे बनवताना हस्व दीघांत कुठे बदल होतात, कुठे होत नाहीत तेही सांगितलेले आहे. इथे खाली सामान्यरूपांबाबत आणखी काळी ठळक वैशिष्ट्ये दाखवीत आहे.

1. अ) तीन अक्षरी शब्दांतील पहिले अक्षर दीर्घ असेल व शब्द ‘अ’ कारान्त असेल, अक्षरातील इ- ऊ च्या जागी ‘अ’ हा आदेश (बदल) होतो.

पहिले अक्षर -हस्व असेल तर हा आदेश विकल्पाने होतो..

उंदीर – उंदराचे, पाटील- पाटलाला, तालीम-तालमीत,माणूस – माणसाने, तांदूळ – तांदळाची, बेडूक – बेडकांना, परीट परटास / परिटास

ब) तीन अक्षरी शब्दांमध्ये पहिले अक्षर दीर्घ असेल व शब्द अकारान्त असेल आणि उपान्त्य

स्थानी इ – ई व उ ऊ अक्षरे असतील तर इ ई च्या जागी ‘य’ व उ ऊ च्या जागी ‘व’ असा आदेश होतो. –

उदा. फाइल – फायलीत, देऊळ देवळाची, पाऊस – पावसात

2) ‘ए’ कारान्त शब्दाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त करावे.

उदा. i) जाणे – जाण्यात, गाणे – गाण्याने, तपेले – तपेल्यात –

ii) फडके – फडक्यांना, भावे -भाव्यांनी, दामले – दामल्यांचे.

अशाप्रकारे मराठी शुद्धलेखनाचे 12 नियम आपण पाहिले तसेच सामान्य रूपामध्ये काही नियम वेगळ्या पद्धतीने आपण अभ्यासले. यामध्ये काही शंका असल्यास खाली कमेंट करून नक्की कळवा पोस्ट आवडल्यास शेअर करा.

हे देखील वाचा :

अधिक नवीन माहिती साठी आमच्या Telegram
ग्रूप ला Join व्हा.
Telegram 👇👇👇
Scroll to Top