100 Alankarik shabd | अलंकारिक शब्द मराठी व्याकरण | मराठी अलंकारिक शब्द

Alankarik shabd in Marathi या सदराखाली आपण अलंकारिक शब्द, ज्यामूळे मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होते. शब्दाचा शाब्दिक अर्थ काहीही असो, त्याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. या लेखात आपण अलंकारिक शब्द पाहणार आहोत जो मराठी व्याकरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे.

Table of Contents

Alankarik shabd

अलंकारिक शब्द | Alankarik Shabd

खाली आपणांसाठी अलंकारिक शब्द देत आहोत ज्याचा उपयोग आपणास नक्की होईल.

1ओनामासुरूवात प्रारंभ
2अकरावा रूद्रअतिशय तापट माणूस
3अरण्यरूदनज्याचा उपयोग नाही असे कृत्य
4उंबराचे फूलदुर्मिळ वस्तू
5कळ्सूत्री बाहुलेदुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
6काडीपहिलवानहडकुळा
7खुशालचेंडूचैनखोर माणूस
8गाजरपारखीकसलीही पारख नसलेला, मूर्ख
9गुळाचा गणपतीमंद बुध्दीचा
10बिनभाड्याचे घरतुरूंग
11भगिरथ प्रयत्नआटोकाट प्रयत्न
12स्मशान वैराग्यतात्कालीक वैराग्य
13शेंदाड शिपाईभित्रा
14शकुनीमामाकपटी माणूस
15वामनमूर्तीबुटका माणूस
16मायेचा पूतपराक्रमी मणूष्य, मायाळू
17भीष्म प्रतिज्ञाकठीण प्रतिज्ञा
18पांढरा परीसलबाड
19धोपट मार्गनेहमीचा मार्ग,सरळ मार्ग
20त्रिशंकूधड इकडे ना तिकडे
21अरण्य पंडितमूर्ख मनुष्य
22अकरावा रूद्रअतिशय तापट माणूस
23अक्षरशत्रू  निरक्षर माणूस
24अंडी पिल्लीगुप्त गोष्टी
25अळवावरचे पाणीफार काळ न टिकणारे
26अष्टपैलूअनेक चांगले गुण असलेला
27अकलेचा खंदकअत्यंत मूर्ख माणूस
28उंटावरचा शहाणामूर्ख पणाचा सल्ला देणारा
29एरंडाचे गुऱ्हाळकंटाळवाणे बोलणे
30कर्णाचा अवतारउदार मनुष्य
31कुंभकर्णअतिशय झोपाळू
32कूपमंडूकसंकुचित वृत्तीचा
33कोल्हेकुईक्षुद्र लोकांची बडबड
34खडाजंगीमोठे भांडण
35खडाष्टकजोरदार भांडण
36खेटराची पूजाअपशब्दाने खरडपट्टी काढणे
37गप्पादासगप्पा मारणारा
38गोगलगायगरीब किंवा निरूपद्रवी मनुष्य
39गर्भश्रीमंतजन्मापासून श्रीमंत असलेला
40गुरूकिल्लीमर्म, रहस्य
41गंडांतरसंकट
42गंगायमुनाअश्रू
43गळ्यातील ताईतअत्यंत प्रिय अशी व्यक्ति
44गोमाजी कापसेकोणीतरी एक मनुष्य
45गावमामासर्वांना आपलासा वाटणारा
46घरकोंबडाघरात बसणारा
47चर्पटपंजरीवायफळ बडबड
48चौदावे रत्नमार
49छत्तीसचा आकडाशत्रुत्व
50जमदग्नीचा अवताररागीट मनुष्य
51टोळभैरवनासाडी करीत फिरणारे
52ताटाखालचे मांजरदुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
53थंडा फराळउपवास
54दगडावरची रेघकधीही न बदलणारे
55दुपारची सावलीअल्पकाळ टिकणारे सुख
56देवमाणूससाधाभोळा मनुष्य
57द्राविडी प्राणायामविनाकारण केलेला खाटाटोप
58नवकोट नारायणखूप श्रीमंत
59नंदी बैलहो ला हो म्हणणारा
60पर्वणीअतिशय दुर्मिळ योग

 

मराठी बोध कथा

सूविचार संग्रह

61) पाताळयंत्री : कारस्थान करणारा.

62) पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू.

63) पिकले पान : म्हातारा, वृद्ध.

64) पोपटपंची : अर्थ न कळता पाठांतर करणारा.

65) बृहस्पती : बुद्धिमान मनुष्य.

66) बोकेसंन्यासी : ढोंगी मनुष्य.

67) बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचने.

68) बादरायण संबंध : ओढून ताणून दाखविलेला संबंध

69) भाकडकथा : बाष्कळ गोष्टी.

70) भीष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा.

71) मंथरा : दुष्ट स्त्री.

72 ) मारुतीचे शेपूट : वाढत जाणारे काम.

73) मृगजळ : केवळ आभास.

74) मेषपात्र : बावळट.

75) मुखस्तंभ : मुद्दाम न बोलता उभा राहणारा.

76) रामबाण औषध : अचूक गुणकारी.

77) लंकेची पार्वती : अत्यंत गरीब स्त्री.

78) लंबकर्ण : बेअकली

79) वाटाण्याच्या अक्षता : नकार

80) वाहती गंगा : आलेली संधी

81) शेजारधर्म : शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत

82) श्रीगणेशा : प्रारंभ

83) सांबाचा अवतार : अत्यंत भोळा माणूस

84) सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालणारे काम

85) सोन्याचे दिवस : चांगले दिवस

86) सूर्यवंशी: उशिरा उठणारा

87) संगणकसाक्षर : संगणकाचा वापर करण्याचे ज्ञान

88) शिकंदर नशिब : फार मोठे नशिब

89) सूर्यवंशी : उशिरा उठणारा

90) चालता काळ: वैभवाचा काळ

91) गाढव : बेअकली माणूस

92) कळीचा नारद : भांडण लावून देणारा

93) अंधेरी नगरी : अव्यवस्थित पणाचा कारभार

94) अक्षर शत्रू : निरक्षर माणूस

95) दळूबाई : भेकड माणूस

अशाप्रकारे आपण अलंकारिक शब्द पाहिले. Alankarik Shabd आपणास नक्कीच उपयोगात येतील याची आम्हांला खात्री आहे.

याच प्रमाणे…..

विरूध्दार्थी शब्द

मराठी बोध कथा

सूविचार संग्रह

पाहण्यासाठी नावाला क्लीक करा.

You May Also Know :

Scroll to Top